IMPIMP

निव्वळ योगायोगच ! फडणवीस आणि राऊत यांनी ठाकरे सरकारला दिला ‘हा’ एकच सल्ला

by bali123
Coincidentally! Devendra Fadnavis and Sanjay Raut gave the same advice to the Thackeray government

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन – गेल्या काही दिवसांतील विविध प्रकरणानंतर ठाकरे सरकारवर Thackeray government  विरोधकांकडून सातत्याने टीका केली जात आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार सरकारची Thackeray government पाठराखण करत आहेत. पण दुसरीकडे ठाकरे सरकारला काही नेतेमंडळींकडून सल्ला दिला जात आहे. त्यामध्ये विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांच्याकडून सल्ला दिला गेला आहे.

‘महाराष्ट्रात बढत्या-बदल्यांचे रॅकेट, माझ्याकडे पुरावे’; फडणवीसांचे खळबळजनक विधान

फडणवीस आणि राऊत यांनी सरकारला सल्ला दिला असला तरी यातील विशेष बाब म्हणजे शिवसेना आणि भाजप या दोन्ही वेगळ्या पक्षातील नेत्यांनी ठाकरे सरकारला Thackeray government एकच सल्ला दिला आहे. त्यामुळे याचीच चर्चा सध्या सुरु आहे. फडणवीस यांनी कथित पोलिस बदली रॅकेटप्रकरणी त्यांच्याकडे असलेले सर्व पुरावे केंद्रीय गृह सचिवांकडे सोपवले आहेत. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. फडणवीस म्हणाले, ‘माझ्याकडे असलेले सगळे पुरावे मी बंद लिफाफ्यात गृह सचिवांना दिले आहेत. माझ्याकडच्या पूर्ण माहितीची ब्रीफिंग मी त्यांना दिली आहे. सध्या सरकारला आत्मचिंतनाची गरज आहे’.

‘शरद पवारांच्या तोंडून चुकीच्या गोष्टी वदवून घेतल्या’, देवेंद्र फडणवीसांचा आरोप

तसेच महाविकास आघाडी सरकारला नुकतेच दीड वर्ष पूर्ण झाले आहे. त्यावेळी बोलताना सरकारमधील घटकांनी आत्मपरीक्षण करावे. आपले पाय जमिनीवर आहे की नाही हे तपासून घ्यावे, असे दोनच दिवसांपूर्वी संजय राऊत यांनी म्हटले होते. त्यानंतर फडणवीस यांनीही सरकारला अशाचप्रकारे सल्ला दिला.

‘एका पांचट पत्रावरून गृहमंत्री आणि मुख्यमंत्र्यांचे राजीनामे घेतले तर…’

काय म्हणाले होते फडणवीस?
माझ्याकडे असलेले सगळे पुरावे मी बंद लिफाफ्यात गृह सचिवांना दिले आहेत. माझ्याकडच्या पूर्ण माहितीची ब्रीफिंग मी त्यांना दिली आहे. या प्रकरणाची सीबीआय चौकशी केली जावी, अशी मागणी मी केली आहे. केंद्रीय गृहसचिवांनी माझे सर्व बोलणे ऐकून घेतले आहे. या सर्व गोष्टी पाहून त्यावर योग्य ती कारवाई केली जाईल, असे त्यांनी मला सांगितले आहे.

Also Read :

सरकारी कर्मचाऱ्यांना खुशखबर ! वेतनात घसघशीत वाढ करुन वाढवले निवृत्तीचे वय, ‘या’ सरकारचा महत्त्वाचा निर्णय

मोठ्या शहरांमध्ये ‘लॉकडाऊन’ ची शक्यता ?

वेळ आल्यावर ‘करेक्ट’ कार्यक्रम’ ! ‘बदलीनंतर परमबीर सिंग दिल्लीत कोणाला भेटले? – राष्ट्रवादी

‘ए भाई, तू जो कोण असशील – माझ्या वर बोट उचलायचं न्हाय !’ अमृता फडणवीसांचा भाई जगतापांना इशारा

बीडमध्ये NCP चा शिवसेनेला धक्का ! महत्त्वाच्या नेत्यांसह 101 प्रमुख कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादीत प्रवेश

मी नाही त्याने मला सोडले … ! सुशांतच्या मृत्यूच्या 9 महिन्यांनंतर अंकिता लोखंडेने दिली त्यांच्या ब्रेकअपवर प्रतिक्रिया

‘मी पुन्हा येईनचं स्वप्न अजूनही जिवंत !’ रोहित पवारांचा देवेंद्र फडणवीसांना टोला

Related Posts