IMPIMP

अंबानी प्रकरण : देवेंद्र फडणवीसांचे मोठं विधान, म्हणाले – ‘ती’ गाडी काल संध्याकाळपर्यंत मुंबईतच होती

by pranjalishirish
bjp-devendra-fadanvis-mukesh-ambani-explosives-innova-car-mansukh-hiren-sachin-vaze

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन – उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर स्फाेटकाने भरलेली गाडी सापडल्यानंतर गाडी मालकाचा संशयास्पद मृतदेह आढळून आला. त्यामुळे या प्रकरणाला वेगळेच वळण लागले आहे. दरम्यान, गाडी मालक मनसुख हिरेन मुद्यावरून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस Devendra Fadnavis यांनी काल सभागृहात सत्ताधाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले. सर्वांत प्रथम मनसुख हिरेन यांचा उल्लेख केल्यापासून ते मृत्यू झाल्याची माहिती देखील फडणवीस Devendra Fadnavis यांनीच समोर आणली होती. त्यानंतर आता फडणवीस Devendra Fadnavis यांनी या प्रकरणात मोठं विधान केलं आहे.

विधानसभेत प्रसारमाध्यमांशी बोलताना देवेंद्र फडणवीस Devendra Fadnavis यांनी सांगितले की, अंबानी यांच्या घराबाहेर स्कॉर्पिओ सोबत दिसलेली इनोव्हा कार मंगळवारी संध्याकाळपर्यंत मुंबईतच होती, असा दावा फडणवीस यांनी केला आहे. सीसीटीव्हीत दिसणाऱ्या इनोव्हा कारसंबंधी आपल्याकडे काही माहिती आली आहे का? असे विचारले असता त्यांनी सांगितले की, माझ्या माहितीप्रमाणे ती गाडी तिथून गायब झाली तर वेगळी गोष्ट आहे. पण त्यावर मी अधिकृतपणे काही बोलू शकत नाही कारण मी कोणत्याही तपास यंत्रणेचा व्यक्ती नाही. जी माहिती माझ्याकडे येते ती तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न करतो. पण माझ्या माहितीनुसार, काल संध्याकाळपर्यंत गाडी मुंबईतच होती.

काय आहे प्रकरण?

मुकेश अंबानी यांच्या घराजवळ 25 फेब्रुवारी रोजी मध्यरात्री दोनच्या सुमारास अज्ञात व्यक्तींनी स्कॉर्पिओ कार बेवारस अवस्थेत सोडली. या कारमध्ये सुमारे अडीच किलो वजनाच्या जिलेटीनच्या कांड्या आढळून आल्या. एका इंग्रजी वृत्तपत्राच्या वृत्तानुसार, बॅगेत अंबानी कुटुंबीयांना धमकी देणारी चिठ्ठी सापडली. या प्रकरणात स्कॉर्पिओसह एका इनोव्हा कारही सहभागी होती. स्कॉर्पिओ 17 फेब्रुवारी रोजी मुलुंड उड्डाण पुलाजवळून चोरण्यात आली होती, तर इनोव्हा कारवरील नोंदणी क्रमांक बनावट असल्याचे स्पष्ट झालं. इनोव्हाची माहिती मिळवण्यासाठी पोलिसांनी तब्बल 800 सीसीटीव्ही फुटेज तपासले, तर 30 हून अधिक जणांचे जबाब नोंदवले.

Also Read :

‘मुंबई पोलिसांचे, थोबाड काळे झाले’, पोलिसांबद्दल फडणवीस असं कसं बोलू शकतात ?

नाना पटोलेंचा हल्लाबोल, म्हणाले – ‘ज्वलंत प्रश्नांवरून लक्ष दुसरीकडे वळवण्यासाठी भाजपकडून वाझेंना टार्गेट

Gold Rates Today : सणासुदीमध्ये पुन्हा एकदा स्वस्त झालं सोनं-चांदी, 40 हजारांपेक्षा कमी होणार दर ? जाणून घ्या आजचे भाव

Maharashtra Budget 2021 : विरोधक आक्रमक म्हणताहेत; ‘आज त्यांना आम्ही सोडणार नाही’

Related Posts