IMPIMP

‘स्वातंत्र्यवीर सावरकरांना भारतरत्न देण्याचा ठराव विधिमंडळात संमत करून केंद्राला शिफारस करा’ : खा. गोपाळ शेट्टी

by bali123
uddhav thackeray

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन टीम – स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकरांच्या बाबतीत समस्त भारतीयांच्या मनात असलेला आदर व देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात त्यांनी दिलेले योगदान सर्व भारतीयांना ज्ञात आहे. आपल्या मुख्यमंत्री पदाच्या कालावधीत सावरकरांना मरणोत्तर भारतरत्न देण्याबाबतचा ठराव विधिमंडळात संमत करून केंद्र शासनाला शिफारस करण्याची मागणी उत्तर मुंबईचे भाजप खासदार गोपाळ शेट्टी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (uddhav thackeray ) यांच्याकडे एका पत्राद्वारे केली आहे.

खासदार शेट्टी यांनी मुख्यमंत्र्यांना (uddhav thackeray) दिलेल्या पत्रात म्हटले आहे की, सावरकरांना मरणोत्तर भारतरत्न प्रदान करण्याबाबत राज्य शासनाने केंद्र शासनाकडे आग्रह धरावा, अशी शिफारस करण्याबाबतचा अशासकीय ठराव आपण आमदार असताना विधिमंडळाच्या जुलै 2007 च्या पावसाळी सत्रात आणि नोव्हेंबर 2007 च्या हिवाळी सत्रात विधानसभेत मांडला होता. हा विषय अत्यंत संवेदनशील असून, समस्त भारतीयांच्या देशाभिमानाशी निगडित आहे. हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी या विषयावर सातत्याने पाठपुरावा केला होता. हिंदुत्वाच्या पायावर उभा असलेल्या पक्षाचे आपण प्रमुख असून, योगायोगाने राज्याचे मुख्यमंत्री होण्याची संधी आपल्याला मिळाली आहे.
शिवसेनाप्रमुखांचे अधुरे राहिलेले स्वप्न पूर्ण करण्यासाठी सावरकरांना भारतरत्न देण्याचा प्रस्ताव
विधिमंडळात ठराव करून तशी शिफारस केंद्र शासनाकडे पाठवण्यात आपण अग्रणी राहावे,
त्यामुळे ती स्वर्गीय बाळासाहेबांना श्रद्धांजली ठरेल असे खासदार शेट्टी यांनी पत्रात नमूद केले आहे.

Related Posts