IMPIMP

‘CM ठाकरे व शिवसेना नेत्यांना वाझेची वकिली का करावी लागते ?’, भाजप नेत्याचा सवाल (व्हिडिओ)

by pranjalishirish
bjp leader nitesh rane targets shiv sena and cm uddhav thackeray over sachin waze case

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन – अंबानी यांच्या घराबाहेर स्कॉर्पिओ गाडीत सापडलेल्या स्फोटकांप्रकरणी पोलीस अधिकारी सचिन वाझे Sachin Vaje यांना एनआयएकडून अटक करण्यात आली. यानंतर भाजपने महाविकास आघाडी सरकार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर हल्लाबोल केला. सचिन वाझे  Sachin Vaje प्रकरणावर पत्रकार परिषद घेऊन भाजपचे नेते नीतेश राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शिवसेनेच्या नेत्यांवर जोरदार हल्लाबोल केला आहे. मुख्यमंत्री, शिवसेना नेत्यांना सचिन वाझेची वकिली का करावी लागत आहे ? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.

संपादकापासून इतर नेत्यांपर्यंत वाझेची वकिली

नीतेश राणे पत्रकार परिषदेत म्हणाले, सध्या राज्यात एक विषय गाजत आहे, एक साधा एपीआय जेव्हा मोठं पाऊल उचलतो आणि त्याचे संरक्षण करण्यासाठी किंबहुना त्याची वकिली करण्यासाठी स्वत: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उतरतात, शिवसेनेचे नेते उतरतात. ‘सामना’च्या संपादकापासून इतर नेत्यांपर्यंत सचिन वाझे किती चांगला आहे, त्यांची काय चूक नाही, हे जेव्हा वकिली करण्यासाठी पुढे येतात, तेव्हा त्या मागची काही कारणे आहेत. नेमकी वाझेचीच Sachin Vaje वकिली यांना का करावी लागले ? काय आहे या सचिन वाझेकडे ? ज्यामळे यांना हे सगळं पणास लावावं असं वाटतं, तर याचे विषय माझ्याकडे असून या विषयावरून तुम्हाला नेमकं कळेल की, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एका साध्या एपीआय वाझेची वकिली आज का करत आहेत.

सचिन वाझेने 150 कोटी मागितले

नीतेश राणे यांनी सांगितले की, मागील वर्षी आयपीएलची मालिका इथं खेळली गेली. साधारण सप्टेंबर ते नोव्हेंबर या कालावधीत ही मालिका खेळवण्यात आली. त्या अगोदर जे काही बेटिंगचं रॅकेट मुंबईत चालतं, हे सगळे बेटिंगवाले आहेत. त्यांना आयपीएलच्या अगोदर सचिन वाझे यांचा फोन जातो. त्यांना सांगितले जाते की, तुम्ही जे काही करत आहात, त्याची संपूर्ण माहिती माझ्याकडे आहे. पोलीस अधिकाऱ्याचा फोन आल्याने घाबरणारच. मग त्यांना सांगितलं जातं की, जर माझ्याकडे असलेल्या माहितीच्या आधारावर कारवाई करू नये असे जर तुम्हाला वाटत असेल तर 150 कोटी द्या. एकतर ही संपूर्ण रक्कम द्या नाही तर मी तुमच्यावर छापे टाकेन.

बदनामी आणि अटकेची धमकी

एवढेच नाही तर मुंबई पोलिसांनी तुमच्यावर छापे टाकून या मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश कसा केला याचे एक पद्धतशीर चित्र आम्ही रंगवू. यामध्ये तुमची बदनामी तर होईल शिवाय अटकदेखील करू, अशी धमकी या लोकांना दिली गेली. 150 कोटी त्यांच्याकडे मागण्यात आल्याचे आणि ही रक्कम सचिन वाझे याने मागितल्याची माहिती आमच्याकडे आहे. सचिन वाझे याने 150 कोटी रुपयांची मागणी केल्यानंतर वाझे यांना एका व्यक्तीचा फोन जातो. त्याच्याकडून आपल्या हिश्श्याची मागणी केली जाते. हा व्यक्ती तोच आहे, ज्याचे नाव मी विधिमंडळात घेतले.

सरकार त्या व्यक्तीवर मेहरबान

या व्यक्तीवर सरकार एवढे मेहरबान आहे, त्याला वाय प्लस दर्जाची सुरक्षा दिली गेली. हा व्यक्ती तुम्हाला कधी मुख्यमंत्री कार्यालयात दिसतो, तर कधी अधिकाऱ्याला त्याचे फोन गेल्याचे दिसते, मुंबई महापालिकेच्या टेंडरमध्ये त्याचे नाव दिसते, हा दुसरा कोणी नाही तर वरुन सरदेसाई आहे, त्याचे आणि वाझे यांच्यामधील संभाषण आहे. ते महत्त्वाचे आहे, असं मला या ठिकाणी सांगायचे असल्याचे नीतेश राणे यांनी सांगितले.

Also Read : 

भिवंडी महापालिकेच्या सभागृह नेतेपदी कामिनी पाटील

Related Posts