IMPIMP

अनिल देशमुखांनी शरद पवारांना धमकी तर दिली नाही ना?, भाजपच्या ‘या’ नेत्याची शंका

by pranjalishirish
bjp leader sudhir mungantiwar doubts whether anil deshmukh has threaten sharad pawar

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाईन – सध्या राज्यात विरोधकांकडून गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात येत आहे. गृहमंत्र्यावर होणाऱ्या आरोपांमुळे सरकार समोरील अडचणीत वाढ झाली आहे. ‘अनिल देशमुखांचा राजीनामा घेणं हा मुख्यमंत्र्यांचा विषय आहे, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार Sharad Pawar काल दुपारीच म्हणाले होते. मात्र, रात्री लगेच त्यांनी भूमिका बदलली. राजीनाम्याची आवश्यकता नाही असे पवारांनी सांगितलं. अनिल देशमुखांनी त्यांना धमकी तर दिली नाही ना?,’ अशी शंका भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार यांच्याकडून उपस्थित करण्यात येत आहे. माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी राज्याच्या गृहमंत्र्यावर केलेल्या आरोपांमुळे महाराष्ट्राच्या स्वाभिमानाचे, सन्मानाचे धिंडवडे निघाले आहेत. राज्यपालांनी या सर्व घटनांचा अहवाल मुख्यमंत्र्यांकडून मागवावा व त्याची सत्यता तपासून तो राष्ट्रपतींकडे पाठवावा, अशी मागणी भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांच्याकडून करण्यात आली आहे.

‘सचिन वाझेंना व्हायचं होतं ‘सुपरकॉप’, ATS कडून अनेक धक्कादायक खुलासे

काय म्हणाले सुधीर मुनगंटीवार
‘गृहमंत्री देशमुख हे १५ फेब्रुवारी ते २७ फेब्रुवारी पर्यंत क्वारंटाइन होते, असा खुलासा शरद पवारांनी Sharad Pawar केला होता. देवेंद्र फडणवीस यांनी पवारांचा खुलासा धादांत असत्य आहे, हे दाखवून दिले आहे. आता तरी राष्ट्रवादीने गृहमंत्री देशमुख यांना निर्दोष ठरविण्याची घाई करू नये, असे भाजप नेते सुधीर मुनगंटीवार म्हणाले आहे. तसेच ‘राज्याच्या गृहमंत्र्यांनी मुंबईच्या पोलीस आयुक्तांना बार व पब चालकांकडून वसुली करण्यास सांगितले होते. परमबीर सिंग यांनी त्यांच्या पत्रात केलेल्या आरोपांचे कोणत्याच पोलिस अधिकाऱ्याने अथवा बार चालकांनी खंडन केलेले नाही, असेदेखील सुधीर मुनगंटीवार म्हणाले.

‘महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लावण्याऐवजी केंद्र सरकारच बरखास्त केलं पाहिजे’

‘पोलीस महासंचालक दर्जाच्या एका पोलिस अधिकाऱ्याने गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर अत्यंत गंभीर स्वरूपाचे आरोप केल्यामुळे त्या सर्व आरोपांची उच्च न्यायालयाच्या न्यायाधिशामार्फत, सर्वोच्च न्यायालयाच्या निरीक्षणाखाली किंवा सीबीआयमार्फत चौकशी होण्याची सध्या गरज आहे. माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी या अगोदरच ‘वर्षा’ या मुख्यमंत्र्याच्या निवासस्थानी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार Sharad Pawar, मुख्यमंत्री व मंत्रिमंडळातील प्रमुख मंडळींना या सर्व प्रकरणाची माहिती दिल्याचे त्यांनी आपल्या पत्रात स्पष्ट केले आहे. मात्र मुख्यमंत्र्यांनी परमबीर सिंग यांनी केलेल्या आरोपांची दखलसुद्धा घेतली नाही. तसेच या आरोपांबाबत शासनाकडून खुलासा प्रसिद्ध कारण्याची तसदीही मुख्यमंत्र्यांकडून घेण्यात आली नाही. परमबीर सिंग यांनी तक्रार केलेल्या संबंधित मंत्र्यावर व अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यास मुख्यमंत्री अपयशी ठरले आहेत. त्यामुळे राज्यपालांनी या सर्व घटनांबाबत मुख्यमंत्र्यांकडून अहवाल मागवावा आणि त्याची सत्यता पडताळून तो राष्ट्रपतींना पाठवावा, अशी मागणी सुधीर मुनगंटीवार यांच्याकडून करण्यात आली आहे. या संदर्भात भाजपचे शिष्टमंडळ राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेणार आहेत.

Also Read : 

सचिन वाझे प्रकरण : खंडणीप्रकरणात मुख्यमंत्री ठाकरेंचा हात; खासदार नवनीत राणांचा लोकसभेत आरोप

‘अनिल देशमुखांची वसुली देशाने पाहिली’, परमबीर सिंग यांच्या ‘त्या’ 100 कोटींच्या लेटरमुळे राज्यसभा, लोकसभेत गोंधळ

Pandharpur : अजित पवारांच्या बैठकीला सभेचे स्वरूप, पोलिसांत FIR दाखल

RJ : धान्याच्या कोठीमध्ये अडकले मुले, गुदमरून 5 जणांचा मृत्यू

Photos : ‘गंदी बात’ फेम महिमा गुप्ताच्या Hotness चा ‘कहर’ ! बिकिनीसोबतच शेअर केला ‘हा’ अवतार

खा. संजय राऊतांचा सरकारला सल्ला, म्हणाले -‘सरकारमधील प्रत्येक घटकानं आत्मपरीक्षण करावं’

‘परमबीर सिंग दिल्लीत कोणाला भेटले याची माहिती आमच्याकडे, सत्य सर्वांसमोर येईल

Sudhir Mungantiwar : ‘मुंबई पोलिसांना आता खंडणी यार्ड म्हटलं जाईल’

…म्हणून भाजपच्या कार्यकर्त्यांना कोरोना होत नाही, भाजप आमदाराचे अजब विधान

‘हा’ कटाचाच भाग, शिवसेनेने सांगितला घटनाक्रम !

पंढरपूरसाठी जनतेच्या मनातीलच उमेदवार दिला आहे, अजित पवारांनी दिले स्पष्ट संकेत

 

Related Posts