IMPIMP

बारामतीत भाजपाने जाळला गृहमंत्र्यांचा पुतळा

by bali123
BJP burns Home Minister anil deshmukh's statue in Baramati

बारामती : सरकारसत्ता ऑनलाइन – मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांनी केलेल्या आरोपानंतर गृहमंत्री अनिल देशमुख यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी करत बारामतीत रविवारी (ता. 21) भाजपाच्या BJP वतीने आंदोलन करण्यात आले. महाविकास आघाडी सरकारचा यावेळी ढोल वाजवत निषेध करण्यात आला. अनिल देशमुख यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले. देशमुख यांच्या निषेधाच्या घोषणा देत महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लावावी अशी मागणी करण्यात आली. बारामती शहर पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतले.

खा. संजय राऊतांचा सरकारला सल्ला, म्हणाले -‘सरकारमधील प्रत्येक घटकानं आत्मपरीक्षण करावं’

भिगवण चौकातील हुतात्मा स्तंभाजवळ भाजपाच्या BJP कार्यकर्त्यांनी ढोल वाजवत जोरदार घोषणा दिल्या. महाविकास आघाडी सरकारमधील मंत्री खंडणीखोर असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. भाजपाचे BJP शहर व तालुक्यातील प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते या आंदोलनात सहभागी झाले होते.

तपासावरून लक्ष विचलित करण्यासाठी परमबीर सिंग यांचे पत्र – जयंत पाटील

कोविड काळातील वीज बिल माफ न करता कारवाई करत वीज तोडणे, शेतकऱ्यांना नुकसान भरपाई न देणे, संपूर्ण कर्जमाफी न करणे, नियमित कर्ज परत करणाऱ्या शेतकऱ्यांच्या खात्यावर 50 हजार रुपये जमा न करणे, शेतकऱ्यांची वीज कापल्याने अनेकांना वणवण करावी लागत आहे, याचा निषेध करणाऱ्या सरकारच्या विरोधातील निवेदन देण्यात आले.

हेही वाचा

पंढरपूरचा उमेदवार शरद पवार ठरवतील

‘तलाश नए रास्तों की है…’ खा. संजय राऊतांच्या ट्विटने राजकीय वर्तुळात खळबळ

परमबीर सिंहांच्या पत्रामुळं गृहमंत्र्यांवर राजीनाम्याचा दबाव? शरद पवारांनी अजितदादांसह ‘या’ दिग्गज मंत्र्याला बोलावलं दिल्लीत

Sanjay Raut : ‘पहाटेचा शपथविधी घोडेबाजार नाही तर काय गाढवबाजार होता का ?’

मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमवीर सिंहांच्या ‘त्या’ पत्रामुळे भाजप आक्रमक, गृहमंत्र्यांचा राजीनामा?

मुलीला वडिलांच्या दुसऱ्या लग्नाबाबत सवाल उपस्थित करण्याचा अधिकार, मुंबई HC चा महत्वपूर्ण निकाल

Obesity Causes : ‘या’ 7 गोष्टीमुळं लठ्ठपणाचे शिकार होतात लोक, जाणून घ्या

Related Posts