IMPIMP

‘मातोश्री’वर बसून तुम्हाला काय कळणार लॉकडाऊन काय असतं?, भाजपची टीका

by pranjalishirish
bjp slams cm uddhav thackeray over thinking lockdown anand mahindra tweet facebook post

मुंबई : राज्यात कोरोना व्हायरसचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढत आहे. रुग्णसंख्येतही वाढ होत आहे. ही रूग्णसंख्या आटोक्यात आणण्यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न केले जात आहेत. तरीदेखील रुग्णसंख्या वाढतच आहे. त्यानंतर आता राज्यात लॉकडाऊन Lockdown  लागू होणार अशा चर्चा सुरू होत आहेत. त्यावरून भाजपकडून निशाणा साधला जात आहे.

लवकरच PM मोदी इम्रान खानसोबत लंडनमध्ये भोजन करतील, ‘या’ भाजप खासदाराचा पंतप्रधानांना टोला

देशात कोरोना व्हायरसचा संसर्ग वाढत आहे. देशातील एकूण रुग्णसंख्येपैकी सर्वाधिक रुग्णसंख्या एकट्या महाराष्ट्रात आहे. त्यामुळे ही रुग्णसंख्या नियंत्रणात आणण्यासाठी राज्यात पुन्हा एकदा लॉकडाऊन Lockdown करण्याचे सांगितलं जात आहे. त्यावरून भाजपने निशाणा साधला. ‘ठाकरे सरकार, लॉकडाऊनच्या पांघरुणाखाली अपयश लपवू नका. राज्यात कोणाचंही भविष्य उद्ध्वस्त करू नका. तुमच्या नाकर्तेपणाने कोणालाही बळी पडू देऊ नका. कोरोनाच्या काळात केंद्र सरकारने राज्याला सर्वतोपरी मदत केली. सर्व सोयी-सुविधा पुरवल्या. राज्याची गरज ओळखून लसींचे सर्वाधिक वाटप केले. मात्र, हे सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्यात ठाकरे सरकार पूर्णपणे अपयशी ठरलं आणि आता राज्यावर पुन्हा एकदा लॉकडाऊनचा धोका घोंघावतोय…’

बाळासाहेब ठाकरे स्मारकाच्या भूमिपूजनाचं आमंत्रण आम्हालाही नाही पण आम्ही Online पाहणार – अनिल परब

दरम्यान, ‘महिंद्रा अँड महिंद्रा’चे आनंद महिंद्रा यांनी लॉकडाऊनवरून ठाकरे सरकारला सल्ला दिला होता. त्यामध्ये त्यांनी म्हटले होते की, लॉकडाऊनचा फटका बसणाऱ्या लोकांमध्ये गरीब, स्थलांतरित मजुरांचा समावेश आहे. लॉकडाऊन  Lockdown हा रुग्णालये, आरोग्याच्या पायाभूत सुविधांसाठी केला होता. आता पुन्हा त्यावर लक्ष केंद्रित करूया आणि मृत्यू टाळूया.’

Also Read:

भाजपचं पित्त का खवळतंय ?, शरद पवार-अमित शहांच्या गुप्त भेटीवरुन शिवसेनेचे शरसंधान

शिवसेनेच्या प्रवक्त्यांची नवी यादी जाहीर ! संजय राऊत यांच्यावर सोपवली ‘ही’ मोठी जबाबदारी

‘महाविकास आघाडीला पुढील 25 वर्षे धोका नाही !’

पवार-शाह गुप्त बैठक ! ‘चंद्रकांत पाटील वगैरे नेते पतंगाच्या मांजावरून एवढे वर गेले की… “

‘जितेंद्र आव्हाड यांचे CDR आणि SDR जतन करा’, हायकोर्टाचे पोलिसांचा आदेश

लष्कर पेपर लिक प्रकरण : मेजर थिरु थंगवेल याला 25 लाख रुपयांच्या बदल्यात लष्कराचा पेपर पाठविला

‘आधी बुडणार्‍या रोजगाराचे पैसे बँक अकाऊंटमध्ये जमा करा, नंतरच Lockdown लावा’

‘केवळ RSS वाले तेवढे देशभक्त आणि बाकी सगळे देशद्रोही बनलेत’

एकनाथ खडसे यांनी उच्च न्यायालयात ED च्या कारवाईबद्दल दिली खळबळजनक माहिती, म्हणाले..

परमबीर सिंह यांच्या आरोपांची होणार चौकशी, निवृत्त न्यायमूर्तींच्या समितीची घोषणा

भाजप नेत्यांकडून ठाकरे सरकारवर टीका; म्हणाले – ‘सोडलेल्या हिंदुत्वाचे आणि कोत्या मनाचे पुन्हा एकदा दर्शन, फक्त आयत्या पिठावर रेघोट्या मारणाऱ्यांची नावं’

Related Posts