IMPIMP

देवेंद्र फडणवीसांचा CM उद्धव ठाकरेंना प्रश्न, म्हणाले – ‘…मग हा निर्लज्जपणा कुणाचा म्हणायचा ?’

by pranjalishirish
budget-session-maharashtra-2021-devendra-fadnavis-criticizes-cm-uddhav-thackeray

सरकारसत्ता ऑनलाइन – अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आज समारोप होणार आहे. आजही महाविकास आघाडी विरुद्ध भाजप सामना रंगताना दिसत आहे. सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात आजही अनेक आरोप-प्रत्यारोप होताना दिसत आहेत. बंद दाराआड वचन देणाऱ्यांना निर्लज्ज म्हणालात तर जाहीर वचन देऊन विसर पडणाऱ्यांना काय म्हणायचं, असं म्हणत भाजपचे विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्यावर निशाणा साधला आहे.

‘बजेटमध्ये कोणताही धाडसी निर्णय नाही, किमान समान कार्यक्रमाचं तरी पाहा’

देवेंद्र फडणवीस Devendra Fadnavis म्हणाले, बजेटमध्ये कोणताही धाडसी निर्णय नाही. विजेबद्दल सत्ताधारी पक्षातल्या लोकांनाही तोंड कसं द्यायचं हा प्रश्न पडला आहे. किमान समान कार्यक्रमाचं तरी पाहा. किमान सहा सात गोष्टी ज्या किमान समान कार्यक्रमात सांगितल्या होत्या, त्या नाही. आरोग्य विभागाचं बजेट अडीच हजार कोटींनी अधिक हवं होतं.

‘बंद दाराआड वचन देणारे जर निर्लज्ज, तर जाहीर वचन देणाऱ्यांना काय म्हणायचं’

पुढं बोलताना ते म्हणाले, सत्तेत नसताना शेतकऱ्यांचा बांधावर जाऊन 25 ते 50 हजार रुपये देण्याचे वचन दिले होते. पण सत्तेत आल्यावर आपल्याच वचनाचा विसर पडला. बंद दाराआड वचन देणाऱ्यांना निर्लज्ज म्हणाला होतात, तर जाहीर वचन देणाऱ्यांना काय म्हणायचं, असा सवाल करत फडणवीस Devendra Fadnavis यांनी मुख्यमंत्र्यांना टोला लगावला.

‘राजकीय हेतूनं हे झालं आहे’

फडणवीस Devendra Fadnavis असंही म्हणाले, मुख्यमंत्री जलसंवर्धन योजना सुरू केली. माथा ते पायथा तत्त्वाचा वापर नाही. पाणलोट क्षेत्रात कामं आहेत. ठेकेदारांना फायदा देणारी योजना आहे. मुख्यमंत्री ठाकरे यांनी कॅगच्या अहवालाचा संदर्भ दिला. पण यातला एकही शेरा भ्रष्टाचाराचा नाही. कॅगनं आपले शेरे आणि खुलासा मागवणारे पत्र पाठवले. राज्य सरकारनं अहवाल जाहीर केल्यावर मग त्यावरच्या आक्षेपांना उत्तर दिलं. जाणूनबुजून सरकारनं नंतर उत्तर दिलं. जेणेकरून शेरे तसेच राहावेत. राजकीय हेतूनं हे झालं आहे अशी टीकाही त्यांनी यावेळी बोलताना केली.

‘सरकारनं शेतकऱ्यांची कोणती कर्जमुक्ती केली आहे?’

देवेंद्र फडणवीस Devendra Fadnavis म्हणतात, सरकारनं शेतकऱ्यांची कोणती कर्जमुक्ती केली आहे. गेल्या कर्जमुक्तीत 55 लाख जणांना फायदा झाला. यंदा 31 जणांना 57 टक्के शेतकरी पीक कर्जापासून दूर आहेत. अनेक बँका बंद आहेत. शेतकऱ्यांचं कोरोना काळात मोठं नुकसान झालं आहे, असंही त्यांनी यावेळी नमूद केलं.

Also Read :

‘मुंबई पोलिसांचे, थोबाड काळे झाले’, पोलिसांबद्दल फडणवीस असं कसं बोलू शकतात ?

नाना पटोलेंचा हल्लाबोल, म्हणाले – ‘ज्वलंत प्रश्नांवरून लक्ष दुसरीकडे वळवण्यासाठी भाजपकडून वाझेंना टार्गेट

Gold Rates Today : सणासुदीमध्ये पुन्हा एकदा स्वस्त झालं सोनं-चांदी, 40 हजारांपेक्षा कमी होणार दर ? जाणून घ्या आजचे भाव

Maharashtra Budget 2021 : विरोधक आक्रमक म्हणताहेत; ‘आज त्यांना आम्ही सोडणार नाही’

Related Posts