IMPIMP

Chandrakant Patil | चंद्रकांत पाटील राष्ट्रवादीच्या बंडखोर उमेदवाराच्या भेटीला; चर्चेला उधाण

by nagesh
Chandrakant Patil | bjp leader chandrakant patil met ncp rebel candidate dnyandev ranjane in satara

सातारा : सरकारसत्ता ऑनलाइन Chandrakant Patil | जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे (NCP) आमदार शशिकांत शिंदे (MLA Shashikant Shinde) यांचा अवघ्या एका मताने पराभव झाला. त्यांच्या जागी राष्ट्रवादीचे बंडखोर उमेदवार ज्ञानदेव रांजणे (Dnyandev Ranjane) विजयी झाले. यानंतर आज (सोमवारी) भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी रांजणे यांच्या निवासस्थानी भेट घेत त्यांना विजयी झाल्याबद्दल शुभेच्छा दिल्या आहेत. जिल्हा बँक निवडणुकीच्या निकालाच्या निमित्तानं साताऱ्यात नव्या समीकरणाची अर्थात पाॅलिटीकल टेस्टींग भाजपकडून (BJP) सुरू झाल्याची चर्चा आहे.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीला (NCP) जोरदार धक्का बसला. शशिकांत शिंदे यांचा पराभव झाल्याने राजकीय वातावरणात खळबळ उडाली.
राष्ट्रवादीचेच बंडखोर उमेदवार ज्ञानदेव रांजणे यांनी शशिकांत शिंदे यांच्या विरोधात अर्ज दाखल करून त्यांचा पराभव केला.
त्यानंतर शिंदे यांच्या समर्थकांनी पक्षाच्या कार्यालयावर दगडफेक केली.
यामुळे सातारा राष्ट्रवादीतील मतभेद उघड दिसून आले. यातच आता चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी ज्ञानदेव रांजणे यांची भेट घेतली आहे. यामुळे चर्चेला उधाण आलं आहे.

त्यावेळी बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले, ‘सरकार पडेल असं म्हटलं कोणाच्या पोटात दुखायची गरज नाही. प्रत्येक वेळी माझ्या म्हणण्याला आधार असतो.
प्रत्येक गोष्ट ठरल्या वेळी होते असं मानणारा मी माणूस आहे. त्यामुळं मी म्हणत राहणार आणि तसं म्हणण्याचं मला स्वातंत्र्य आहे.
तर, ‘राजकारणात कोणी कोणावर अवलंबून नसतं. जेव्हा गणितं जमत नाहीत, तेव्हा माणसं बाहेर पडतात. प्रत्येक गोष्टीची एक वेळ ठरलेली असते.
सरकार पडण्याची वेळ काय आहे हे मला माहीत नाही. मी इतका अंतर्ज्ञानी असतो तर हिमालयातच गेलो असतो.
असा टोला चंद्रकांत पाटील यांनी महाविकास आघाडीतील (Mahavikas Aghadi) नेत्यांवर लगावला.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

दरम्यान, चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) हे आता हस्तरेषा बघतात असं वाटत असल्याचं राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी टोला लगावला होता.
पवारांच्या या टीकेला पाटील यांनी आज उत्तर दिलंय. दरम्यान, ते म्हणाले, ज्ञानदेव रांजणे (Dnyandev Ranjane) यांची सदिच्छा भेट घेतली.
मी विद्यार्थी चळवळीतून आलेला माणूस आहे. संघर्ष करत आलोय. त्यामुळं संघर्ष करणाऱ्या माणसाबद्दल मला अप्रूप असतं. मी तशा लोकांना भेटतो.
मी त्यांना भेटल्यामुळं रांजणेंची निष्ठा बदलत नाही. कुठल्याही दबावाला ते बळी पडले नाहीत याबद्दल त्यांचं अभिनंदनासाठी आलोय.
तर, सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेची (Satara District Central Bank) सूत्रे भाजपकडे (BJP) येत असतील तर लागेल ती मदत करू, असं देखील चंद्रकांत पाटील यांनी म्हटलंय.

Web Title : Chandrakant Patil | bjp leader chandrakant patil met ncp rebel candidate dnyandev ranjane in satara

हे देखील वाचा :

Pune News | शाळा सुरू करण्यासाठी आरोग्य विभागाची नियमावली जारी; जाणून घ्या सविस्तर

Pune Crime | पुण्यात रस्त्यावरील गुंडागर्दीत तुफान वाढ ! रिक्षाचालक, कामगार, ज्येष्ठ महिला, तरुणांना भर रस्त्यात गाठून लुबाडण्याच्या घटना

Omicron Variant | ‘ओमिक्रॉन’ व्हेरिएंट ‘डेल्टा’पेक्षा 6 पट घातक, ‘या’ 6 लक्षणांकडे अजिबात दुर्लक्ष करु नका; जाणून घ्या

Related Posts