IMPIMP

Nashik Police News | नाशिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई, गुटख्यासह 30 लाखांचा मुद्देमाल जप्त (Video)

by sachinsitapure

नाशिक : सरकारसत्ता ऑनलाइन -Nashik Police News | नाशिक पोलिसांच्या गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाने (Nashik Crime Branch) मोठी करवाई केली आहे. पोलिसांच्या पथकाने अवैधपणे गुटखा वाहतूक (Gutkha Transportation) करणाऱ्या दोन आरोपींना ट्रकसह ताब्यात घेतले आहे. आरोपींकडून 18 लाख 57 हजार रुपयांचा गुटखा आणि ट्रक असा एकूण 30 लाख 7 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई गुरुवारी (दि.4) मोती सुपर मार्केट, पेठरोड पंचवटी येथे करण्यात आली.

ट्रक चालक अमोल ज्ञानोबा इंगुळकर (वय-37 रा. मु.पो. कामथडी ता. भोर, जि. पुणे), क्लिनर जाबीर अफजल बागवान (वय-36 रा. बुधवार पेठ, सातारा) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. याबबत पोलीस हवालदार प्रदिप म्हसदे यांनी सरकारच्या वतीने पंचवटी पोलीस ठाण्यात (Panchavati Police Station) फिर्य़ाद दिली आहे.

पोलीस आयुक्त संदिप कर्णिक (Sandeep Karnik IPS) यांनी नाशिक शहरामध्ये चोरून लपून प्रतिबंधीत असलेल्या अन्न पदार्थांची व तंबाखूची अवैधपणे विक्री करणाऱ्यांची माहिती काढून त्यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश दिले होते. त्या अनुषंगाने गुरुवारी गुन्हे शाखा युनिट एकचे पथक पेट्रोलींग करत होते. त्यावेळी पोलीस अंमलदार प्रदिप म्हसदे यांना माहिती मिळाली की, ट्रकमधून (एमएच 12 एम.व्ही 7510) दोन जण प्रतिबंधीत असलेला पानमसाला व सुगंधी तंबाखू (गुटखा) गाडीत भरून अवैध विक्री करण्यासाठी पेठकडून भक्तीधाम कडे दुपारी तीन ते चारच्या दरम्यान येणार आहेत.

मिळालेल्या माहितीच्या आधारे युनिट एकच्या पथकाने पेठरोड पंचवटी येथील मोती सुपर मार्केट समोर सापळा लावला. त्यावेळी एक ट्रक येताना दिसला. ट्रक थांबवून चालकाकडे चौकशी केली असात त्याने ट्रकमध्ये हिरा पानमसाला व सुगंधीत तंबाखु असल्याचे सांगितले. पथकाने ट्रकची झडती घेऊन महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधीत केलेला 18 लाख 57 हजार 120 रुपयांचा गुटखा व ट्रक जप्त केला. पुढील तपास पंचवटी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक पडोळकर करीत आहेत.

ही कामगिरी पोलीस आयुक्त संदिप कर्णिक, पोलीस उपायुक्त (गुन्हे) प्रशांत बच्छाव ( Prashant Bachhav DCP), सहायक पोलीस आयुक्त (गुन्हे) डॉ. सिताराम कोल्हे (Dr Sitaram Kolhe ACP) यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड (PI Madhukar Kad), सहायक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर (API Hemant Todkar), पोलीस उपनिरीक्षक गजानन इंगळे (PSI Gajanan Ingale) , रविंद्र बागुल, पोलीस अंमलदार प्रदीप म्हसदे, विशाल काठे, संदिप भांड, नाझीमखान पठाण, प्रविण वाघमारे, प्रशांत मरकड, विशाल देवरे, विलास चारोस्कर, जगेश्वर बोरसे, मुक्तार शेख, राजेश राठोड, महिला पोलीस अंमलदार अनुजा येवले, चालक समाधान पवार यांच्या पथकाने केली.

Pune Crime News | पुणे : 57 कोटींचा कर बुडवणाऱ्या बिअर कंपनीला दणका, संचालकांवर गुन्हा दाखल

Related Posts