IMPIMP

‘चंद्रकांत पाटलांनी ब्राह्मण समाजाची दिशाभूल करू नये !’

by amol
Chandrakant Patil

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन (Sarkarsatta Online)शिवसेनेनं (Shiv Sena) भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांच्यावर निशाणा साधत टीका केली आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी ब्राह्मण समाजाला गृहित धरू नये व त्यांची दिशाभूल करू नये. ब्राह्मण समाजाविषयी तुमचा असलेला कळवळा हे पुतना मावशीचं प्रेम आहे आणि ते समाजाच्या लक्षात आलेलं आहे असं शहर शिवसेनेनं म्हटलं आहे.

शिवसेना म्हणते की, पाटील (Chandrakant Patil) हे ब्राह्मण समाजाच्या काही मंडळींना भेटून मागच्या सरकारमध्ये ब्राह्मण समाजातील आर्थिक दुर्बल कुटुंबातील विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक मदत म्हणून अमृत नावानं महामंडळ प्रस्थापित होतं. महामंडळांचं नाव निश्चित झालं आणि महाविकास आघाडीचं सरकार आहे आणि हा प्रस्ताव बारगळला अशी खोटी माहिती पसरवत आहेत असा आरोप शिवसेनेनं पत्रकाद्वारे केला आहे.

गेली 70 वर्षे बहुतांशी ब्राह्मण समाज भाजपच्या मागे उभा होता.
परंतु सातत्यानं रेटून खोटं बोलून समाजाला फसवण्याच्या पलीकडे आपण त्यांना काही दिलं नाही.
त्यामुळं समाज आज अस्वस्थ आहे आणि तो शिवसेनेकडे सरकतो आहे.
या भीतीपोटी ब्राह्मण समाजाला पुन्हा एकदा फसवण्याचा प्रयत्न करत आहात असं सेनेचे शहर प्रमुख
संजय मोरे, शाम देशपांडे, प्रशांत बधे, आनंद दवे आणि शिरीष आपटे यांनी पत्रकात म्हटलं आहे.

Pooja Chavan Suicide Case : ‘सत्ताधारी तिन्ही पक्ष बलात्कारी व्यक्तीला वाचवण्याच्या प्रयत्नात’, चित्रा वाघ यांचा आरोप

Photos : किचनमध्ये काम करताना दिसली सुहाना खान ! ‘अशी’ दिली पोज

ग्रामीण भागातील बांधकामांबद्दल ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांचा मोठा निर्णय !

Related Posts