IMPIMP

जेव्हा CM ठाकरे फडणवीसांना म्हणाले- ‘माझं आजोळ माझ्यापासून तोडू नका !’

by sikandershaikh
Uddhav-thackeray.

सरकारसत्ता ऑनलाइन (Sarkarsatta Online)विधीमंडळाच्या अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशी (बुधवार, दि 3 मार्च) देखील महाविकास आघाडी सरकार विरुद्ध भाजप असा सामना रंगल्याचं चित्र दिसत आहे. विदर्भ आणि मराठवाडा वैधानिक विकास महामंडळावरून अधिवेशनाच्या पहिल्याच दिवसापासून सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात जुंपताना दिसत आहे. विरोधकांनी यावरून सरकावर हल्ला चढवला होता. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी याला आता उत्तर दिलं आहे. वैधानिक विकास महामंडळावरून भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि भाजप नेते सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी सरकारला धारेवर धरलं होतं. सीएम ठाकरेंनी यावरून आता भाजप नेत्यांना फटकारलं आहे.

‘विदर्भ वेगळा होणार नाही. मी तो होऊ देणार नाही’

राज्यपालांच्या भाषणावरील चर्चेदरम्यान बोलताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (uddhav thackeray) म्हणाले, अरे हा, ते एक राहिलं विदर्भाचं, माझं आजोळ. मी नाही विसरलो. पण माझं आजोळ माझ्यापासून तोडण्याच विचार तुमच्या मनात आहे तो पहिला सोडून द्या. विदर्भ वेगळा होणार नाही. मी तो होऊ देणार नाही.

‘आजोळ माझ्यापासून तोडू नका’

पुढं बोलताना ठाकरे म्हणाले, विदर्भाला आम्ही सोबत ठेवून महाराष्ट्राचा एकत्रित विकास केल्याशिवाय आम्ही राहणार नाही.
फक्त विदर्भाचा कणव आणायचा, माझ्या आजोळाची आठवण मला करून द्यायची.
माझं आजोळ माझ्यापासून तोडू नका असं म्हणत ठाकरेंनी भाजपला इशाराच दिला आहे.

’12 आमदारांची नावं जाहीर केल्यावर वैधानिक विकास महामंडळ घोषित करू’

दरम्यान अजित पवार यांनीही यावर भाष्य करत उत्तर दिलं होतं.
अजित पवार म्हणाले, आमचं सरकार विदर्भ मराठवाडा विकास मंडळ झालं पाहिजे या मताचं आहे.
8 तारखेला बजेटमध्ये विकास मंडळाबद्दल जे ठरलं आहे त्याचे आकडे पहायला मिळतील.
आमचं लवकरात लवकर करायचं ठरलं आहे.
ज्या दिवशी राज्यपाल 12 आमदारांची नावं जाहीर करतील त्या दिवशी किंवा त्याच्या दुसऱ्या दिवशी आम्ही विदर्भ आणि मराठवाडा वैधानिक विकास महामंडळ घोषित करू.
बजेटमध्ये तसा निधीही ठेवला आहे असंही पवारांनी सांगितलं.

Video : सुधीर मुनगंटीवारांचा सरकारला इशारा, म्हणाले- ‘आता एकच पर्याय तो म्हणजे राष्ट्रपती राजवट, मी रोज मागणी करणार !’

Related Posts