IMPIMP

संजय राऊतांच्या ‘त्या’ विधानावर नाना पटोले यांनी दिली पहिली प्रतिक्रिया, विषय बनू शकतो ‘गंभीर’

by pranjalishirish
congress nana patole on shivsena sanjay raut upa chairperson ncp sharad pawar

 सरकारसत्ता ऑनलाइन टीम – राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी युपीए (UPA) चं नेतृत्व करावं असा पुनरुच्चार शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केला आहे. युपीए विकलांग झाला आहे असंही ते म्हणाले आहेत. त्यांच्या विधानावर आता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मुंबईतील पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी याबाबत भाष्य केलं.

‘दूध का दूध, पानी का पानी करावं’ – गृहमंत्री अनिल देशमुख

‘ज्या गोष्टीशी संबंध नाही त्यावर राऊतांनी चर्चा करू नये इतकाच आमचा सल्ला आहे’

संजय राऊतांच्या Sanjay Raut युपीएच्या विधानावर प्रतिक्रिया देताना नाना पटोले म्हणाले, युपीएचं नेतृत्व कोणी करावं हे युपीएच्या सदस्यांनी ठरवलं आहे. परवाच मी राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडे उल्लेख केला होता की, ते (राऊत) शरद पवार साहेबांचे प्रवक्ते आहेत का. ज्या गोष्टीशी संबंध नाही त्यावर राऊतांनी चर्चा करू नये इतकाच आमचा सल्ला आहे असंही नाना पटोले यांनी सांगितलं.

अजित पवारांचा विरोधकांना टोला, म्हणाले -‘आमचे सरकार पडेल ही विरोधकांची पहिल्या दिवसापासूनची इच्छा, पण…’

नेमकं काय म्हणाले होते संजय राऊत ?

संजय राऊत Sanjay Raut  म्हणाले होते की, काँग्रेसमध्ये नाराजी वगैरे नाही. किंबहुना काँग्रेस पक्षातूनच अशा सूचना येत आहेत. युपीए अधिक मजबूत होण्यासाठी ही काँग्रेस पक्षातील अनेक ज्येष्ठ नेत्यांची भूमिका आहे. सोनिया गांधींचीही तशी भूमिका असू शकते. सोनिया गांधींनी प्रदीर्घ काळ युपीएचं नेतृत्व खंबीरपणे केलं आहे. परंतु त्यांची प्रकृती चांगली नसते. देशात सध्या अनेक घडामोडी घडत आहेत. अशावेळी युपीएचं नेतृत्व काँग्रेसबाहेरील नेत्यानं करावी ही अनेक राज्यांमधील प्रादेशिक पक्षांची मागणी आहे. आज युपीए अत्यंत विकलांग अवस्थेत आहे असंही राऊत यांनी यावेळी बोलताना सांगितलं.

‘केरळचे लोक सुशिक्षित असल्याने भाजपला मतं मिळत नाही’, भाजप नेत्याचे वक्तव्य

‘युपीएची ताकद कमी झालीय, त्याचं नेतृत्व आता शरद पवार यांनी करावं’

पुढं बोलताना राऊत  Sanjay Raut म्हणाले होते की, देशात भाजपप्रणित एनडीएसमोर काँग्रेसप्रणित युपीए प्रमुख विरोधकांची भूमिका निभावत आहे. मात्र आता युपीएची ताकद कमी झाली असून नेतृत्व राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी करावं अशी भूमिकाही राऊत यांनी यावेळी बोलताना मांडली होती.

Also Read : 

मोठी बातमी ! अखेर राऊतांनी फडणवीस मुख्यमंत्री न होण्याचे सांगितलं कारण; म्हणाले…

परमबीर सिंग, गृहमंत्री देशमुख यांच्यातील वाद उच्च न्यायालयात, 30 मार्चला सुनावणी

Param Bir Singh : परमबीर सिंग यांच्याबाबत राज्य सरकारनं घेतला मोठा निर्णय, मुंबईचे माजी पोलिस आयुक्त येऊ शकतात अडचणीत

सरकारी कर्मचार्‍यांना आठवड्यात मिळेल 3 दिवसांची सुट्टी ? जाणून घ्या केंद्र सरकारचे उत्तर

‘दूध का दूध, पाणी का पाणी करावं’ – गृहमंत्री अनिल देशमुख

वेगवेगळया विचारसरणींच्या पक्षांनी एकत्र येऊन स्थापन केलेल्या सरकारांबाबत इतिहास काय सांगतो ? जाणून घ्या

Related Posts