IMPIMP

ऐकावे ते नवलच ! लग्नाच्या 8 दिवसानंतर नववधूने 5 तोळ्यांच्या दागिन्यासह ठोकली धूम

by bali123
married woman and parents run with five ounces of gold jewelry junner

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन – लग्नानंतर अवघ्या आठ दिवसातच मावशी आजारी असल्याचा बहाणा करून घरातील 5 तोळे दागिने अंगावर घालून नववधू पसार झाल्याची धक्कादायक घटना पुणे जिल्ह्यात भराडी (ता. आंबेगाव) येथे घडली. या प्रकरणी नवरदेवाने मंचर पोलीस ठाण्यात Manchar Police Thane फिर्याद दिली आहे.

याप्रकरणी नितीन कांताराम कुरकुटे या नवरदेवाने मंचर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार नवनाथ महादेव गवारी ( रा. मेंगडेवाडी ता. आंबेगाव,जि. पुणे), लक्ष्मी मच्छिंद्र चव्हाण ( मुलगी), कमल नामदेव जाधव (मावशी), महादेव लक्ष्‍मण चिंचवड (मामा) व काळे नावाचा इसम सर्व रा.शिंगणापूर तालुका जिल्हा, परभणी ) याविरोधात फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मंचर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी लग्नासाठी मुलगी शोधत असताना मध्यस्थी नवनाथ गवारी याने परभणी जिल्ह्यातील शिंगणापूर येथील लक्ष्मी मच्छिंद्र चव्हाण या मुलीचे स्थळ सुचवले. त्यानंतर कुरकुटे यांनी गवारी यांना मध्यस्थीचे दीड लाख रुपये दिले होते. मुलीची मावशी, मामा आणि काळे नावाचा इसम तिघांनी घाईगडबड करून लग्नाची तारीख काढण्यास सांगितले. त्यानंतर दिनांक 15 फेब्रुवारी 2021 रोजी भराडी येथे फिर्यादीच्या घरी साध्या पद्धतीने विवाह केला. त्यानंतर 8 दिवसातच मुलीने तिची मावशी आजारी असल्याचे सांगून अंगावर 5 तोळे दागिने घालून गेली. आठ ते दहा दिवस होऊनही ती घरी आली नाही. त्यामुळे लक्ष्मी कुठे गेली असेल अशी चौकशी केली असता नवरी मुलगी आणि तिच्याबरोबर असलेले मामा, मावशी हे शिंगणापूर येथील पत्त्यावर राहत नसल्याचे समजले. त्यानंतर फिर्यादी कुरकुटे यांनी लग्न जमविणारे मध्यस्थी गवारी यांना संपर्क केला असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. कुरकुटे यांनी फसवणूक झाल्याचे लक्षात येताच मंचर पोलीस ठाण्यात Manchar Police Thane फिर्याद दिली आहे. त्यानुसार मंचर पोलीस तपास करत आहेत.

Also Read :

धनंजय मुंडेंना दुसऱ्यांदा ‘कोरोना’ची लागण

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी यांना देखील ‘कोरोना’ची लागण, यापूर्वीच आदित्य आढळले होते Covid-19 पॉझिटिव्ह

‘टार्गेट’ मिळाल्याची वाझेंकडून NIA कबुली? घेतले आणखी एका बड्या मंत्र्याचे नाव? महाविकास आघाडीच्या गोटात खळबळ

‘देवेंद्र फडणवीस हे अहंकारी आणि लबाड, माझ्याकडे त्यांच्या प्रकरणांचा गठ्ठा !’

Phone Tapping : ‘काँग्रेसचा हिस्सा किती हे त्यांनी सांगावं?’

West Bengal Election 2021 : बंगालमध्ये ना TMC ना BJP ला मिळणार बहुमत, लेफ्ट-कॉंग्रेस बनणार ‘किंगमेकर’

मुंबई गुन्हे शाखेत मोठे फेरबदल ! 65 अधिकाऱ्यांची एकाचवेळी उचलबांगडी

Casting Couch : ‘काम हवं असेल तर माझ्यासोबत झोप’, अंकिता लोखंडेचा निर्मात्याबद्दल ‘खळबळजनक’ खुलासा

Related Posts