IMPIMP

‘अनिल देशमुखांची वसुली देशाने पाहिली’, परमबीर सिंग यांच्या ‘त्या’ 100 कोटींच्या लेटरमुळे राज्यसभा, लोकसभेत गोंधळ

by pranjalishirish
country saw anil deshmukhs recovery rajya sabha lok sabha chaos Prakash Javadekar due parambir singh letter bomb

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – १०० कोटी रुपयांच्या वसुलीच्या लेटरमुळे राज्यात चांगलाच वाद निर्माण झाला आहे. या प्रकरणाचे प्रतिसाद लोकसभेतसुद्धा पाहायला मिळाले आहे. या प्रकरणामुळे राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार सदस्य असलेल्या राज्यसभेत मोठा गदारोळ झाल्याने राज्यसभेचे कामकाज दुपारी दोन वाजेपर्यंत तहकूब केले गेले आहे. केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर Prakash Javadekar यांनी राज्यसभेत तर भाजपचे खासदार राकेश सिंह यांनी लोकसभेत हा मुद्दा उचलून धरला आहे. यामध्ये महाराष्ट्राचे गृहमंत्री वसुली करतात हे साऱ्या देशाने पाहिल्याचा आरोप प्रकाश जावडेकर Prakash Javadekar यांच्याकडून करण्यात आला आहे. यामुळे राज्यसभेत मोठा गदारोळ झाल्याने राज्यसभेच्या सभापतींनी हे काहीही रेकॉर्डवर घेतले जाणार नसल्याचे स्पष्ट केले आहे.

‘महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लावण्याऐवजी केंद्र सरकारच बरखास्त केलं पाहिजे’

फक्त राज्यसभेत नाहीतर लोकसभेतसुद्धा राकेश सिंह यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लगेच राजीनामा द्यावा तसेच केंद्रीय तपास संस्थांकडून या प्रकरणाची चौकशी करण्यात यावी अशी मागणी केली आहे. एखाद्या एपीआयच्या समर्थनात मुख्यमंत्र्यांकडून पत्रकार परिषद घेण्यात आली. त्याच एपीआयला म्हणजेच सचिन वाझेला १०० कोटी रुपयांचे लक्ष दिले होते.या साऱ्या प्रकरणावर शिवसेनेचे राज्यसभा खासदार यांनी महाराष्ट्रातील सरकार पाडण्यासाठी मोठ्या काळापासून प्रयत्न करण्यात येत आहे. परमबीर सिंग यांच्या विरोधात काही आरोप करण्यात आले आहे सध्या त्याची चौकशी सुरु आहे.

‘सचिन वाझेंना व्हायचं होतं ‘सुपरकॉप’, ATS कडून अनेक धक्कादायक खुलासे

या प्रकरणावरून खासदार नवनीत राणा यांच्याकडून देखील मुख्यमंत्र्यांवर गंभीर आरोप करण्यात आले आहे. निलंबित झालेल्या पोलिसाला कोणत्या आधारे पुन्हा सेवेत घेतले? तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सचिन वाझेला पोलीस दलात घेण्याची विनंती केली होती मात्र फडणवीस यांनी ती नाकारली. त्यानंतर जेव्हा ठाकरे सरकार आले तेव्हा त्यांनी सचिन वाझे यांना परत पोलीस दलात घेतल्याचा आरोप नवनीत राणा यांच्याकडून करण्यात आला आहे.

Also Read : 

Sudhir Mungantiwar : ‘मुंबई पोलिसांना आता खंडणी यार्ड म्हटलं जाईल’

…म्हणून भाजपच्या कार्यकर्त्यांना कोरोना होत नाही, भाजप आमदाराचे अजब विधान

‘हा’ कटाचाच भाग, शिवसेनेने सांगितला घटनाक्रम !

पंढरपूरसाठी जनतेच्या मनातीलच उमेदवार दिला आहे, अजित पवारांनी दिले स्पष्ट संकेत

Pandharpur : अजित पवारांच्या बैठकीला सभेचे स्वरूप, पोलिसांत FIR दाखल

RJ : धान्याच्या कोठीमध्ये अडकले मुले, गुदमरून 5 जणांचा मृत्यू

Photos : ‘गंदी बात’ फेम महिमा गुप्ताच्या Hotness चा ‘कहर’ ! बिकिनीसोबतच शेअर केला ‘हा’ अवतार

खा. संजय राऊतांचा सरकारला सल्ला, म्हणाले -‘सरकारमधील प्रत्येक घटकानं आत्मपरीक्षण करावं’

‘परमबीर सिंग दिल्लीत कोणाला भेटले याची माहिती आमच्याकडे, सत्य सर्वांसमोर येईल

Related Posts