IMPIMP

Ajit Pawar : ‘प्री-वेडिंग’ शूटच्या माध्यमातून पर्यटन विकास साधा !

by omkar

रायगड : सरकारसत्ता ऑनलाइन – सध्या प्री-वेडिंग (Pre-wedding shoot) शूटचा ट्रेंड आहे. लग्नाआधीच्या आठवणींसाठी विवाह बंधनात अडकणारे जोडपे असे चित्रिकरण करतात. प्री-वेडिंग शूटचा व्यवसाय आहे. त्यामुळे गड-किल्ले यावर प्री-वेडिंगचे शूटींग करताना त्यांना अडवू नका.
प्री-वेडिंग शूटच्या (Pre-wedding shoot) माध्यमातून पर्यटन विकास कसा साधता येईल याचा विचार करा. त्याबाबत आवश्यक ती नियमावली जिल्हाधिकारी अन् पोलीस अधिक्षक यांनी एकत्रित तयार करावी.
तसेच त्यासाठी काही शुल्कही आकारावे. प्री-वेडिंग शूटकडे उत्पन्नाचा स्त्रोत म्हणून पाहा, असा सल्ला राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिला आहे.

शिवराज्याभिषेक दिन सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर संभाजीराजेंचे नवं ट्वीट

पालकमंत्री आदिती तटकरे यांच्या मतदारसंघातील श्रीवर्धनमधील बीच सुशोभीकरण आणि 23 कोटी रुपयांच्या पाणीपुरवठा प्रकल्पाचे भूमिपूजन उपमुख्यमंत्री पवार यांच्या हस्ते झाले.
त्यावेळी ते बोलत होते. पवार यांच्या सल्ल्यामुळे येत्या काळात समुद्रकिनारी, पर्यटनस्थळी प्री-वेडिंग करणाऱ्या जोडप्यांना अन् शूटिंग करणाऱ्यांना आता कोणतीही अडचण येणार नसल्याचे दिसून येते.
अनेक वेळा प्री-वेडिंग शूटिंगसाठी नियमावली नसल्याने भांडणाचे प्रसंग निर्माण होत असतात.
त्यामुळे पोलिसांपर्यंत हा विषय जातो मात्र, त्यांना परवानगी दिल्यास हे वाद टाळले जातील, असेही पवार यावेळी स्पष्ट केले.

… तर कॉन्ट्रॅक्टरला ब्लॅकलिस्ट केल्याशिवाय राहणार नाही

तसेच गेल्या 5 वर्षात 4 वादळ आली. पण राज्य सरकार तुमच्यासोबत आहे. केंद्र सरकारचे नियम लहान असतील तरी साडेतीन पट पैसे देण्याचे काम राज्याने केले आहे. विकासाची सुरुवात झाली.
पण कामाला सुरुवात करताच कोरोनाने शिरकाव केला. त्यामुळे गेल्या 14 महिन्यांपासून राज्याच्या तिजोरीत येणारा पैसा कमी झाला. विकासकामे चांगली झाली पाहिजेत.
नाहीतर कॉन्ट्रॅक्टरला ब्लॅकलिस्ट केल्याशिवाय राहणार नाही, हे आधीच सांगून ठेवतोय. असा इशाराही पवार यांनी यावेळी दिला.

Also Read:- 

Dark Mode : डार्क मोडमध्ये कधीही वापरू करू नका स्मार्टफोन, जाणून घ्या कारण

Maratha Reservation : मराठा आरक्षण रद्द होण्यामागे ‘हे’ 2 महत्वाचे कायदेशीर मुद्दे; जाणून घ्या

खुशखबर ! भारतात मुलांना याच महिन्यात मिळू शकते व्हॅक्सीन, जाणून घ्या कुठपर्यंत पोहचली तयारी

नागिण 3 फेम अभिनेता पर्ल पुरी याला बलात्कार प्रकरणात अटक

Pune : पीएमपी संचालक राजीनामा नाट्याचा पुढील अंक ‘पोलिस ठाण्यात’ ! भाजपच्या कारभारावर राष्ट्रवादी काँग्रेसचा ‘हल्ला’

Gold Silver Price Today : 2 दिवसांमध्ये सोनं 1000 रूपयांनी ‘स्वस्त’, चांदी देखील घसरली; जाणून घ्या आजचे दर

कल्याणमध्ये एका घरात आढळली शेकडो कोरी मतदान ओळखपत्र, प्रचंड खळबळ

मोफत रेशन घेण्यासाठी घरबसल्या बनवा रेशन कार्ड; जाणून घ्या ऑनलाइन प्रोसेस

Monsoon 2021 : 2 दिवसांत महाराष्ट्रात धडकणार ‘मान्सून’ !

 

Related Posts