IMPIMP

Devendra Fadnavis | फडणवीसांचा ठाकरे सरकारवर घणाघात; म्हणाले – ‘कायद्याचं राज्य नव्हे, ‘काय ते द्या’चं राज्य’

by nagesh
Governor Appointed MLA | kolhapur shivsena city chief sunil modi plea set back for bjp in legislative council speaker election

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन  Devendra Fadnavis | भाजपा (BJP) महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणीची बैठक आज (मंगळवारी) मुंबईत होत आहे. त्यावेळी माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी ठाकरे सरकारवर (Thackeray government) जोरदार घणाघात केला आहे. ”महाराष्ट्राच्या इतिहासातलं सर्वात भ्रष्ट सरकार म्हणून या सरकारची नोंद इतिहासामध्ये होणार आहे,” अशा शब्दांत देवेंद्र
फडणवीस यांनी ठाकरे सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडलं आहे. त्यावेळी ते माध्यमांशी बोलत होते.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

 

देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) म्हणाले की, ”राज्यात हजारो कोटींची लूट सध्या सुरू आहे.
शेतकऱ्यांच्या वाटेला काहीच येत नाही, तसेच, सध्याचं हे सरकार म्हणजे कायद्याचं राज्य नसून काय ते द्या..फक्त घेण्याचं, वसुली करण्याचं राज्य चालवत आहे,” अशा शब्दांत फडणवीस यांनी राज्य सरकारचा तिरस्कार केला आहे.

पुढे फडणवीस म्हणाले, “महाराष्ट्राच्या इतिहासातलं सर्वात भ्रष्ट सरकार म्हणून या सरकारची नोंद इतिहासामध्ये होणार आहे. आज ज्या प्रकारे वसुली चाललेली आहे, म्हणजे केवळ माजी गृहमंत्री जेलमध्ये आहेत एवढ्यापुरतं हे सीमित नाही. जसा एक वाझे आपण बघितला, तसा प्रत्येक विभागात एक वाझे आहे. आणि ज्याप्रकारे सरकार सामान्यांकरता नाही, तर सरकार जे चाललेलं आहे ते कायद्याचं राज्य नाही, काय ते द्याचं राज्य . फक्त आम्हाला काय मिळणार? आणि आपण जर एक एक आकडा बघितला तर मन थक्क होईल. असं फडणवीस (Devendra Fadnavis) म्हणाले.

 

Web Title: Devendra Fadnavis | devendra fadnavis speaking in bjp maharashtra executive meeting

 

हे देखील वाचा :

Dr Amol Kolhe | ‘हॉस्पीटलमधील तुमच्या पेशंटसाठी म्हणाल का, याला भगव्याचच रक्त द्या’; अमोल कोल्हेंचा विक्रम गोखलेंवर निशाणा

Devendra Fadnavis | ‘मुख्यमंत्र्यांना कुणी मुख्यमंत्री समजतच नाही’ – देवेंद्र फडणवीस

Rajkummar Rao Reception | राजकुमार राव आणि पत्रलेखा यांच्या रिसेप्शन पार्टीत पोहोचले मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर; पाहा लग्नानंतरच्या स्टार जोडप्याचा पहिला फोटो

 

Related Posts