IMPIMP

Devendra Fadnavis | ‘मुख्यमंत्र्यांना कुणी मुख्यमंत्री समजतच नाही’ – देवेंद्र फडणवीस

by nagesh
Devendra Fadnavis | no chief minister understands the chief minister fadnavis criticizes cm uddhav thackeray

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन –  Devendra Fadnavis | सर्वांत प्रगतीशील राज्य असताना आज सरकार कुठेय, हा प्रश्न विचारावा लागतो आहे. एक मुख्यमंत्री आहेत, ज्यांना कोण मुख्यमंत्री समजत नाही. प्रत्येक मंत्री स्वत:ला मुख्यमंत्री समजतो. आणि महाराष्ट्रातील जनता आता बेजार आहे. कुणी राज्य म्हणून जनतेचा विचार करत नाही, समस्यांचा विचार करत नाही. असा हल्लाबोल विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) आणि महाविकास आघाडी सरकार (Mahavikas Aghadi Government) केला आहे.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

 

भाजप (BJP) प्रदेश कार्यकारिणीची बैठक मुंबईत आज सुरू आहे.
यावेळी फडणवीसांनी (Devendra Fadnavis) माध्यमांशी संवाद साधला.
यावेळी फडणवीस म्हणाले की, पाच वर्षे आपलं सरकार होतं.
आपल्या सरकारच्या काळात कशावर चर्चा व्हायची? समृद्धी महामार्ग, मेट्रो, जलयुक्त शिवार, डिजीटल इंडिया, उद्योगीकरण यावर चर्चा करायचो.
मात्र, आज यातील कुठल्याच गोष्टीवर चर्चा होत नाही. आता गांजा नव्हे तर हर्बल तंबाखूवर चर्चा होते.
दंगली, खंडणी, वसूली यावर चर्चा होते. या सरकारच्या काळातील अनाचार दुराचार इतका आहे की महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वांत
भ्रष्ट सरकार म्हणून इतिहासात नोंद होईल. असं फडणवीस यांनी म्हटलं आहे.

 

पुढे बोलताना फडणवीस (Devendra Fadnavis) म्हणाले की, ज्याप्रकारे वसूली सुरु आहे की माजी गृहमंत्री तुरुंगात असताना प्रत्येक विभागात एक ‘वाझे’ आहे.
सरकार सामान्यांसाठी नसून कायद्याचं राज्य नसून ‘काय ते द्या’चं राज्य सध्या आहे. अशा शब्दात फडणवीसांनी ठाकरे सरकारवर टीका केली आहे.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

Web Title : Devendra Fadnavis | no chief minister understands the chief minister fadnavis criticizes cm uddhav thackeray

 

हे देखील वाचा :

Rajkummar Rao Reception | राजकुमार राव आणि पत्रलेखा यांच्या रिसेप्शन पार्टीत पोहोचले मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर; पाहा लग्नानंतरच्या स्टार जोडप्याचा पहिला फोटो

Kranti Redkar | NCB च्या जळगाव, नांदेडमधील गांजा कारवाईनंतर क्रांती रेडकर यांचं ट्वीट; म्हणाल्या…

IND vs NZ T20 Series | भारताविरुद्धच्या T – 20 मालिकेसाठी न्यूझीलंडचा संघ जाहीर; केन विलियम्सन नाही तर ‘हा’ खेळाडू असणार न्यूझीलंडचा कर्णधार

 

Related Posts