IMPIMP

Devendra Fadnavis : ‘राज्य सरकारमध्ये एक मुख्यमंत्री आणि 5 सुपर मुख्यमंत्री’ (व्हिडीओ)

by omkar

मुंबई : – सरकारसत्ता ऑनलाइन – विजय वडटेट्टीवार यांच्या अनलॉकची घोषणा केली. परंतु त्यानंतर काही वेळातच मुख्यमंत्री कार्यालयकडून खुलासा करण्यात आला. यामुळे काल गोंधळ उडाला होता. दरम्यान कालच्या गोंधळावरुन भाजपने ठाकरे सरकारवर टीकास्त्र सोडले आहे. राज्य सरकारमध्ये एक मुख्यमंत्री आणि पाच सुपर मुख्यमंत्री असल्याचा टोला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस Devendra Fadnavis यांनी लगावला आहे.

2 महिन्यांपेक्षा अधिक जास्तीचं भाडे घेता येणार नाही, नव्या घरभाडे कायद्यामध्ये आता घरमालकाचा समावेश

मुख्यमंत्र्यांच्या आधी 5 मंत्री बोलतात

ज्या मुख्यमंत्र्यांनी बोललं पाहिजे त्यांच्याकडून कोणतेही वक्तव्य येत नाही. परंतु त्यापूर्वीच त्यांचे पाच मंत्री बोलतात.
प्रत्येक मंत्री जाहीर करतो आणि ही घोषणा मुख्यमंत्री करतील असे सांगतो. प्रत्येक गोष्टीचं श्रेय घेण्याचा प्रयत्न सुरु आहे.
किमान काम करुन तरी श्रेय घ्यावं, असा टोला देवेंद्र फडणवीस Devendra Fadnavis यांनी लगावला.

 

मंत्र्यांना शिस्त लावली पाहिजे

अनलॉकच्या घोषणेवरून कालचा गोंधळ जरा जास्तच झाला आहे. यापूर्वीही अनेक वेळा गोंधळ झाला आहे.
मुख्यमंत्र्यांनी आपल्या मंत्र्यांना शिस्त लावली पाहिजे. बोलण्यावर बंधन आणू नये पण किमान मोठ्या धोरणात्मक निर्णयावर सरकारचं म्हणणं आहे.
ते स्पष्टपणे आणि थेट जनतेपर्यंत पोहोचलं पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली.

7 ते 2 या वेळेला दुकानदारांचा विरोध

गोंधळ इतका निर्माण झाला की, लॉकडाऊन आहे की नाही यासंदर्भात लोकांचे फोन आले. परंतु आमच्याकडेचं याचे उत्तर नव्हतं. मात्र, काही वेळाने मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयाकडून पत्रक काढण्यात आले. लॉकडाऊनमुळे सध्या लोकांमध्ये संभ्रम, उत्कंठा, निराशा आहे. त्यामुळे लोकांना काल घोषणा झाल्यानंतर वाटले झालं सुटलो. लहान दुकानदारांना निर्बंध संपल्याचे वाटले. अनेक दुकानदारांचा 7 ते 2 या वेळेला विरोध आहे. त्यांनी 9 ते 4 अशी वेळ करण्याची मागणी केली आहे. परंतु अनेकांची निराशा झाली आहे. सरकारने या बाबतीत लक्ष देण्याची गरज आहे, असे फडणवीस म्हणाले.

Also Read:- 

Internet Media : ‘ईस्ट इंडिया कंपनी’प्रमाणे वागू शकत नाही इंटरनेट मीडिया : केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद

Petrol-Diesel Price Today : पेट्रोल-डिझेल सतत होतंय महाग, मोडले सर्व रेकॉर्ड

गरीब, वंचितांसाठी मोदी सरकारचं विशेष अभियान ! बनवणार 2 कोटी रेशन कार्ड; जाणून घ्या

जाणून घ्या 4 जूनचे राशीफळ ! 7 राशींसाठी खास दिवस

पुणे महापालिकेत महापौर अन् सभागृहनेते यांच्यात ‘खडाजंगी’ !

‘सीरम’ने मागितली कायदेशीर कारवाईतून सूट, म्हटले – ‘सर्वांसाठी असावा एकच नियम’

’तुझा पती माझा आहे, तुला मरावे लागेल’…म्हणत माजी आमदाराच्या सुनेवर तुटून पडली मुलगी

Related Posts