IMPIMP

… म्हणून देवेंद्र फडणवीस घाबरलेत, नवाब मलिकांचा पलटवार

by pranjalishirish
devendra fadnavis scared over phone tapping case ncp leader nawab malik rashmi shukla case

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन राज्याचे मुख्य सचिव सिताराम कुंटे यांनी फोनटॅपिंग प्रकरणाचा अहवाल मुख्यमंत्री उद्धव ठकारे यांना दिला आहे. यानंतर राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी टीका केली. देवेंद्र फडणवीस म्हणाले, राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी जो अहवाल दिला तो नवाब मलिक Nawab Malik  आणि जितेंद्र आव्हाड यांनी तयार केला आणि त्यावर सीताराम कुंटे यांनी सही केली, असा आरोप फडणवीस यांनी केला. यावर अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी पलटवार केला आहे. देवेंद्र फडणवीस यांनी सीताराम कुंटे यांच्यावर केलेले आरोप योग्य नाहीत. परंतु आता गुन्हा दाखल झाल्याने जवळचे व्यक्ती अडचणीत येतील म्हणून ते घाबरले आहेत. त्यामुळे ते आरोप करत असल्याचा टोला मलिक यांनी लगावला.

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग आणि कुटूंबीयांच्या नावे संपत्ती किती? जाणून घ्या

नवाब मलिक Nawab Malik  म्हणाले, रश्मी शुक्लांनी तयार केलेला अहवाल नवाब मलिक यांनी सार्वजनिक केला असे देवेंद्र फडणवीस सांगत आहेत. देवेंद्र फडणवीस यांनी रश्मी शुक्लांच्या अहवालाचा आधार घेत दिल्लीत पत्रकार परिषद घेऊन सरकारवर आरोप केले. पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी पैसे खाल्ले असे सांगितले. केंद्रीय गृहसचिवांना व राज्यपालांना देखील ते भेटले. मुंबईत पत्रकार परिषद घेऊन खुलासा करतात. बेकयदेशीर फोन टॅप केले. रश्मी शुक्लांचा रिपोर्ट येईपर्यंत कोणत्याही अधिकाऱ्याची बदली झाली नव्हती. त्यानंतरच्या काळात बदली झाल्याचे ते सांगत आहेत. तसेच यामध्ये 12 नावे आहेत असे सांगतात. महाराष्ट्र पोलिसांमध्ये बदल्या पोलिस बोर्डाच्या अध्यक्षतेखाली बदल्या होतात. मात्र, देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र पोलिसांना बदनाम करण्याचे काम केले, असा पलटवार नवाब मलिक यांनी केला आहे.

दुर्दैवी ! फॅशन स्ट्रीटची आग विझवून घरी परतताना कॅन्टोनमेंट बोर्डाच्या अधिकाऱ्याचा अपघाती मृत्यू

फोन टॅपिंग प्रकरणी आज गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नवाव मलिक यांनी अहवाल फोडला असे म्हणणारे देवेंद्र फडणवीस गुन्हा दाखल झाल्यावर का घाबरत आहेत, असा सवाल मलिक यांनी केला आहे. चोरी झाली नाही अशी आरडाओरड फडणवीस करत आहेत. अफवा पसरवून ते लोकांना बदनाम करत आहेत. आम्ही सरकार वाचवण्यासाठी प्रयत्न करत नाही आमचे सरकार खंबीरपणे उभे असल्याचे नवाब मलिक यांनी सांगितले.

शिवसेनेची खरमरीत टीका; ‘भाजप मृतांच्या टाळूवरचे लोणी खायला विसरत नाहीत’

काय म्हणाले देवेंद्र फडणवीस ?

राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी काल जो अहवाल दिला, तो त्यांनी तयारच केलेला नाही. मी त्यांना ओळखतो, ते सरळमार्गी आहेत. हा अहवाल कदाचित जितेंद्र आव्हाड किंवा नवाब मलिक Nawab Malik  यांनी तयार केला असावा आणि त्यावर सीताराम कुंटे यांनी सही केली असावी, असा आरोप, विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला होता. त्यावर नवाब मलिक यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

Also Read : 

Coronavirus in Maharashtra : कोरोना संसर्ग रोखण्यासाठी CM ठाकरेंचा मोठा निर्णय ! राज्यात रविवारपासून रात्रीची संचारबंदी

‘एप्रिल फूल’ समजू नका, नियम न पाळल्यास कठोर निर्णय घेणार : अजित पवार

जितेंद्र आव्हाडांचं ‘प्रत्युत्तर’, म्हणाले – ‘फडणवीसांनी ‘हे’ मान्य केलं तेच खूप झालं’

फोन टॅपिंग अहवाल लीक : रश्मी शुक्ला यांच्या प्रकरणात गुन्हा दाखल, सायबर सेल करणार पहिल्यांदा तपास

Related Posts