IMPIMP

संजय राठोड उद्या देणार मंत्रिपदाचा राजीनामा; विदर्भातील आमदाराला मिळणार वन खातं ?

by amol
Sanjay Rathod | shivsena thackeray and shinde group mla in contact says sanjay rathod

सरकारसत्ता ऑनलाइन (Sarkarsatta Online)पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरण (Pooja Chavan Suicide Case) वरून भाजप आक्रमक झाली आहे. शिवेसना वनमंत्री संजय राठोड (Sanjay Rathod) यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांचा राजीनामा घ्यावा अशी मागणी भाजपनं लाऊन धरली आहे. अशात दिवसेंदिवस राठोडांवर गंभीर आरोप होत आहेत. यामुळं पक्षासोबतच राज्य सरकारची देखील बदनामी होत आहे. त्यामुळं आता संजय राठोड उद्या मंत्रिपदाचा राजीनामा देणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राठोडांवर रोज वेगवेगळे आरोप होत आहेत. ऑडिओ क्लीपनंतर रोज अनेक नवनवीन फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. यामुळं आता महाविकास आघाडीतील घटक पक्ष काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही पक्षांचा राजीनाम्यासाठीचा सेनेवरील दबाव वाढत आहे अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
इतकंच नाही तर पक्षाची बदनामी होत असल्यानंही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे नाराज आहेत.
त्यामुळंच आता उद्या संजय राठोड मंत्रिपदाचा राजीनामा देणार आहेत अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

अर्थसंकल्पीय अधिवेशनात मुद्दा गाजण्याच्या भीतीनं निर्णय ?

1 मार्च रोजी राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन आहे.
यात संजय राठोड यांचा मुद्दा गाजरणार आहे असं बोललं जात आहे. त्यामुळं हे अधिवेशन वादळी अधिवेशन होणार आहे.
जर राठोडांचा राजीनामा घेतला नाही तर विरोधक आणखीच आक्रमक होतील.
इतकंच नाही तर आता सरकारच्या दोन पक्षांचाही राजीनाम्यासाठी दबाव आहे असंही सूत्रांनी सांगितलं आहे.

विदर्भातील शिवसेनेच्या आमदाराला वनमंत्रिपद ?

संजय राठोड (Sanjay Rathod) यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर विदर्भातील शिवसेनेच्या एका आमदाराला वनमंत्रिपद दिलं जाणार आहे अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
हे आमदार पश्चिम विदर्भातील असून त्यांच्याकडील जबाबदारी ही दुसऱ्यावर सोपवली जाणार आहे असंही सूत्रांचं म्हणणं आहे.

Related Posts