IMPIMP

MPSC Exam | ठाकरे सरकारचा मोठा निर्णय ! MPSC परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना एका वर्षाची मुदत वाढ

by nagesh
MPSC | mpsc court hearing reason 416 candidate posting pending in maharashtra

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन  MPSC Exam | कोरोनाच्या पार्श्वभुमीवर राज्यातील सर्व महत्त्वाच्या परीक्षा स्थगित केल्या होत्या. त्याचबरोबर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची (MPSC Exam) परिक्षा देखील रखडली होती. यामुळे अनेक उमेदवार या परिक्षेसाठी वंचित राहणार होते. या पार्श्वभुमीवर राज्यातील ठाकरे सरकारने (Thackeray Government) विद्यार्थ्यांना एक दिलासा दिला आहे. एमपीएससी परीक्षेला बसण्यासाठी विद्यार्थ्यांना आता एका वर्षाची मुदत वाढ देण्याचा निर्णय ठाकरे सरकारकडून घेण्यात आला आहे.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

 

सरकारच्या या निर्णयामुळे एमपीएससी (MPSC Exam) परीक्षेसाठी मेहनत करणाऱ्या विद्यार्थ्यांना परत हा मोठा दिलासा असणार आहे.
विद्यार्थ्यांना व्यवस्थितपणे परीक्षा देता यावी यासाठी हा निर्णय घेतला गेला आहे.
येत्या 19 नोव्हेंबर रोजी एमपीएससी परीक्षेसाठी अर्ज भरण्याची शेवटची मुदत असणार आहे.
परंतु, हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आल्यामुळे विद्यार्थ्यांना आता अभ्यासासाठी अधिक वेळ मिळणार आहे.

 

या दरम्यान, मागील दिड वर्षापासून कोरोनाच्या महामारीमुळे एमपीएससीच्या परीक्षा झाल्या नव्हत्या.
त्यामुळे वयाची मर्यादा 2 वर्षांनी वाढवावी अशी मागणी होत होती. या विषयावरून राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा झाली.
या चर्चेमध्ये महत्वाचा निर्णय घेण्यात आला. तर, आता 1 वर्ष मुदतवाढ देण्याला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी मंजुरी दिली आहे.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

Web Title : MPSC Exam | mpsc students will get 1 more year to appear for exam state cabinet ministry decision

 

हे देखील वाचा :

Mumbai Police | विराट कोहलीच्या मुलीवर अत्याचार करण्याची धमकी देणार्‍या ‘इंजिनिअर’च्या मुंबई पोलिसांनी मुसक्या आवळल्या;

EPFO | पीएफ खातेधारकांसाठी खुशखबर ! मिळाली ‘ही’ मोठी भेट

EV Charging Stations | केवळ 2500 रुपयात उघडा EV चार्जिंग स्टेशन, सरकार देतंय 6,000 रूपयांची सबसिडी; तुम्ही सुद्धा करू शकता अर्ज

 

Related Posts