IMPIMP

‘आधी म्हणाले नव्या पिढीला शरद पवार यांचं राजकारण कळणार नाही, आता म्हणत आहेत ‘ती’ फक्त अफवा’

by pranjalishirish
jitendra awhad now denied reports of amit shah and sharad pawar meet in ahemdabad

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन – काही दिवसांपूर्वी नव्या पिढीला शरद पवार यांचं राजकारण कळणार नाही, असे वक्तव्य जितेंद्र आव्हाड Jitendra Awhad  यांनी केले होते. त्यांच्या भूमिकेत आता बदल झाल्याचे पाहायला मिळत आहे. त्या या बाबतीत एक ट्विटसुद्धा केले आहे. त्यामध्ये त्यांनी “पवार साहेब-अमित शहा भेट झाली नाही. ही काळ्या दगडावराची पांढरी रेघ आहे. तरी देखिल आमचे काही पत्रकार मंडळी रंग उधळत आहेत.चघळायला काही नसले कि अफवेभवती दोन दिवस घालवता येतात. हेच या बातमीच्या रूपाने सिद्ध होतं. माझ्या सर्व पत्रकार बांधवांना होळीच्या शुभेच्छा! बुरा ना मानो होली है. असे म्हटले आहे.

संतापलेल्या भाजप खासदार बाबुल सुप्रियोंनी थेट कार्यकर्त्यांच्या श्रीमुखात लगावली, मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल

भाजपचे चाणक्य अमित शाह यांनी पवारांच्या भेटीविषयी सूचक वक्तव्य केले आहे. यामुळे राजकीय क्षेत्रात मोठा संभ्रम निर्माण झाला होता. या भेटीवर शरद पवार काय प्रतिक्रिया देतात यावर आता संपूर्ण राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून राहिले आहे. मात्र शरद पवार यांची प्रकृती अचानक खालावल्याने शरद पवार यांना मुंबईच्या ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या ठिकाणी त्यांची तपासणी केल्यानंतर ३१ मार्चला शरद पवार यांच्यावर एण्डोस्कोपीची शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. त्यामुळे आता शरद पवार आणखी काही दिवस प्रसारमाध्यमांसमोर येऊ शकणार नाहीत, हे आता जवळपास निश्चित झाले आहे. मात्र या भेटीमुळे अमित शाह आणि त्यांच्या भेटीबाबतच्या गोष्टींवरून आणखी तर्कवितर्क लढवले जातील.

CM उद्धव ठाकरेंचा शरद पवारांना फोन, केली प्रकृतीची विचारपूस

काय म्हणाले होते जितेंद्र आव्हाड ?
शरद पवार आणि अमित शहा यांची गुप्त भेट झाली तर तुमचे कोण गुप्तहेर होते हे माहीत नाही. पण ५० वर्षांच्या राजकीय जीवनात कुठल्याही पक्षाच्या नेत्यांनी जेवढे मित्र कमावले नाहीत तेवढे मित्र पवार साहेबांनी कमावले आहेत.या मध्ये काश्मीरचे फारूक अब्दुल्ला, ओडिशाचे विजू पटनाईक तसेच पश्चिम बंगालमधील जोत्या बसू यांच्यासारखे मोठे नेते आहेत. ज्या ज्या राज्याचे प्रमुख नेते आहेत ते कायम शरद पवार यांचे मित्र आहेत. महाराष्ट्रातील भाजपचे नेते प्रमोद महाजन यांच्या बरोबरसुद्धा शरद पवार यांचे जवळचे संबंध होते. आताच्या राजकारणात संबंध आणि राजकारण याचा विचित्र प्रकार पाहायला मिळत आहे. राजकारणात कोण कोणाचा शत्रू नसतो, तो फक्त वैचारिक विरोधक असतो असे मत जितेंद्र आव्हाड Jitendra Awhad यांनी व्यक्त केले आहे.

Also Read

पवार-शहा भेटीवर भाजपची अधिकृत भूमिका, प्रदेशाध्यक्ष म्हणाले…

शरद पवारांचे सर्व नियोजित कार्यक्रम रद्द, सुप्रिया सुळेंनी दिली प्रकृतीबाबत माहिती

लोकप्रिय मराठी गायिका वैशाली माडे ‘या’ दिवशी करणार राष्ट्रवादीत प्रवेश !

जाणून घ्या : पंढरपूर पोटनिवडणुकीसाठी भाजपने उमेदवारी दिलेले समाधान आवताडे यांच्याबद्दल

खासदार नवनीत राणांचा विनामास्क ‘कोरकू’ डान्स तुफान व्हायरल !

शरद पवारांची प्रकृती बिघडली; ‘ब्रीच कँडी’ हॉस्पीटलमध्ये बुधवारी ‘अँडोस्कोपी’ आणि ‘शस्त्रक्रिया’

निवृत्त न्यायमूर्तींकडून ‘त्या’ प्रकरणाची चौकशी करण्यात येणार !

Related Posts