IMPIMP

शरद पवारांचे सर्व नियोजित कार्यक्रम रद्द, सुप्रिया सुळेंनी दिली प्रकृतीबाबत माहिती

by bali123
sharad pawar admitted to breach candy hospital at mumbai

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन – राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार sharad pawar यांना ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. पोटात दुखत असल्याने त्यांना रविवारी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी ट्विट करुन ही माहिती दिली आहे. शरद पवार यांच्या प्रकृतीबद्दल शरद पवार यांच्या कन्या आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी माहिती दिली आहे. सुप्रिया सुळे यांनी सांगितले की, त्यांची प्रकृती उत्तम असून बुधवारी एक शस्त्रक्रिया होणार आहे, अशी माहिती सुप्रिया सुळे यांनी दिली.

होळी : रंगांचा सण आणि जातीवादाच्या विरूद्ध एका संताच्या संघर्षाची कथा?

पोटात दुखू लागल्याने शरद पवार हे ब्रीच कँडी रुग्णालयामध्ये तपासणीसाठी आले होते. त्यांना पित्ताशयाचा त्रास होत होता. डॉक्टरांनी शरद पवार यांची तपासणी केली आहे. पित्ताशयाचा त्रास जास्त जाणवत असल्यामुळे बुधवारी (31 मार्च) शस्त्रक्रिया केली जाणार आहे.

सुप्रिया सुळे यांनी शरद पवार sharad pawar यांच्या प्रकृतीबद्दल माहिती देताना सांगितले की, शरद पवार यांना पोटात दुखू लागल्यामुळे रुग्णालयात तपासणी करण्यासाठी आले होते. पण, पित्ताशयाचा त्रास अधिक जाणवू लागल्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 31 मार्च रोजी त्यांच्यावर शस्त्रक्रिया होणार आहे. त्यानंतर पुढील दोन आठवडे ते घरीच विश्रांती करणार आहेत. या कालावधीमधील त्यांचे सर्व दौरे रद्द करण्यात आले आहेत, अशी माहिती सुप्रिया सुळे यांनी दिला.

शरद पवारांची प्रकृती बिघडली; ‘ब्रीच कँडी’ हॉस्पीटलमध्ये बुधवारी ‘अँडोस्कोपी’ आणि ‘शस्त्रक्रिया’

दरम्यान, रविवारी रात्री शरद पवार यांना अस्वस्थ वाटू लागल्याने तपासणीसाठी त्यांना ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तपासणीनंतर त्यांना पित्ताशयाचा त्रास असल्याचे निदान झाले. पित्ताशयावर शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. दोन दिवस औषधे बंद करण्यात आली आहेत. तसेच 31 मार्चला अँडोस्कोपी झाल्यानंतर शस्त्रक्रिया केली जाईल, असे नवाब मलिक यांनी ट्विटमध्ये सांगितले होते.

Also Read

खासदार नवनीत राणांचा विनामास्क ‘कोरकू’ डान्स तुफान व्हायरल !

जेव्हा स्टेजवर डान्स करू लागले भाजप आणि काँग्रेसचे टॉपचे 2 नेते, पाहा व्हिडीओ

लोकप्रिय मराठी गायिका वैशाली माडे ‘या’ दिवशी करणार राष्ट्रवादीत प्रवेश !

 

West Bengal Assembly Elections : मिथुन चक्रवर्ती यांना मुख्यमंत्री होण्याची इच्छा ! PM मोदींनी आदेश दिल्यास ममता बॅनर्जी विरोधात…

शरद पवारांची प्रकृती बिघडली; ‘ब्रीच कँडी’ हॉस्पीटलमध्ये बुधवारी ‘अँडोस्कोपी’ आणि ‘शस्त्रक्रिया’

 

शरद पवार आणि अमित शहांमध्ये गुप्त बैठक?, महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ, चर्चांना उधाण

 

जाणून घ्या : पंढरपूर पोटनिवडणुकीसाठी भाजपने उमेदवारी दिलेले समाधान आवताडे यांच्याबद्दल

 

त्या’ वक्तव्याबाबत अजित पवारांनी संजय राऊतांना फटकारले; म्हणाले – ‘मिठाचा खडा टाकण्याचे काम कुणी करू नये’

 

Sanjay Raut : … म्हणून 12 आमदारांची अद्याप नियुक्ती नाही

 

वसुलीच्या आरोपावरून आपल्याच लोकांकडून मिळाला घरचा ‘आहेर’ ! अनिल देशमुख म्हणाले – ‘मुख्यमंत्र्यांकडे केली होती मागणी, सेवानिवृत्त न्यायाधीशांकडून केली जावी चौकशी’

Related Posts