IMPIMP

Juhi Chawla & 5G Case | 20 लाखांचा दंड आणि उच्च न्यायालयानं खडसावल्यानंतर अभिनेत्री जुही चावला म्हणाली…(व्हिडीओ)

by omkar
Juhi Chawla

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन – 5G नेटवर्कला विरोध करणारी एक याचिका अभिनेत्री जूही चावलाने (Juhi Chawla & 5G Case) दिल्ली हायकोर्टात (Delhi High Court) दाखल केली होती. दिल्ली हायकोर्टाने जूही चावलाची (Juhi Chawla) ही याचिका फेटाळून लावत 20 लाखांचा दंड ठोठावला. यावरून आता जूही चावलाने समाज माध्यमांवर (Social media) एक व्हिडिओ शेअर केला आहे. त्यामध्ये तिने स्वतःचं मत मांडत प्रतिक्रिया दिली आहे. जुहीने शेअर केलेला व्हिडिओ (Video) समाज माध्यमावर (Social media) प्रसारित (Viral) होताना दिसतोय.

Modi Government | मोदी सरकारचा मोठा निर्णय ! सरकारी कर्मचाऱ्याच्या कुटूंबातील सदस्याला कोरोनाची बाधा झाल्यास 15 दिवसांची रजा मिळणार

बॉलिवूड अभिनेत्री जुही चावलाने (Juhi Chawla) शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे, की,
नमस्कार काही दिवसामध्ये गोंधळ एवढा वाढला आहे की,
मी स्वत:चा आवाजही ऐकू शकले नाही.
याच गोंधळामध्ये मला वाटलं की एक अतिशय महत्त्वाचा मेसेज (Message) कदाचित विसरले आहे.
तो महत्वाचा मेसेज म्हणजे, आम्ही 5G नेटवर्क विरोधात नाही.
उलट आम्ही याचे स्वागत करीत आहोत. तुम्ही ते नक्की आणा.
आम्ही केवळ इतकंच बोलत होतो की, 5G नेटवर्क सुरक्षित आहे हे अधिकाऱ्यांनी स्पष्ट करावे.
असं जुही चावलाने आपल्या व्हायरल व्हिडिओ मध्ये म्हटलं आहे.

 Congress Leader Sachin Pilot : भाजपवासी झालेल्या ‘या’ महिला नेत्याचा मोठा दावा, म्हणाल्या – ‘सचिन पायलट यांच्याशी बोलणं झालंय, ते लवकरच भाजपमध्ये प्रवेश करतील’

दरम्यान, तसेच, पुढे जुही चावलाने (Juhi Chawla) त्या व्हिडिओ मध्ये म्हटलं आहे की, ‘आमचं सांगणं फक्त एवढंच आहे की, या नेटवर्कबाबत तुमचा अभ्यास, संशोधन सार्वजनिक करा, जेणेकरुन आमच्या मनात जी भीती आहे, ती निघून जाईल. आम्ही सर्व निर्धास्तपणे झोपू शकतो. आम्हाला फक्त एवढंच जाणून घ्यायचे आहे की, ही टेक्नॉलॉजी (5g network) लहान मुले, गर्भवती महिला आणि जन्माला येणाऱ्या बाळांसाठी सुरक्षित आहे. असं न्यायालयाने फटकारल्या नंतर जुही चवलाने व्हिडिओ शेअर करत स्वतः मत मांडलं आहे.

फायद्याची गोष्ट ! पीपीएफ अकाऊंटमध्ये 10 वर्षाच्या मुलांच्या नावाने दरमहा 500 रूपये जमा करून 28 लाख मिळवण्याची संधी, जाणून घ्या

Web Title: Juhi Chawla explains why she filed petition against 5G in a video after High Court fined her for publicity

Related Posts