IMPIMP

kirit somaiya | मी शरद पवार आणि उद्धव ठाकरेंनाच नोटीस दिलीय, हिम्मत असेल तर रोखून दाखवा – सोमय्या

by nagesh
Kirit Somaiya on INS Vikrant | bjp leader kirit somaiya challege to thackeray government

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन –  kirit somaiya | राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ (Minister Hassan Mushrif) यांच्या विरोधात तक्रार दाखल करण्यासाठी भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या (MP Kirit Somaiya)आज पुन्हा एकदा कोल्हापूर दौऱ्यावर निघाले आहेत. त्यापूर्वी त्यांनी मुंबईत मंदिराच्या बाहेरुनच सिद्धीविनायकाचं दर्शन घेतलं. यावेळी किरीट सोमय्या यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना आव्हान दिलंय.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

 

आता शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांनाच मी नोटीस दिलीय, की हिम्मत असेल तर मला रोखून दाखवा.
अशा शब्दात सोमय्या यांनी पवार आणि ठाकरेंवर निशाणा साधला.
सिद्धीविनायकाचं दर्शन घेऊन मी कोल्हापुरला अंबेमातेच्या दर्शनासाठी जात आहे.
कोल्हापुरात अंबाबाईला प्रार्थना करणार की, तू शक्तीची माता आहे. तू पापाच्या राक्षसाचा वध केला होता.
अंबेमातेच्या चरणी प्रार्थना करणार की भ्रष्टाचाररुपी राक्षस जो महाराष्ट्रात फोफावला आहे, त्याचा वध करण्याची शक्ती आम्हाला दे.

यावेळी पोलिसांनी तुम्हाला कुठली नोटीस दिली आहे का? असे पत्रकारांनी विचारले असता, त्यावर सोमय्या म्हणाले की, मी शरद पवारांना, उद्धव ठाकरेंना नोटीस दिलीय.
मी कोल्हापूरच्या पोलीस आयुक्तांना सांगितंलय, कोल्हापूरच्या जिल्हाधिकाऱ्याला सांगितलं, की तुमच्यात हिम्मत असेल तर मला थांबवून दाखवा.
आम्ही जाणार, अंबाबाईचं दर्शन घेणार आणि त्या भ्रष्टाचाररुपी राक्षसाचा वध करणार, असा इशाराही सोमय्या यांनी यावेळी दिलाय.

 

Web Title : kirit somaiya | I have given notice only to Sharad Pawar and Uddhav Thackeray, if you have courage, stop it – Somaiya

 

हे देखील वाचा :

Royal Enfield च्या पसंतीच्या बाईकला आता तुम्ही देऊ शकता मनासारखा ‘लूक’, घरबसल्या अशाप्रकारे करू शकता रंग-रूपाची निवड

DGP Sanjay Pandey | परमबीर सिंहासह ‘त्या’ 25 पोलिस अधिकार्‍यांच्या निलंबनाच्या प्रस्तावावर गृह विभागानं घेतला ‘हा’ निर्णय, डीजीपींना केली ‘ही’ सूचना

Pune Anti Corruption | 30 हजाराची लाच घेताना पुण्यातील तलाठी अँटी करप्शनच्या जाळ्यात

 

Related Posts