IMPIMP

Kirit Somaiya | ‘दोन्ही अनिल लवकरच जेलमध्ये जाणार’ – किरीट सोमय्या

by nagesh
Kirit Somaiya | senior bjp leader kirit somaiya has criticized state government

सांगली : सरकारसत्ता ऑनलाइन Kirit Somaiya | ठाकरे सरकारवर (Thackeray government) वारंवार टीकास्त्र सोडणारे भाजपचे जेष्ठ नेते किरीट सोमय्यांनी (Kirit Somaiya) आणखी जोरदार टीका केल्याचं पाहायला मिळालं. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सचिन वाझे याच्या माध्यमातून, माजी मृहमंत्री अनिल देशमुख यांनी संजीव पलांडे यांच्या, तर परिवहन मंत्री अनिल परब यांनी बजरंग खरमाटे या अधिकाऱ्याद्वारे कोट्यावधी रुपयांची अनामिक संपत्ती गोळा केलीय. असा जोरदार आरोप किरीट सोमय्या यांनी केला आहे.

 

किरीट सोमय्या (Kirit Somaiya) हे आज (सोमवारी) सांगली (Sangli) जिल्ह्यातील वंजारवाडी (ता. तासगाव) येथे पहिवहन अधिकारी बजरंग खरमाटे (RTO Bajrang Kharmate) यांच्या फार्म हाऊसची पाहणी करण्यासाठी आले होते.
त्यांच्यासमवेत भाजपचे नेते मकरंद देशपाडे (Makrand Deshpade) होते.
आज सकाळी 10.30 वाजता सोमय्या यांनी भेट दिलीय. नुकतंच बजरंग खरमाटे यांना इडीने समन्स बजावून चौकशीसाठी बाेलावले आहे.
यावरुन किरीट सोमय्या यांनी म्हटलं आहे की, माझ्या माहितीप्रमाणे च्या अधिकाऱ्यांकडे खरमाटे यांच्या 750 कोटी रुपयांच्या अनामिक मालमत्तेची माहिती आहे. त्याचीच चौकशी सुरु झालीय.
परिवहन मंत्री अनिल परब यांचेही काऊंटडाऊन सुरु झालेले आहे. असं ते म्हणाले आहेत.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

बजरंग खरमाटे (RTO Bajrang Kharmate) हे परिवहन मंत्री अनिल परब (Anil Parab)
यांचे सचिव आहेत. त्यांची बेनामी संपत्ती ही परिवहन मंत्री अनिल परबांची बेनामी संपत्ती असण्याचा दाट संशय आहे. याची चौकशी व्हावी अशी मागणी ED, CBI आणि ACB कडे करणार आहे.
ठाकरे सरकारचा एक अनिल (अनिल देशमुख) जेलच्या दरवाजात उभा आहे.
तर दुसरा अनिल (अनिल परब) जेलमध्ये जाण्याचा मुहूर्त शोधत आहे.
हे दोन्ही अनिल लवकरच जेलमध्ये जाणार असल्याचे सोमय्या (Kirit Somaiya) यांनी म्हटलं आहे.

 

त्यावेळी बोलताना सोमय्या म्हणाले की, सांगली जिल्ह्यात 4 ठिकाणी परिवहन अधिकारी बजरंग खरमाटे यांची बेनामी मालमत्ता आहे. एका ठिकाणी 150 एकर जमीन आहे.
तर औद्योगिक वसाहतीमध्ये 5 एकर जागेवर एक कंपनी आहे. वंजारवाडी गावात अलिशान फार्म हाऊस आहे. या कोट्यवधी रुपयांच्या बेनामी संपत्तीची पाहणी करण्यासाठी आलो आहे.
वंजारवाडी येथील फार्म हाऊसची किंमत 20 ते 22 कोटी रुपये आहे.
परिवहन अधिकारी असे आलिशान फार्म हाऊस कसे बांधू शकतो.
बेनामी फार्म हाऊस खरमाटे यांचेच आहे की परिवहन मंत्री अनिल परब यांचे आहे.
हे पाहण्यासाठीच आलोय, असं सोमय्या यांनी म्हटलं आहे.

 

Web Title : Kirit Somaiya | senior bjp leader kirit somaiya has criticized state government

 

हे देखील वाचा :

Pune Incident | ब्रेक फेल झाल्याने चारचाकीची दुचाकीला धडक; दुचाकीस्वार दुचाकीसह थेट खोल दरीत, कात्रज घाटातील घटना

Sanjay Raut | संजय राऊतांच्या ‘त्या’ वादग्रस्त वक्तव्यानंतर BJP कडुन पुण्यात गुन्हा दाखल करण्याची मागणी

Phone Tapping case | वरिष्ठ IPS अधिकारी रश्मी शुक्लांचं ‘एफआयआर’ मध्ये नावचं नाहीय

 

Related Posts