IMPIMP

पवारांसोबतच्या भेटीत काय चर्चा झाली? अनिल देशमुखांनी केले स्पष्ट

by pranjalishirish
maharashtra home minister anil deshmukh arrives at the residence of ncp chief sharad pawar

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाईन – मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर जिलेटीनच्या कांड्यानी भरलेली स्कॉर्पिओ कार सापडणे त्यानंतर पोलीस अधिकारी सचिन वाझे यांना झालेली अटक यामुळे राज्यातील राजकारण चांगलेच ढवळून निघाले आहे. या सर्व घडामोडींमध्ये आज राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार Sharad Pawar यांची दिल्लीतील निवासस्थानी भेट घेतली आहे. अनिल देशमुख यांनी तातडीने शरद पवारांची भेट घेतल्याने पुन्हा एकदा अनिल देशमुखांच्या राजीनाम्याच्या चर्चांना उधाण आले आहे. मात्र अनिल देशमुख यांनी यावर भाष्य करण्यास नकार दिला. तर आपण शरद पवार यांची भेट का घेतली याचे कारण स्पष्ट केले आहे. शरद पवार आणि अनिल देशमुख यांच्यात आज दीड तास चर्चा झाली. आपण नागपुरातील मिहान प्रकल्पाविषयी चर्चेसाठी शरद पवारांची भेट घेतली असल्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी स्पष्ट केले आहे. तसेच अंबानींच्या घरासमोर स्फोटकांबाबतही पवारांसोबत चर्चा झाली, असेसुद्धा अनिल देशमुख म्हणाले.

सरकार जगन्नाथ मंदिराची 35 हजार एकर जमीन विकणार, ISKCON चे प्रवक्ते म्हणाले – ‘मूर्ख हिंदूंच्या उदासीनतेचा परिणाम’

अनिल देशमुख काय म्हणाले?
सध्या ‘विदर्भात, नागपुरात मिहान प्रकल्प सुरु आहे. त्यामध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावरील मोठ्या इंडस्ट्रींचा समावेश आहे. त्या इंडस्ट्रीं विदर्भात पाहिजेत. या संदर्भात चर्चा करण्यासाठी मी पवार Sharad Pawar साहेबांच्या भेटीसाठी आलो होतो. या भेटीमध्ये मी पवार साहेबांना मिहान प्रकल्पाची माहिती दिली. तसेच मुंबईत सध्या घडत असलेल्या घडामोडींची पवार साहेबांसोबत चर्चासुद्धा केली. पवार Sharad Pawar  साहेबांनी मुंबईतील मुकेश अंबानी यांच्या घरासमोर सापडलेल्या स्फोटकांच्या प्रकरणाची माहितीसुद्धा घेतली असेसुद्धा अनिल देशमुख यांनी स्पष्ट केले आहे.

Sachin Vaze Case : माजी खासदार संजय निरूपम यांचा शिवसेनेवर घणाघात, म्हणाले…

या प्रकरणाचा तपास एनआयए आणि एटीएसकडून करण्यात येत आहे. त्यांना तपासासाठी योग्य ती मदत राज्य सरकारकडून करण्यात येत आहे. यामध्ये जे कोणी दोषी आहेत त्यांच्यावर योग्य ती कारवाई करण्यात येईल. जोपर्यंत याचा संपूर्ण तपास होत नाही तोपर्यंत यावर बोलणं योग्य ठरणार नाही. या सगळ्यांचा रिपोर्ट आल्यानंतर त्यानुसार राज्य सरकारकडून पुढील कारवाई करण्यात येईल,अशी माहिती अनिल देशमुख यांनी दिली आहे.

Also read : 

‘अजानमुळे झोपमोड होते’; तक्रारीनंतर रात्री 10 ते सकाळी 6 पर्यंत बंद !

हर्षवर्धन पाटलांचा ठाकरे सरकारवर निशाणा, म्हणाले – ‘वीज तोडणी मोहीम हे ‘महाविकास’चं अपयश’

त्यांच्या’ प्रामाणिकपणाला सलाम ! 10 वर्षे नगरसेवक, 5 वर्षे स्थायी समितीचे अध्यक्ष अन् आता करताहेत वॉचमनची नोकरी

आघाडी सरकारच्या कारभाराची ‘लिटमस टेस्ट’ पंढरपुरच्या पोटनिवडणुकीत होणार !

नाराज असलेल्या वरिष्ठ IPS अधिकारी संजय पांडेंच्या ‘लेटर बॉम्ब’मध्ये परमबीर सिंह, माजी DGP जयस्वाल यांच्यावर आरोप; पोलीस दलात खळबळ, मुख्यमंत्री ठाकरेंना लिहीलं होतं पत्र

Gulabrao Patil : पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील ‘कोरोना’ पाँझिटिव्ह

रितिकाच्या आत्महत्येवर गीता फोगाट म्हणाली, ‘जिंकणं-हारणं हा तर खेळाडूच्या आयुष्याचा भाग’

IPL 2021 : ‘मुंबई इंडियन्स’ला मोठा फटका, पाकिस्तानमुळं वाढलं टेन्शन ! जाणून घ्या नेमकं प्रक

राष्ट्रवादीने केले CM उद्धव ठाकरेंचे समर्थन, म्हणाले – ‘वाझेंना सेवेत घेण्यासाठी फडणवीसांवर कोणाचाही दबाव नव्हता’

Related Posts