IMPIMP

अधिकारी बनलेल्या उमेदवारांचा राज्य सरकारला सवाल, … मग नियुक्त्या का थांबल्या?

by pranjalishirish
maharashtra will not stop so why did appointments stop mpsc student Pravin Kotkar ask cm uddhav thackeray

मुंबई : – शिक्षण घेऊन झालं तर पुढचा प्रश्न उरतो तो रोजगाराचा आणि रोजगार मिळवण्यासाठी अनेक युवक खटाटोप करताना दिसतात. असाच एक युवक प्रविण कोटकर Pravin Kotkar हे नायब तहसिलदार बनलेले परंतु अद्याप नियुक्ती नसल्याने तो आता शेतात राबत आहे. तर प्रविण प्रमाणेच २०२० च्या बॅचमधील तब्बल ४१३ भावी अधिकाऱ्यांच्या नियुक्तीचा विषय आहे. कारण आठेक वर्षे ‘स्पर्धा’ परीक्षेचा अभ्यास करून, संघर्ष करुन मिळवलेल्या पदाची नियुक्ती १० महिन्यांपासून रखडली गेली आहे. या कारणाने कुणाला तोंड लपवून घरात बसावं लागत आहे. तर काही युवक स्वत:च्याच शेतात शेतमजूर बनले आहे.

अहमदनगर जिल्हयातील अकोले तालुक्यातील कुंभेफळ या एका छोट्याशा गावामध्ये राहणारा प्रवीण नायब तहसिलदार बनला. गावात त्याचा जल्लोष करण्यात आला. त्याचा सत्कार केला, नंतर त्याचं पेपरमध्ये नाव ही आले. हे असून मात्र नियुक्तीचा प्रश्न हा अजून बाकी आहे. प्रविण कोटकर  Pravin Kotkar यांनी भावना व्यक्त करत म्हणाला, साहेब कधी होणारंय जॉईनींग, रावसाहेब कुठलं गाव मिळालं, खरंच तहसिलदार झालाय का वो? हे शब्द आता टोचायला लागले आहेत. गावातून बाहेर फिरताना कोण समोर येईल आणि आपल्यावर हसेल हेच सांगता येत नाही. त्यामुळेच, दिवसभर शेतात जाऊन राबत आहे. शेतातली सर्व कामे करतोय, अशा शब्दात त्या युवकाने आपली भावना व्यक्त केली आहे. घरची आर्थिक परिस्थिती तशी जेमतेम असल्याने, आणि आई-वडिल न शिकलेले शेतकरी. परंतु आपला मुलगा इंजिनियर व्हावं हे स्वप्न धरून त्यांनी प्रविणला शिकवलं.

शासनाकडून झालेल्या दिरंगाईचा फटका आम्हाला बसलाय. जून ते सप्टेंबर ह्या काळात नियुक्ती दिली असती तर अडचण आली नसती. आताही, सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार एसईबीसी प्रवर्ग वगळपा राहिलेले ३६५ भावी अधिकाऱ्यांना सरकार नियुक्ती देऊ शकते. मात्र, सरकार चालढकल करत असून निदान ३६५ जणांना तरी नियुक्ती द्यावी हीच आमची मागणी आहे. महाराष्ट्र थांबला नाही, थांबणार नाही, मग आमचाी नियुक्ती का थांबली? असा थेट प्रश्न जून २०२० च्या राज्यसेवा परीक्षेत पास झालेले विकास शिंदे यांनी मुख्यमंत्र्यांना विचारला आहे. यावरून ज्यांनी जून २०२० रोजी राज्यसेवा परीक्षेतून अधिकारी बनण्याचं स्वप्न सत्यात उतरवलं आहे. त्यामध्ये, रिक्षावाल्या भावाने मदत केलेल्या अल्पसंख्याक समाजातील वसिमा शेख यांनी अतिशय गरीब परिस्थितीत उपजिल्हाधिकारी पदापर्यंत मजल मारली आहे. तर वंदना करखेले यांनी डीवायएसपी झाल्याच्या आनंदात अगोदरच्या नोकरीचा राजीनामा दिला आहे. मात्र १० महिन्यांपासून नियुक्ती नसल्यानं एक प्रश्न निर्माण होऊन त्यांना आता घरी बसण्याची वेळ आली आहे. बेटी बचाव-बेटी पढाव म्हणणाऱ्या सरकारनं बेटी को जॉईनींग दो, असं म्हणत त्यांनी आपला संताप व्यक्त केला आहे.

पुढं प्रविण म्हणाला, मी ट्विट केल्यानंतर मीडियाचा चांगला प्रतिसाद मिळाला, मंत्री जितेंद्र आव्हाड यांनीही दखल घेऊन आश्वासन दिलं, तसेच विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकरांनीही बाजू उचलून धरली. याचा मला आनंदच आहे. परंतु मीडियामध्ये माझ्या एकट्याचीच चर्चा झाली. माझ्यापेक्षाही अनेक प्रतिकुल परिस्थितीशी संघर्ष करुन MPSC परीक्षा उत्तीर्ण झालेले उमेदवार आमच्या बॅचमध्ये आहेत. त्यामुळे, हा एकट्या प्रविणचा नाही, तर राज्यातील ४१३ भावी अधिकाऱ्यांचा प्रश्न म्हणून सरकारने याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी प्रविण कोटकर Pravin Kotkar यांनी केली आहे. दरम्यान, राज्यात तलाठी या क वर्गातील पदासाठी मार्च २०१९ रोजी परीक्षा झाली होती, डिसेंबर महिन्यात परीक्षेचा निकाल लागला. जानेवारी महिन्यात २७ जिल्ह्यांतील उमेदवारांना नियुक्त्याही दिल्या. परंतु, प्रशासकीय दुर्लक्षामुळे ७ जिल्ह्यातील साधारण ३५० उमेदवारांच्या नियुक्त्या अजून रखडल्या असून, एकाचवेळी परीक्षा दिलेल्या २७ जिल्ह्यात निुयक्त्या मिळाल्या पण आम्हाला अद्यापही वेटींगवरच ठेवून आमच्यावर मोठा अन्याय होत असल्याचं तलाठी झालेल्या बीडच्या प्रशांत नलावडे यांनी सांगितलं आहे.

Also Read :

महाराष्ट्र थांबला नाही, महाराष्ट्र थांबणार नाही… मग नियुक्त्या का थांबल्या ?, स्पर्धा परीक्षेत पास झालेल्या विद्यार्थ्यांचा ट्विटरवरुन सरकारला प्रश्न

सिंधीया यांच्या ज्या ‘जय विलास’ राजवाड्यात झाली चोरी, तिथं आहेत 400 खोल्या आणि 3500 KG चे झुंबर

Sachin Vaze Case : देवेंद्र फडणवीसांनी रात्री उशीरा घेतली PM मोदी अन् HM अमित शाह यांची भेट

Sachin Vaze Case : महाविकास आघाडीच्या एक-दोन मंत्र्यांची NIA कडून चौकशी होण्याची शक्यता

‘मनसुख हिरेन यांच्याप्रमाणे सचिन वाझेंची हत्या होऊ शकते’, भाजप आमदाराने केली ‘ही’ मागणी

Related Posts