IMPIMP

‘त्या’ प्रकरणाची शरद पवारांकडून दखल; भाजपला उत्तर देण्यासाठी अजितदादांना दिली सूचना

by amol
Mansukh Hiren case maharashtra legislative session phone conversation between sharad pawar anil deshmukh and ajit pawar

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन – काल अर्थसंकल्पीय अधिवेशनात विरोधकांकडून मनसुख हिरेन मृत्यू Mansukh Hiren case प्रकरणी पोलीस अधिकारी सचिन वाझे यांच्या निलंबनाची आणि अटकेची मागणी करण्यात आली. आता या प्रकरणाची राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी दखल घेतली आहे. त्यामुळे आज अधिवेशनाचा शेवटचा दिवस असल्याने तो खूप गाजणार आहे.

विधानसभेत विरोधकांनी सचिन वाझे यांच्या निलंबनाच्या मागणीवरून गोंधळ घातला. याची दखल घेत शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यात दूरध्वनीवरून चर्चा झाल्याची माहिती समजत आहे. मनसुख हिरेन Mansukh Hiren caseया प्रकरणावरून शरद पवार आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांत चर्चा झाल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे. आज अर्थसंकल्प मंजूर करून घेणे हीच भूमिका सत्ताधारी पक्षाने ठेवण्याची सूचना शरद पवार यांनी दिल्या आहेत.

आज राज्याच्या अर्थसंकल्पाचा शेवटचा दिवस आहे. १ ते १० मार्च अशा १० दिवसीय अधिवेशनात ८ दिवसांचे कामकाज होतं. त्याचा आज शेवटचा दिवस आहे. आजच्या दिवशी विधानसभेत अर्थसंकल्पावर चर्चा करण्यात येणार आहे. यामध्ये खातेनिहाय चर्चा करण्यात येणार आहे. त्यामुळे या अधिवेशनात २४ खात्यांबद्दल चर्चा करण्यात येणार आहे. तसेच विरोधी पक्षातर्फे नियम २९६ अन्वये मांडण्यात आलेल्या कायदा आणि सुव्यवस्था या विषयावर चर्चेला Mansukh Hiren case  गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडून उत्तर देण्यात येईल. याशिवाय नियम २९२ अन्वये विरोधी पक्षाकडून अंतिम आठवडा प्रस्ताव मांडण्यात येतो, त्यावरसुद्धा चर्चा करण्यात येणार आहे.

भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस सरकारचा महत्त्वांकांक्षी प्रकल्प असलेल्या ३३ कोटी वृक्ष लागवड विशेष मोहिमेची चौकशी करण्याची घोषणा राज्य सरकारकडून करण्यात आली होती. त्या समितीची स्थापनासुद्धा आज करण्यात येणार आहे. त्यामुळे आज विरोधक काय भूमिका घेतात हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

मुख्यमंत्रिपदासाठी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचं नाव शर्यतीत !

रेखा जरे हत्याकांड प्रकरण : ॲड. उमेशचंद्र यादव यांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती

खासदार मोहन डेलकर आत्महत्याप्रकरणी मुंबई पोलिसांकडून FIR दाखल; राजकीय वातावरण तापलं

अखेर पोलिस अधिकारी सचिन वाझेंची मुंबईच्या गुन्हे शाखेतून उचलबांगडी, गृहमंत्री अनिल देशमुख यांची घोषणा

“शिवसेनेत सर्व्हे अन् प्रमुख पदासाठी मतदान झालं, तर उद्धव ठाकरे पक्षप्रमुखही राहणार नाहीत” ! ‘या’ भाजप नेत्याची उद्धव ठाकरेंवर टीका

पेट्रोल-डिझेल स्वस्त होणार ? सर्वसामान्यांना दिलासा देण्यासाठी मोदी सरकारची नवी रणनीती 

Related Posts