IMPIMP

Maharashtra Politics | राज्याच्या सत्तासंघर्षावरील सुनावणी पुढे ढकलली, निवडणूक चिन्हाबाबत निवडणूक आयोगाला दिले महत्त्वाचे आदेश

by nagesh
Maharashtra Political News | all remaining 13 mlas of thackeray faction in touch with cm eknath shinde says uday samant

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Maharashtra Politics | पक्षाच्या निवडणूक चिन्हाबाबत (Party Election Symbol) निवडणूक आयोगाला (Election
Commission) कार्यवाही करण्याची परवानगी देण्याबाबत आदेश देण्याच्या मागणीसाठी शिंदे गटाने (Shinde Group) दाखल केलेल्या याचिकेवर
सुप्रीम कोर्टाच्या (Supreme Court) घटना पीठासमोर (Maharashtra Politics) आज सुनावणी झाली. घटनापीठाने (Constitution Bench) 27
सप्टेंबर रोजी पुढील सुनावणी घेणार असल्याचे जाहीर केले. तसेच पुढील सुनावणीपर्यंत निवडणूक आयोगाने कोणताही निर्णय घेऊ नयेत असे निर्देश
सुप्रीम कोर्टाने दिले आहेत. पुढील सुनावणीत महत्त्वाचे आदेश देण्याची शक्यता आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

मागील तीन महिन्यापासून सुप्रीम कोर्टात रखडलेल्या महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावरील (Maharashtra Politics) याचिकांवर आज सुप्रीम कोर्टातील घटनापीठापुढे सुनावणी झाली. न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड (Justice Dhananjay Chandrachud) यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आलेल्या पाच न्यायमूर्तींच्या घटनापीठा समोर ही सुनावणी झाली. महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावरील सुनावणीसाठी स्थापन करण्यात आलेल्या घटना पीठामध्ये न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड, न्यायमूर्ती एम.आर. शहा (Justice M. R. Shah), न्यायमूर्ती कृष्ण मुरारी (Justice Krishna Murari), न्यायमूर्ती हिमा कोहली (Justice Hima Kohli) आणि न्यायमूर्ती पी. नरसिंहा (Justice P. Narasimha) यांचा समावेश आहे. घटनापीठ स्थापन करताना सरन्यायाधीश उदय लळीत (Chief Justice Uday Lalit) यांनी त्यात स्वत:चा समावेश केला नाही. त्यामुळे सुनावणीदरम्यान ते घटनापीठाचा भाग नसणार आहेत.

 

 

शिंदे गटाने दाखल केलेल्या याचिकेवर न्यायमूर्ती चंद्रचूड यांच्या घटनापीठासमोर सुनावणी झाली. यावेळी शिंदे गटाचे वकील अ‍ॅड. नीरज कौल (Adv. Neeraj Kaul) यांनी निवडणूक आयोगाला कार्यवाही करण्यास परवानगी द्यावी. जेणेकरून निवडणूक आयोग पक्षाच्या निवडणूक चिन्हाबाबत निर्णय घेईल. त्यानंतर घटनापीठाने 27 सप्टेंबर रोजी सुनावणी घेणार असल्याचे जाहिर केले. या सुनावणीत पक्षकारांचे म्हणणे ऐकले जाणार असल्याचे न्यायमूर्ती चंद्रचूड यांनी सांगितले.

 

Web Title :- Maharashtra Politics | maharashtra political crisis supreme court constitutional bench will hear 27 september 2022

 

हे देखील वाचा :

Pune Crime | रिक्षाचालकाने मारहाण करुन प्रवाशाला लुटले

Pune ACB Trap | 7000 रुपयाची लाच घेणार्‍या पोलीस कर्मचार्‍यासह दोघांना अटक

Cyrus Mistry | डेटा रेकॉर्डर चिप उघड करणार कार दुर्घटनेचे रहस्य? जर्मनीत मर्सिडीज करणार डिकोड

 

Related Posts