IMPIMP

‘मुख्यमंत्र्यांना सचिन वाझेंचा इतका कळवळा कशासाठी ? चौकशी होऊ द्या, मग…’

by pranjalishirish
mansukh-hiren-death-bjp-target-cm-uddhav-thackeray-over-statement-sachin-vaze

सरकारसत्ता ऑनलाइन – विधिमंडळात मनसुख हिरेन प्रकरण (Mansukh Hiren Death Case) गाजताना दिसलं. भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी पोलीस अधिकारी सचिन वाझे (Sachin Vaze) यांच्याविरोधात अनेक गंभीर आरोप केले. हिरेन यांच्या कुटुंबीयांनीदेखील वाझे विरोधात खळबळजनक आरोप केल्यानं याला वेगळंच वळण लागलं. अधिवेशन संपल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी यावर भाष्य करत विरोधकांना झापलं होतं. सचिन वाझे म्हणजे ओसामा बीन लादेन आहे का, असा सवाल त्यांनी केला होता. यानंतर आता भाजपनं मुख्यमंत्र्यांच्या विधानाचा समाचार घेतला आहे. सचिन वाझेंची चौकशी पूर्ण होऊ द्या, मग त्यांची बाजू घ्या. मुख्यमंत्र्यांना वाझेंचा Sachin Vaze  इतका कळवळा कशासाठी आहे, असा सवालही त्यांनी केला आहे.

‘मुख्यमंत्र्यांना वाझेंचा इतका कळवळा कशासाठी ?’

भाजपनं ट्विट करत यावर भाष्य केलं आहे. आपल्या ट्विटमध्ये भाजपनं लिहिलं की, सचिन वाझेंवरील आरोपांची चौकशी सुरू आहे. परंतु मुख्यमंत्रीच त्यांची वकिली करत आहेत. मुख्यमंत्री महोदय, चौकशी पूर्ण होऊ द्या, मग खुशाल बाजू घ्या. तोपर्यंत मुख्यमंत्र्यांना वाझेंचा इतका कळवळा कशासाठी आहे, वाझेंना Sachin Vaze मुख्यमंत्री झुकतं माप का देतात हे प्रश्न जनतेला पडणारच.

‘वाझेंना वाचवणारे खरे चेहरे कुणाचे, याची जनतेला प्रतीक्षा आहे’

पुढं भाजपनं असंही लिहिलंय की, चुकीच्या गोष्टींना पाठीशी घालणाऱ्या ठाकरे सरकारला भाजपनं अर्थसंकल्पीय अधिवेशनात चांगलाच धडा शिकवला, अकार्यक्षमतेचा कळस गाठणाऱ्या सरकारला भाजपनं हिरेन प्रकरणासह अनेक मुद्द्यांची दखल घ्यायला भाग पाडलं. हिरेन हत्या प्रकरणात बरीच मोठी नावं बाहेर येतील. वाझेंना वाचवणारे खरे चेहरे कुणाचे, याची जनतेला प्रतीक्षा आहे, असा टोलाही त्यांनी मुख्यमंत्र्यांना लगावला आहे.

Alos Read :

Pune : बांधकामात गुंतवणूक करण्याच्या अमिषाने 74 लाखाला गंडा, एकावर FIR दाखल

लोकांच्या जीवनाचे प्रश्न महत्त्वाचे आहेत हे विरोधी पक्षाला कधी कळणार?

फडणवीस आणि चंद्रकांत पाटील यांनी नागपूरला जाऊन घेतली सरसंघचालकांची भेट, राजकीय वर्तुळात च

Related Posts