IMPIMP

‘मुंबई पोलिसांचे, थोबाड काळे झाले’, पोलिसांबद्दल फडणवीस असं कसं बोलू शकतात ?

by pranjalishirish
mansukh-hiren-death-how-can-devendra-fadnavis-use-such-language-mumbai-police-says-anil-deshmukh

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन – मागील सरकारमध्ये स्वत: देवेंद्र फडणवीस Devendra Fadnavis यांनी गृहमंत्री या नात्याने पोलिस दलाचे नेतृत्व केले असून, पाच वर्षे याच पोलिसांनी त्यांना साथ दिली होती. प्रशासन चालविण्यात आणि राज्यातील कायदा सुव्यवस्था राखण्यात पोलिसांनी मदत केली होती. आता मुंबई पोलिसांचे थोबाड काळे झाले, अशा प्रकारची भाषा ते कसे वापरू शकतात, असा संतप्त सवाल गृहमंत्री अनिल देशमुख यांनी फडणवीस यांना उद्देशून मंगळवारी केला आहे.

मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणावरून विधानसभेत सत्ताधारी आणि विरोधक आमने-सामने आले होते. त्यानंतर गृहमंत्री अनिल देशमुख यांनी फडणवीस
यांच्यावर टीका करताना म्हटलं की, महाराष्ट्र पोलिस दलाचे संपूर्ण जगात नाव आहे. यामागे आम्हा कोणत्या राजकारण्यांचे नाही तर पोलिसांचेच
कर्तृत्व आहे. महाराष्ट्र पोलीस दलाला उज्वल परंपरा आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस Devendra Fadnavis महाराष्ट्रावर एवढा राग का काढत आहेत हेच समजत नाही, असा टोला त्यांनी लगावला.

दवेंद्र फडणवीस Devendra Fadnavis यांचे हे आरोप संपूर्ण महाराष्ट्राची बदनामी करणारे आहेत, असा दवा अनिल देशमुख यांनी केला. महाराष्ट्र पोलिस दलाला उज्वल परंपरा आहे म्हणून सामान्य माणसाचा कायदा आणि सुव्यवस्थेवर विश्वास ठेवून आहे. क्षुद्र राजकारणासाठी आपण या पद्धतीचे आरोप करून सामान्य जनतेचा विश्वास डळमळीत करू नका, असे आवाहनही गृहमंत्री देशमुख यांनी यावेळी केले.

Also Read :

एवढी चिंता राहुल यांना मी काँग्रेसमध्ये असताना असती तर..’, ‘त्या’ विधानावर ज्योतिरादित्य शिंदेचे प्रत्युत्तर

भाजप विधानसभेची उद्या होणार बैठक; CM रावत यांनी दिला मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा

Related Posts