IMPIMP

मराठा आरक्षणप्रश्नी अशोक चव्हाण यांनी सभागृहाला खोटी माहिती दिली; देवेंद्र फडणवीस यांची टीका

by amol
maratha reservation issue will file infringement against ashok chavan say devendra fadnavis

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन – विधानसभेबाहेर प्रसारमाध्यमांशी बोलताना मराठा आरक्षणप्रश्नी अशोक चव्हाणांविरोधात Ashok Chavan हक्कभंग दाखल करणार असल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. तसेच राज्यातील कायद्यांबाबत चव्हाणांना माहिती नाही, अशी टीकादेखील फडणवीस यांनी केली आहे. एसईबीसी कायदा अडचणीत आणण्याबाबत सरकारचा प्रयत्न असल्याचा आरोप त्यांच्याकडून करण्यात आला आहे. तसेच मराठा आरक्षणप्रश्नी अशोक चव्हाण Ashok Chavan यांनी सभागृहात खोटी माहिती दिल्याचा दावादेखील त्यांच्याकडून करण्यात आला आहे.

दरम्यान, राज्याच्या अर्थसंकल्पामध्ये मनसुख हिरेन यांच्या हत्येमागे सचिन वाझेंचा हात असल्याचा गंभीर आरोप करून त्यांना अटक झाली पाहिजे, अशी मागणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. यामुळे सभागृहात गोंधळ झाला. यानंतर देवेंद्र फडणवीस यांच्याकडून गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याविरोधात हक्कभंग दाखल करण्याचे सुचवण्यात आले. Ashok Chavan

जर संजय राठोड यांच्याविरोधात कारवाई होऊ शकते, तर मग सचिन वाझे यांना अटक करायला सरकार का घाबरत आहे. सचिन वाझे यांच्याकडे असे काय आहे की, त्यामुळे सरकार त्यांच्यावर कारवाई करत नाही आहे. सचिन वाझेंना पदावरून दूर करण्याची मागणी भाजपकडून करण्यात आली आहे. संजय राठोड यांच्या राजीनाम्याचा निर्णय घेतला जाऊ शकतो तर तर वाझेंना संरक्षण का? असा सवालदेखील फडणवीस यांनी उपस्थित केला आहे. यानंतर सचिन वाझे हे पोलीस आयुक्तांना भेटण्यासाठी मुंबई पोलीस आयुक्तालयात दाखल झाले.

मुख्यमंत्रिपदासाठी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचं नाव शर्यतीत !

रेखा जरे हत्याकांड प्रकरण : ॲड. उमेशचंद्र यादव यांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती

खासदार मोहन डेलकर आत्महत्याप्रकरणी मुंबई पोलिसांकडून FIR दाखल; राजकीय वातावरण तापलं

अखेर पोलिस अधिकारी सचिन वाझेंची मुंबईच्या गुन्हे शाखेतून उचलबांगडी, गृहमंत्री अनिल देशमुख यांची घोषणा

“शिवसेनेत सर्व्हे अन् प्रमुख पदासाठी मतदान झालं, तर उद्धव ठाकरे पक्षप्रमुखही राहणार नाहीत” ! ‘या’ भाजप नेत्याची उद्धव ठाकरेंवर टीका

Related Posts