IMPIMP

संजय राऊतांचा विरोधकांना थेट सवाल, म्हणाले – ‘मुंबई पोलिसांच्या तोंडाला काळं कोणी फासलं?’

by amol
sanjay raut slams bjp over mansukh hiren death case

सरकारसत्ता ऑनलाइन – विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी आरोप केला होता की, सरकारनं मुंबई पोलिसांच्या तोंडाला काळं फासलं आहे. यावर आता शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी भाष्य करत टीका केली आहे. मुंबई पोलिसांच्या तोंडाला काळं कोणी फासलं असा सवाल करत ते म्हणाले, विरोधी पक्षानं पोलिसांच्या तोंडाला काळं फासू नये. देवेंद्र फडणवीस  हे 5 वर्षे सत्तेत होते. पोलिसांचं काम कसं चालतं हे त्यांना माहीत आहे. त्यांनी अशी भाषा करू नये. मनसुख हिरेन प्रकरण (Mansukh Hiren Death Case) राजकीय प्रतिष्ठेचं करू नये, असं आवाहनही त्यांनी केलं आहे.

‘हिरेनप्रकरणी पोलिसांचं खच्चीकरण’

संजय राऊत Sanjay Raut म्हणाले, हिरेन मृत्यू प्रकरणात कोणीही राजकीय प्रतिष्ठेचा विषय करू नये. कुणाचाही मृत्यू वाईटच असतो. मग तो अन्वय नाईक असो, नाईक यांच्या आईचा असो, मोहन डेलकर असो की मनसुख हिरेन यांचा असो. अनैसर्गिक मृत्यूचा तपास व्हायलाच पाहिजे. त्यासाठी राज्याचे पोलीस आणि यंत्रणा सक्षम आहे. विरोधी पक्षानं त्यावर शंका घेणं म्हणजे पोलिसांचं मनोबल खच्चीकरण केल्यासारखं आहे, त्यांच्याकडे पुरावे असतील आणि त्याची दखल घेतली जात नसेल तर त्यांनी वेगळ्या प्लॅटफॉर्मवर आवाज उठवला पाहिजे.Sanjay Raut

‘एनआयला तपास देण्यमागे काळंबेरं’

पुढं बोलताना ते म्हणाले, हिरेन प्रकरणाचा तपास एनआयएला करू द्या. एटीएस तपास करत आहे. निष्कर्ष आला नाही. घाईघाईत एनआयएला तपास देणं मला यात काही काळंबेरं असल्याचं दिसून येतं, असा दावाही त्यांनी केला.

मुख्यमंत्रिपदासाठी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचं नाव शर्यतीत !

रेखा जरे हत्याकांड प्रकरण : ॲड. उमेशचंद्र यादव यांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती

खासदार मोहन डेलकर आत्महत्याप्रकरणी मुंबई पोलिसांकडून FIR दाखल; राजकीय वातावरण तापलं

अखेर पोलिस अधिकारी सचिन वाझेंची मुंबईच्या गुन्हे शाखेतून उचलबांगडी, गृहमंत्री अनिल देशमुख यांची घोषणा

“शिवसेनेत सर्व्हे अन् प्रमुख पदासाठी मतदान झालं, तर उद्धव ठाकरे पक्षप्रमुखही राहणार नाहीत” ! ‘या’ भाजप नेत्याची उद्धव ठाकरेंवर टीका

Related Posts