IMPIMP

Pandharpur : अजित पवारांच्या बैठकीला सभेचे स्वरूप, पोलिसांत FIR दाखल

by pranjalishirish
nature meeting came ajit pawars meeting finally case was registered pandharpur police

पंढरपूर : सरकारसत्ता ऑनलाइन-  मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीच्या संदर्भात रविवारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकिला प्रदेशाध्याक्ष जयंत पाटील, उपमुख्यमंत्री अजित पवार Ajit Pawar  उपस्थित होते. अजित पवार यांनी घेतलेल्या बैठकीला सभेचे स्वरुप आले. या ठिकाणी 50 पेक्षा अधिक लोकांची गर्दी झाल्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्याविरुद्ध पंढरपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पंढरपूरसाठी जनतेच्या मनातीलच उमेदवार दिला आहे, अजित पवारांनी दिले स्पष्ट संकेत

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार Ajit Pawar  यांनी रविवारी सकाळी नऊ ते साडेबारा या कालावधीत पंढरपूर येथील कोर्टी रोडवरील श्रेयस पॅलेस येथे आढावा बैठक बोलावली होती. या बैठकीसाठी राष्ट्रवादीचे पदाधिकारी संदीप औदुंबर मांडवे यांनी शनिवारी (दि.20) रितसर परवानगी घेतली होती. कोविडच्या नियम व अटी व शर्तीनुसार त्यांना बैठकीची परवानगी देण्यात आली होती. मात्र, बैठकली 50 लोकांना उपस्थित राहण्यास परवानगी देण्यात आली असताना 50 पेक्षा अधिक लोक उपस्थित राहिले होते.

‘हा’ कटाचाच भाग, शिवसेनेने सांगितला घटनाक्रम !

अजित पवार Ajit Pawar यांनी बोलावलेल्या बैठकिला केवळ 50 लोकच उपस्थित राहतील अशी लेखी सूचना देण्यात आली होती. मात्र, बैठकीच्या वेळी 50 पेक्षा अधिक लोकांनी गर्दी केली. यामुळे पंचायत समितीचे उपविभागीय अधिकाऱ्यांनी नेमलेल्या छायाचित्रीकरण पथक प्रमुख मेघराज काशिनाथ कोरे (वय-54) यांनी संदीप औदुंबर मांडवे (रा. लक्ष्मी टाकळी, ता. पंढरपूर) यांच्या विरुद्ध कलम 188 भादवि अन्वये तक्रार दिली. अशी माहिती उप विभागीय पोलिस अधिकारी विक्रम कदम यांनी दिली आहे. प्राप्त तक्रारीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Also Read : 

RJ : धान्याच्या कोठीमध्ये अडकले मुले, गुदमरून 5 जणांचा मृत्यू

खा. संजय राऊतांचा सरकारला सल्ला, म्हणाले -‘सरकारमधील प्रत्येक घटकानं आत्मपरीक्षण करावं’

‘तलाश नए रास्तों की है…’ खा. संजय राऊतांच्या ट्विटने राजकीय वर्तुळात खळबळ

पंढरपूरचा उमेदवार शरद पवार ठरवतील

परमबीर सिंहांच्या पत्रामुळं गृहमंत्र्यांवर राजीनाम्याचा दबाव? शरद पवारांनी अजितदादांसह ‘या’ दिग्गज मंत्र्याला बोलावलं दिल्लीत

तपासावरून लक्ष विचलित करण्यासाठी परमबीर सिंग यांचे पत्र – जयंत पाटील

शरद पवारांचा दिल्लीतून भाजपवर ‘निशाणा’, फडणवीसांनी केला ‘पलटवार’

शरद पवारांनी ‘लेटर बॉम्ब’च्या ‘त्या’ कनेक्शन कडे वेधले लक्ष, म्हणाले…

Related Posts