IMPIMP

‘मी पुन्हा येईनचं स्वप्न अजूनही जिवंत !’ रोहित पवारांचा देवेंद्र फडणवीसांना टोला

by pranjalishirish
ncp rohit pawar slams bjp and devendra fadnavis over parambir singh case

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाईन – काही दिवसांपूर्वी माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी टाकलेल्या लेटरबॉम्बमुळे राजकारणात मोठी खळबळ उडाल्याचे पाहायला मिळत आहे. या प्रकरणाचे संसदेतसुद्धा प्रतिसाद उमटल्याचे पाहायला मिळाले आहे. भाजपसह दुसऱ्या पक्षांच्या खासदारांनीसुद्धा महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी केली. आता या प्रकरणावर राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार Rohit Pawar  यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि भाजपवर जोरदार टीका करत “मी पुन्हा येईनचं स्वप्न अजूनही जिवंत!” असा टोला सुद्धा लगावला आहे.

सरकारी कर्मचाऱ्यांना खुशखबर ! वेतनात घसघशीत वाढ करुन वाढवले निवृत्तीचे वय, ‘या’ सरकारचा महत्त्वाचा निर्णय

काय म्हणाले रोहित पवार
आमदार रोहित पवार Rohit Pawar यांनी आपल्या ट्विटरद्वारे ट्विट करत भाजप आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली आहे. “अधिवेशनाच्या पहिल्या दिवसापासून आजपर्यंतच्या घडामोडी, सरकारवरील आरोपांची मालिका बघता नेमकं काय होतंय, कशासाठी होतंय आणि कोण करतंय याचा अंदाज प्रत्येकाला नक्कीच आला असेल. गृहमंत्री महोदयांनी हॉस्पिटलमध्ये दिलेल्या ‘प्रेस बाईट’चे व्हिडिओ ट्विट करून विरोधी पक्षनेत्यांनी जो केविलवाणा प्रयत्न केला यातून त्यांच्या मनात ‘मी पुन्हा येईन’चे स्वप्न अजूनही जिवंत असल्याचं प्रतीत होतं” अशा प्रकारचे ट्विट करत त्यांनी निशाणा साधला आहे.

“विरोधी पक्ष सत्तेसाठी किती उतावीळ झालाय, हे सगळ्या महाराष्ट्राने पाहिलं”
“गृहमंत्र्यांना क्वारंटाईन होण्यास सांगितले असताना त्यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेवर सुधीर मुनगंटीवार साहेबांकडून आक्षेप घेण्यात आला. पण त्यांनी विरोधी पक्षनेत्यांनी ४ नोव्हेंबर २०२० रोजी दवाखान्यातून डिस्चार्ज घेतानाचे ट्विट केलेले फोटो बघावेत आणि मग आपल्या आक्षेपाचा विचार करावा. महाराष्ट्राच्या हक्कांवर गदा येत असताना जे कधी एक शब्दही बोलले नाहीत ते महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्यासाठी संसदेत आक्रमक झालेले पाहायला मिळत आहे. केवळ राजकीय पतंग न उडवता महाराष्ट्राच्या हिताचं काम केलं तर महाराष्ट्र नक्कीच आपला अभिमान बाळगेल, हे त्यांनी लक्षात घ्यायला हवं. संसदेत महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची झालेली मागणी, राज्यात विरोधी पक्षनेत्यांनी केलेले ट्विट्स, काहींनी राज्यपालांना भेटून राष्ट्रपती राजवट लागू करण्याची केलेली मागणी या गोष्टी बघता विरोधी पक्ष सत्तेसाठी किती उतावीळ झालाय, हे सगळ्या महाराष्ट्राने पाहिलं.” असे देखील आमदार रोहित पवार Rohit Pawar म्हणाले आहे.

‘ए भाई, तू जो कोण असशील – माझ्या वर बोट उचलायचं न्हाय !’ अमृता फडणवीसांचा भाई जगतापांना इशारा

 

बीडमध्ये NCP चा शिवसेनेला धक्का ! महत्त्वाच्या नेत्यांसह 101 प्रमुख कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादीत प्रवेश

“सत्य समोर येईपर्यंत असत्य गावभर हिंडून येतं
“जर एखाद्या व्यक्तीला पदावरून काढल्यानंतरच ती झालेल्या गैरकारभाराबद्दल बोलते, म्हणजे गैरकारभार झाला की पदावरून गेल्याचं दुःख आहे, हा प्रश्नसुद्धा महत्वाचा आहे. जे लोक हातात अधिकार असताना काहीही न बोलणारे पदावरून हटवताच बेछूट आरोप करत सुटतात, याचा अर्थ काय समजावा? हा अधिकारी दिल्लीत कोणाला भेटला? नंतर सर्वोच न्यायालयात याचिका दाखल करत सीबीआय चौकशीची मागणी का करतो? तो स्वतः बोलतोय की कुठली राजकीय शक्ती एखाद्या राजकीय हेतूपोटी या अधिकाऱ्याकडून हे सगळं वदवून घेतेय, अशी शंका निर्माण होत आहे. हा सगळा प्रकार आणि गेल्या काही दिवसातील घडामोडी बघता मार्क ट्वेनच्या ‘सत्य समोर येईपर्यंत असत्य गावभर हिंडून येतं’, या वाक्याची प्रचिती येते आणि हा राजकीय पोळ्या भाजण्याचा प्रयत्न असल्याचा दाट संशय येतो” असे म्हणत रोहित पवार Rohit Pawar यांनी विरोधी पक्षावर निशाणा साधला आहे.

वेळ आल्यावर ‘करेक्ट’ कार्यक्रम’ ! ‘बदलीनंतर परमबीर सिंग दिल्लीत कोणाला भेटले? – राष्ट्रवादी

“सत्तेसाठी कुठल्या थराला जायचं याचा विचार मात्र विरोधकांनी करावा”
“अनैतिक मार्गांने सरकार पाडणं शक्य होत नसल्याने बेछूट आरोप करून सरकारविषयी जनतेच्या मनातली आपलेपणाची भावना नाहीशी करण्याचा विरोधी पक्ष नेहमीच प्रयत्न करतो. जर आरोप खरे असतील तर चौकशी होऊन सत्य समोर येईलच, परंतु सत्तेसाठी कुठल्या थराला जायचं याचा विचार मात्र विरोधकांकडून करण्यात यावा. काही महिन्यांपूर्वीही सुशांतसिंह आत्महत्या प्रकरणावरून महाराष्ट्राला बदनाम करण्याचा डाव खेळण्यात आला, परंतु त्या प्रकरणातसुद्धा सत्य बाहेर आलेच. या प्रकरणीही सत्य समोर येईलच, परंतु या सर्व घडामोडींमध्ये जनतेचे मूलभूत प्रश्न बाजूला पडू नयेत हिच अपेक्षा” असे रोहित पवार Rohit Pawar यांनी आपल्या ट्विट मध्ये म्हंटले आहे.

मोठ्या शहरांमध्ये ‘लॉकडाऊन’ ची शक्यता ?

तसेच या अगोदर काँग्रेसकडून देवेंद्र फडणवीस यांच्यावर हल्लबोल करण्यात आला. काँग्रेसने “सत्ता गेल्यानंतर मानसिक संतुलन कसे बिघडते याचे उत्तम उदाहरण म्हणजे देवेंद्र फडणवीस” असा टोला लगावला आहे. काँग्रेस प्रवक्ते डॉ. राजू वाघमारे यांनी “भाजपच्या 22 मंत्र्यांवर पुराव्यानिशी आरोप होते, कोणी राजीनामा दिला?” असा सवाल करत भाजपला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला आहे. तसेच “15 फेब्रुवारी रोजी प्रेस झाली परंतू हॉस्पिटलच्या परिसरात देशमुखांना डिस्चार्ज मिळाल्यावर! खोटे बोलून संभ्रम तयार करायचा! सत्ता गेल्यानंतर काही माणसांचे मानसिक संतुलन कसे बिघडते याचे उत्तम उदाहरण म्हणजे फडणवीस व भाजप नेते कृपा करून तपासून घ्या” असे देखील डॉ. राजू वाघमारे म्हणाले आहे.

Also Read :

67th National Awards : ‘छिछोरे’ बेस्ट हिंदी फिल्म, तर ‘मणिकर्णिका’ साठी कंगनाला बेस्ट अ‍ॅक्ट्रेस अवॉर्ड, पहा संपूर्ण लिस्ट

परमबीर सिंगांचा आणखी एक दावा; आता घेतलं रश्मी शुक्लांचं नाव अन् म्हणाले…

Nana Patole : ‘शेतकरी संघटनांच्या 26 मार्चच्या भारत बंदला काँग्रेसचा सक्रिय पाठींबा’

HM अनिल देशमुख यांच्यासाठी शरद पवार हे ’पावर बँक’ बनण्यामागे काय आहे ‘पॉलिटिक्स’?

‘क्लीनचिट द्यायला शरद पवार न्यायाधीश नाहीत’; पुण्याचे खासदार गिरीश बापट यांचा टोला

महाविकास आघाडीसोबत 190 आमदार असल्याचा दावा; हसन मुश्रीफ यांनी दिले भाजपला ‘आव्हान’

…म्हणून फडणवीसांच्या निवासस्थानी सुरक्षाव्यवस्थेत वाढ

‘गोकुळ’चे राजकारण ! मंत्री सतेज पाटील यांचा सत्ताधाऱ्यांना दणका

Related Posts