IMPIMP

‘ताईंचा नवरा भ्रष्टाचाराच्या गुन्ह्यात अडकलेला अन् ताई विचारतात, नवा वसुली मंत्री कोण ?’

by bali123
ncps rupali chakankar has answered bjp leader chitra waghs question

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन – अनिल देशमुख यांच्या राजीनाम्यानंतर ‘आता नवीन वसुली मंत्री कोण होणार ?’ असा प्रश्न विचारणाऱ्या भाजपच्या प्रदेश उपाध्यक्ष चित्रा वाघ यांच्यावर राष्ट्रवादी काँग्रेसने जोरदार हल्ला चढवला आहे. ‘चित्राताईंचा स्वत:चा नवरा भ्रष्टाचाराच्या गुन्ह्यात अडकलेला आहे आणि त्या नवीन वसुली मंत्री कोण हे विचारत आहेत’, असा सणसणीत टोला राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर Rupali Chakankar यांनी लगावला आहे.

रुपाली चाकण Rupali Chakankar यांनी म्हटले की, ताई, भावनेच्या भरात इतकंही वाहून जाऊ नका की अंगलट आलं की परत ‘पवार साहेब माझ्या वडिलांसारखे आहेत, हे म्हणण्याची वेळ येईल’, अशा खरमरीत शब्दात चाकणकर यांनी चित्रा वाघ यांचे नाव न घेता पलटवार केला आहे. अनिल देशमुख यांनी राजीनामा दिल्यानंतर विरोधकांनी टीकेचे बाण सोडण्यास सुरुवात केली आहे. त्याला राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून जशास तसे प्रत्युत्तर देण्यात येत आहे.

परमबीर सिंह यांनी केलेल्या 100 कोटींच्या वसुलीच्या आरोपांची सीबीआय चौकशी करण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने दिल्यानंतर काल अनिल देशमुख यांनी गृहमंत्रिपदाचा राजीनामा दिला. त्यांच्या राजीनाम्यानंतर विरोधकांनी सरकारवर टीकेचे बाण सोडले होते. गेल्या काही दिवसांपासून सरकारविरोधात ट्विट करुन निशाणा साधणाऱ्या चित्रा वाघ यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर निशाणा साधला होता. अखेर अनिल देशमुखांनी राजीनामा दिला आहे. आता प्रश्न आहे की नवीन वसुली मंत्री कोण होणार ? चेहरे बदलल्यानं महाविकास आघाडी सरकारचा भ्रष्ट हेतू बदलणार नाही, असं चित्रा वाघ यांनी म्हटले होते.

चित्रा वाघ यांच्या टीकेचा रुपाली चाकणकर यांनी फेसबुक पोस्टच्या माध्यमातून खोचक शब्दांत समाचार घेतला आहे. ‘ताईंचा नवरा स्वत: भ्रष्टाचाराच्या गुन्ह्यात अडकलेला आरोपी असून, त्यांच्यावर रीतसर गुन्हा दाखल झाला आहे आणि ताई विचारत आहेत नवीन वसुली मंत्री कोण ? ताई, भावनेच्या भरात इतकंही वाहून जाऊ नका की अंगलट आलं की परत ‘पवार साहेब माझ्या वडिलांसारखेच आहेत’ हे म्हणण्याची वेळ येईल. थोडा धीरज रखो, सब सच सामने आयेगा !’ असा खोचक टोला चाकणकर Rupali Chakankar यांनी लगावला आहे.

Read More : 

राज ठाकरेंचं ‘ते’ भाकीत खरं ठरणार?

अत्यावश्यक आणि जीवनावश्यक सेवा वगळून इतर सर्व दुकाने बंद – मनपा आयुक्त विक्रम कुमार

मुंबई पोलिस काहीच करत नव्हते; देशमुखांच्या राजीनाम्यानंतर किरीट सोमय्या यांची प्रतिक्रिया

‘आता किमान समान कार्यक्रम म्हणून तिसऱ्या विकेटसाठी काँग्रेसला संधी हवी, अन्याय होऊ नये’, भाजपचा टोला

उदगीर पंचायत समितीच्या इमारतीसाठी 10 कोटींचा निधी मंजूर – राज्यमंत्री संजय बनसोडे

‘अनिल देशमुखांच्या निवासस्थानी 100 कोटींबाबतचे पुरावे नष्ट करण्याचे काम सुरु, CBI ने कारवाई करावी’

‘सचिन वाझे, परमबीर यांनी जे केलं तेच देशमुखांनी कारावे, शरद पवार, उद्धव ठाकरेंनी वसुली करण्याचे सांगितलं असं थेट सांगावं’

जे समोर आलं ते फक्त हिमनगाच्या टोकाप्रमाणे, आगे आगे देखो…होता है क्या?’ – भाजप नेते गिरीश महाजन

Related Posts