IMPIMP

अनिल देशमुख 15 फेब्रुवारीच्या नागपूर- मुंबई विमान प्रवासच्या ‘या’ तिकीटामुळे येऊ शकतात अडचणीत

by pranjalishirish
new twist anil deshmukh nagpur mumbai flight february 15 these tickets can be expensive ncp

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाईन – काही दिवसांपूर्वी माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी टाकलेल्या लेटरबॉम्बमुळे देशाच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली होती. या प्रकरणाचे पडसाद संसदेतसुद्धा उमटले होते. भाजपसह दुसऱ्या पक्षांच्या खासदारांनीसुद्धा महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी केली. तर राष्ट्रवादीचे सर्वेसेवा शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन परमबीर सिंग यांनी केलेला दावा खोडून काढण्याचा प्रयत्न केला आहे. यानंतर १५ फेब्रुवारी रोजी अनिल देशमुख Anil Deshmukh  यांनी पत्रकार परिषद घेतल्याचे समोर आल्यानंतर आता आणखी एक पुरावा विरोधी पक्षांच्या हाती लागला आहे. यामुळे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या अडचणीत अजून वाढ होण्याची शक्यता आहे.

सरकारी कर्मचाऱ्यांना खुशखबर ! वेतनात घसघशीत वाढ करुन वाढवले निवृत्तीचे वय, ‘या’ सरकारचा महत्त्वाचा निर्णय

“परमबीर सिंग यांनी पत्रात नमूद केल्यानुसार फेब्रुवारीच्या मध्यात अनिल देशमुख Anil Deshmukh  कोरोनामुळे नागपुरात त्यांच्या राहत्या घरी क्वारंटाइन होते. त्यामुळे त्यांना कुणी भेटण्याचा प्रश्नच उद्भवत नाही”, असे म्हणत परमबीर सिंग यांनी केलेला दावा खोटा असल्याचे शरद पवार यांनी सांगितले होते. यासोबत शरद पवार यांनी अनिल देशमुख कोरोनामुळे रुग्णालयात दाखल असल्याचे आणि डिस्चार्ज मिळाल्यानंतर ते क्वारंटाइन असल्याचे कागदपत्रे त्यांनी सादर केले आहेत.

‘ए भाई, तू जो कोण असशील – माझ्या वर बोट उचलायचं न्हाय !’ अमृता फडणवीसांचा भाई जगतापांना इशारा

शरद पवार काय म्हणाले
“अनिल देशमुख Anil Deshmukh फेब्रुवारी महिन्यात ५ ते १५ तारखेपर्यंत कोरोनामुळे रुग्णालयात दाखल होते. १५ फेब्रुवारी रोजी त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. त्यानंतर ते १५ ते २७ फेब्रुवारी दरम्यान नागपुरात राहत्या घरी होम क्वारंटाईन होते. त्यामुळे परमबीर सिंग यांनी केलेले आरोप आणि वस्तुस्थिती यात खूप फरक आहे. अनिल देशमुख फेब्रुवारी महिन्यात कुणाला भेटण्याची शक्यताच नव्हती हे सिद्ध झालंय”, असे शरद पवार यांनी पत्रकार परिषदेत म्हटले. यानंतर काही वेळाने भाजपा नेत्यांनी ट्विट करुन अनिल देशमुख यांनी १५ फेब्रुवारीला पत्रकार परिषद कशी काय घेतली असा प्रश्न विचारला होता.

बीडमध्ये NCP चा शिवसेनेला धक्का ! महत्त्वाच्या नेत्यांसह 101 प्रमुख कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादीत प्रवेश

अनिल देशमुख यांनी १५ फेब्रुवारी रोजी नागपूर ते मुंबई असा विमान प्रवास केल्याचे समोर आले आहे. त्यासंबधीत कागदपत्र सापडले आहे. त्यावेळी अनिल देशमुख यांच्याबरोबर ८ जणांनी प्रवास केला होता त्यामध्ये पूजा देशमुख यांचाही समावेश आहे. अनिल देशमुख हे एका खाजगी विमानाने नागपूरहून मुंबईला आले होते. आणि सर्वात महत्वाची बाब म्हणजे अनिल देशमुख यांनीही मी १५ फेब्रुवारीपासून २७ फेब्रुवारीपर्यंत नागपूर येथील घरीच आयसोलेशनमध्ये होतो, असे व्हिडिओद्वारे जाहीरपणे सांगितले आहे. यानंतर नागपूर ते मुंबई या विमानप्रवासाच्या कागदपत्रामुळे पुन्हा एकदा गृहमंत्री अनिल देशमुख अडचणीत सापडण्याची शक्यता आहे.

वेळ आल्यावर ‘करेक्ट’ कार्यक्रम’ ! ‘बदलीनंतर परमबीर सिंग दिल्लीत कोणाला भेटले? – राष्ट्रवादी

देवेंद्र फडणवीस यांचाही सवाल
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी अनिल देशमुख Anil Deshmukh यांचे १५ फेब्रुवारीचे ट्विट रिट्विट केले आहे. १५ ते २७ फेब्रुवारी या दरम्यान अनिल देशमुख होम क्वारंटाईन होते, असे पवार साहेबांनी सांगितले पण १५ फेब्रुवारी रोजी अनिल देशमुख यांनी सुरक्षारक्षकांसह, समोर माध्यम प्रतिनिधी अशी पत्रकार परिषद घेतली. हे नेमके कोण ? असा प्रश्न फडणवीस यांनी विचारला आहे. या व्हिडिओमध्ये अनिल देशमुख पत्रकार परिषद घेताना दिसत आहेत. त्यांच्या पाठीमागे सुरक्षा रक्षकही दिसून येत आहेत. त्यांच्या समोर माध्यमांचे बूम माईकसुद्धा दिसत आहेत त्यामुळे आता पवारांनी केलेल्या दाव्यावरच प्रश्चचिन्ह निर्माण झाले आहे.

मोठ्या शहरांमध्ये ‘लॉकडाऊन’ ची शक्यता ?

पत्रकार परिषदेसंदर्भात देशमुखांचं स्पष्टीकरण
कोरोनाची लागण झाल्यानंतर मी ५ ते १५ फेब्रुवारीदरम्यान नागपूरमधील रुग्णालयात उपचार घेत होतो. तिथून मला १५ फेब्रुवारीला डिस्चार्ज देण्यात आला. मी जेव्हा रुग्णालयातून बाहेर निघत असताना तिथे रुग्णालयाच्या गेटवर काही पत्रकार उपस्थित होते. मात्र मला कोविडमुळे थकवा आला होता. माझ्या अंगात त्राण नव्हते. त्यामुळे तिथेच खूर्चीवर बसून प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यानंतर मी १५ ते २७ फेब्रुवारीदरम्यान होम क्वारेंटाइन होतो. पुढे २८ तारखेला मी पहिल्यांदा घराबाहेर पडलो, असे स्पष्टीकरण अनिल देशमुख यांच्याकडून देण्यात आले आहे.

Also Read :

‘मी पुन्हा येईनचं स्वप्न अजूनही जिवंत !’ रोहित पवारांचा देवेंद्र फडणवीसांना टोला

67th National Awards : ‘छिछोरे’ बेस्ट हिंदी फिल्म, तर ‘मणिकर्णिका’ साठी कंगनाला बेस्ट अ‍ॅक्ट्रेस अवॉर्ड, पहा संपूर्ण लिस्ट

परमबीर सिंगांचा आणखी एक दावा; आता घेतलं रश्मी शुक्लांचं नाव अन् म्हणाले…

Nana Patole : ‘शेतकरी संघटनांच्या 26 मार्चच्या भारत बंदला काँग्रेसचा सक्रिय पाठींबा’

HM अनिल देशमुख यांच्यासाठी शरद पवार हे ’पावर बँक’ बनण्यामागे काय आहे ‘पॉलिटिक्स’?

‘क्लीनचिट द्यायला शरद पवार न्यायाधीश नाहीत’; पुण्याचे खासदार गिरीश बापट यांचा टोला

महाविकास आघाडीसोबत 190 आमदार असल्याचा दावा; हसन मुश्रीफ यांनी दिले भाजपला ‘आव्हान’

…म्हणून फडणवीसांच्या निवासस्थानी सुरक्षाव्यवस्थेत वाढ

‘गोकुळ’चे राजकारण ! मंत्री सतेज पाटील यांचा सत्ताधाऱ्यांना दणका

Related Posts