IMPIMP

पंढरपूर : भाजपच्या अवताडेंना भावाचा ‘धक्का’ तर राष्ट्रवादीच्या भालकेंना मित्रपक्षांमुळं डोकेदुखी, जाणून घ्या राजकारण

by pranjalishirish
Pandharpur : BJP's Vs NCP's Bhagirath Bharat Bhalke

पंढरपूर : सरकारसत्ता ऑनलाइन- राष्ट्रवादीचे दिवंगत आमदार भारत भालके यांच्या निधनानंतर रिक्त असलेल्या पंढरपूर मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून भगीरथ भारत भालके यांना, तर भाजपकडून समाधान अवताडे samadhan avatade यांना उमेदवारी देण्यात आली आहे. या निवडणुकीत भालके विरुद्ध अवताडे  असा सामना रंगणार असून भाजपने सहानुभूतीच्या लाटेत राष्ट्रवादीला तगडे आव्हान दिले आहे. असे असले तरी बंडखोरीमुळे दोन्ही उमेदवारांची डोकेदुखी वाढली आहे.

‘मुलींनो, राहुल गांधीपासून सांभाळून राहा, त्यांच्यासमोर वाकून उभे राहू नका’; माजी खासदाराचे वादग्रस्त वक्तव्य

पोटनिवडणुकीत शिवसेनेच्या महिला आघाडीच्या जिल्हाप्रमुख शैला गोडसे आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सचिन पाटील यांनी बंडाचा झेंडा हाती घेतला आहे. तर दुसरीकडे भाजपचे उमेदवार समाधान अवताडे यांचे चुलत बंधू सिद्धेश्वर अवताडे samadhan avatade  यांनी उमेदवारी अर्ज भरुन समाधान अवताडे यांना धक्का दिला आहे. त्यामुळे एकीकडे मित्र पक्षातील बंडखोरीमुळे आणि दुसरीकडे कुटुंबातील बंडाळीमुळे दोन्ही उमेदवारांना अडचणीचा सामना करावा लागणार असल्याची चिन्हे दिसत आहेत.

शरद पवार पंढरपुरात प्रचारासाठी येणार का? जयंत पाटील म्हणाले…

पंढरपूर विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीत सर्वच पक्षांचे नेते एकमेकांना शह-काटशह देण्यासाठी प्रयत्न करत आहेत. त्यातच शिवसेनेच्या महिला आघाडीच्या जिल्हाप्रमुख शैला गोडसे यांच्यानंतर महाविकास आघाडी सरकारला पाठिंबा असलेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष सचिन पाटील यांनी अर्ज भरुन राष्ट्रवादीचे उमेदवार भालके यांच्यासमोरील अडचणी वाढवल्या आहेत.

‘सचिन वाझेंनी असा काय खुलासा केला की, शरद पवारांच्या अचानक पोटात दुखायला लागलं?’

बंडखोरी केवळ महाविकास आघाडीमध्येच नाही तर भाजपच्या गटात देखील आहे. मंगळवेढ्याचे ज्येष्ठ नेते बबनराव अवताडे यांचे चिरंजीव आणि समाधान अवताडे यांचे चुलत बंधू सिद्धेश्वर यांनी परवा अर्ज नेला होता. त्यामुळे ते अर्ज भरणार का ? याकडे सर्वांचे लक्ष्य लागले होते. अखेर सिद्धेश्वर अवताडे यांनी आज आपला उमेदवारी अर्ज भरुन समाधान अवताडे यांना मोठा धक्का दिला आहे.

भाजप अन् राष्ट्रवादीनंतर आता काँग्रेसचा Lockdown ला विरोध ? नेते म्हणाले – ‘पुन्हा लॉकडाऊन करुन लोकांना त्रास देऊ नका’

दरम्यान, शिवसेनेच्या महिला आघाडीच्या जिल्हाप्रमुख शैला गोडसे आणि स्वाभिमानीचे सचिन पाटील यांनी अर्ज भरुन निवडणुकीच्या प्रचाराला जोरदार सुरुवात केली आहे. गावोगावी जाऊन दोन्ही उमेदवार मतदारांच्या गाठीभेटी घेऊन आपल्याला मतदान करुन विजयी करण्याचे आवाहन करत आहेत. या दोन उमेदवारांनी माघार घेतली नाही तर भगीरथ भालके यांना ही निवडणूक कठीण जाणार असल्याचे बोलले जात आहे. दुसरीकडे भाजपच्या गोटात देखील सर्वकाही अलबेल नसल्याचे स्पष्ट झाले आहे. भाजपचे उमेदवार समाधान अवताडे यांना त्यांचे चुलत बंधू सिद्धेश्वर अवताडे यांनी उमेदवारी अर्ज भरुन धोक्याचे लाल निशाण दाखवले आहे.

‘मला ED च्या तारखा पाहून कोरोना होत नाही’, भाजपच्या नेत्याची एकनाथ खडसेंवर टीका

मंगळवेढ्यातील ज्येष्ठ नेते बबनराव अवताडे samadhan avatade  यांना मानणारा वर्ग मोठा आहे. त्यातच त्यांचे चिरंजीव सिद्धेश्वर अवताडे यांनी बंडाचे निशाण फडकावले आहे. सिद्धेश्वर अवताडे यांनी निवडणूक लढवली तर समाधान यांच्या पारड्यातील मतांची विभागणी होऊन त्याचा मोठा फटका समाधान अवताडे यांना बसणार आहे. एकंदरीतच राष्ट्रवादीचे उमेदवार भगीरथ भालके यांची मित्र पक्षाच्या बंडखोरीमुळे तर भाजपचे उमेदवार समाधान अवताडे यांना कुटुंबातील बंडाळीमुळे डोकेदुखी वाढणार हे निश्चित आहे.

Also Read:

केंद्राने गोठवला खासदारांचा निधी, खासदारांचा आता राज्याच्या निधीवर ‘डोळा’

सचिन, पठाण बंधू यांच्यानंतर भारतीय टीमच्या ‘या’ कर्णधाराला कोरोनाची लागण

अमित शाह-शरद पवार यांच्या भेटीवर काँग्रेसने दिली ‘ही’ प्रतिक्रिया

संजय राठोड, अनिल देशमुख यांच्यानंतर आता ‘हे’ मंत्री येणार अडचणीत; थेट लोकायुक्तांकडेच तक्रार

Lockdown ला राष्ट्रवादीचा विरोध, मुख्यमंत्र्यांना स्पष्ट शब्दांत सांगितलं ‘लॉकडाऊन राज्याला आणि जनतेला परवडणारा नाही’

‘कोरोनाच्या सेकंड म्युटंटप्रमाणेच गुन्हेगारीचं रूपही बदलतंय’ : CM उद्धव ठाकरे

मुख्यमंत्री ठाकरेंनी पोलिसांबाबत केलं महत्वपूर्ण विधान; म्हणाले, ‘…भानावर राहावेच लागेल’

शिवसेनेने केली वेगळीच मागणी, ‘मोदींसारख्या सैनिकांना ताम्रपट मिळायला हवे’

Sachin Vaze : ‘काल पर्यंत सचिन वाझे प्रामाणिक व कार्यक्षम अधिकारी म्हणणाऱ्या संजय राऊतांचा यू-टर्न, NIA ने चौकशी करावी’

बाळासाहेब थोरातांचा संजय राऊतांना टोला, म्हणाले – ‘कदाचित राजकारणी आणि संपादक यात त्यांची गल्लत होते…’

चर्चा तर होणारच ! पार्थ पवारांनी घेतली अजितदादांचे कट्टर विरोधक असलेल्या भाजपा नेत्याची भेट

Related Posts