IMPIMP

‘राज्यातील गंभीर प्रकरणावर मुख्यमंत्र्यांची भूमिका मुख्यमंत्रीपदाला शोभत नाही, देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर निशाणा’

by pranjalishirish
param bir singh high court bjp devendra fadnavis target cm uddhav thackeray hm anil deshmukh

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन- राज्यात सध्या सुरू असणाऱ्या गंभीर प्रकरणावर मुख्यमंत्र्यांनी जी भूमिका घेतली आहे, ती या मुख्यमंत्री पदाला शोभणारी नसल्याचे सांगत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस Devendra Fadnavis  यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला. फडणवीस म्हणाले, सचिन वाझेंची पहिल्यांदा पाठराखण केली. त्यानंतर वाझे प्रकरणात जे काही समोर आले तेव्हापासून मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणावर कोणतेही भाष्य केले नाही. माध्यमांसमोर मुख्यमंत्री कोणतेही स्टेटमेंट करत नाहीत. त्यांचे मौन हे आश्चर्यचकीत करणारे आहे. अशा शब्दात फडणवीस यांनी ठाकरे सरकारवर हल्ला चढवला.

शिवसेनेचे धारदार बाण ! म्हणाले – ‘देशातील निवडणूक आयोग ‘मृत’, EC ची भूमिका संशयास्पद’

परमबीर सिंह यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर 100 कोटी रुपये वसुलीचा आरोप केला होता. मुंबई उच्च न्यायालयाने या प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. न्यायालयाच्या निर्णयाचे आम्ही स्वागत करतो, असे म्हणत त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. ते म्हणाले, मुख्यमंत्र्यांनी पदाचा मान राखत, ज्या घराण्यातून ते येतात त्याचा मान राखत त्यांनी या प्रकरणात भूमिका घेतली पाहिजे. अन्यथा त्यांच्याविरोधात जनमानसामध्ये संशय निर्माण होईल, असंही फडणवीस  Devendra Fadnavis यांनी म्हटले आहे.

शरद पवारांशिवाय दुसरा कोणी निर्णय घेऊ शकत नाही

फडणवीस म्हणाले, शरद पवार यांनी काय निर्णय घ्यावा, हा सर्वस्वी त्यांचा अधिकार आहे, ते मोठे नेते आहेत. मात्र नैतिकतेच्या आधारावर गृहमंत्र्यांचा राजीनामा घ्यावा, ही जबाबदारी पक्षाचे सर्वोच्च नेते म्हणून शरद पवार यांची आहे. कोर्टाने अनिल देशमुख यांच्या सीबीआय चौकशीचे आदेश दिलेत. त्यामुळे त्यांच्याबद्दल जो काही निर्णय घ्यायचा असेल ते शरद पवार घेतली. त्या पक्षातील निर्णय शरद पवारांशिवाय दुसरा कोणी घेऊ शकत नाही, असेही फडणवीस म्हणाले.

PM मोदी, HM शहांना खूश करण्यासाठी मुख्यमंत्र्यावर टीका, टीका करताना फडणवीस-पाटलांनी भान ठेवावे, नाहीतर…

सर्वांच्या नजरा शरद पवारांकडे

देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले, आता न्यायालयानेच चौकशीचे आदेश दिले आहेत. शरद पवार सध्या प्रकृती अस्वस्थेमुळे आराम करत आहेत. त्यामुळे त्यांना त्रास द्यायचा नाही, पण पक्षाचे सर्वोच्च नेते म्हणून त्यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांचा राजीनामा घ्यावा. कारण, आता सर्वांच्या नजरा पवारसाहेबांकडे लागल्या आहेत, असेही फडणवीस Devendra Fadnavis  यांनी म्हटलं आहे.

तर पुन्हा मंत्रिमंडळात घेता येईल

उच्च न्यायालयाच्या निर्णयाचं स्वागत, सीबीआय चौकशीमध्ये सर्वकाही उघड होईल. सीबीआय चौकशी होऊ नये, यासाठी अनेकांनी प्रयत्न केले. रश्मी शुक्ला अहवाल, परमबीर सिंह यांचे पत्र, हे खोटं भासवण्याचा प्रयत्न केला. गृहमंत्र्यांचा राजीनामा घेतला पाहिजे. मुख्यमंत्र्यांनी राजीनामा घ्यावा, नैतिकतेच्या आधारावर हा राजीनामा घेतला पाहिजे. अनिल देशमुख यांनी या पदावर राहणं योग्य नाही. चौकशीतून ते निर्दोष बाहेर पडले तर त्यांना पुन्हा मंत्रिमंडळात घेता येईल, असेही फडणवीस म्हणाले.

हफ्ता वसुलीवर चंद्रकांत पाटील म्हणाले – ‘इयत्ता 8 वीचा विद्यार्थीही सांगेल सरकार प्रकरण दाबतंय’

तर FIR नोंदवा – कोर्ट

याचिकाकर्त्या जयश्री पाटील यांच्या याचिकेवर सुनावणीवळी उच्च न्यायालयाने सीबीआय संचालकांना या प्रकरणी 15 दिवसांत प्राथमिक चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच जर यामध्ये कोणत्याही प्रकारे गुन्हा आढळून येत असेल तर एफआयआर दाखल करण्यासही म्हटले आहे.

Also Read :

मोठी बातमी ! अजितदादांना बालेकिल्ल्यातच शह देणार शिवसेना ?

ठाकरे सरकारच्या ‘त्या’ निर्णयाला अखेर भाजपचा पाठिंबा पण…

Hasan Mushrif : ‘फडणवीसांना राज्यसभेत पाठवून त्यांना मंत्रिपद दिलं जाणार, चंद्रकांत पाटील हे नागपुरातून निवडणूक लढवणार असल्याची चर्चा’

Param Bir Singh : उच्च न्यायालयाच्या सुनावणीनंतर भाजपकडून गृहमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी

‘त्या’ आदेशावरुन काँग्रेसकडून आदित्य ठाकरे ‘निशाण्या’वर, राज्यपालांनी दखल घेण्याची मागणी (व्हिडीओ)

Devendra Fadnavis : ‘नैतिकतेच्या आधारावर गृहमंत्र्यांचा राजीनामा घ्यावा, निर्णय घेण्याचा सर्वस्वी अधिकार शरद पवारांचा’ (व्हिडीओ)

Related Posts