राज्यात लॉकडाऊनची तयारी?, CM ठाकरेंचा राज ठाकरेंना फोन, म्हणाले – ‘सहकार्य असू द्या’

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन – राज्यात कोरोनाचा संसर्ग वेगाने वाढत असल्याने महाविकास आघाडी सरकारकडून लॉकडाऊनची तयारी सुरु करण्यात आली आहे. याच पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे uddhav thackeray यांनी आपले बंधू आणि मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना फोन करुन सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे. राज्यात लॉकडाऊन किंवा कडक निर्बंध लावण्यासाठी मुख्यमंत्री मागील दोन दिवसांपासून आढावा घेत आहेत. याच दरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे uddhav thackeray यांनी राज ठाकरे यांच्यासोबत फोनवर चर्चा केली.
Raju Shetty : पंढरपूर पोटनिवडणुकीत दोन्ही बाजुने पाण्यासारखा पैसा वाहणार, महाविकास आघाडीत बिघाडी?
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे uddhav thackeray यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याशी फोनवर संपर्क साधल्याची माहिती मनसेने आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरुन दिली आहे. ट्विटमध्ये म्हटले आहे की, ‘राज्यात कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीत लॉकडाऊनचा मार्ग स्वीकारावा लागू शकतो. त्यामुळे अशा परिस्थितीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने सहकार्य करावं, असं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे uddhav thackeray ह्यांनी राजसाहेबांना फोनवरील संवादात केले आहे.’
राज्यातील कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीत लॉकडाऊनचा मार्ग स्वीकारावा लागू शकतो,त्यामुळे अशा परिस्थितीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने सहकार्य करावं,असं आवाहन मुख्यमंत्री मा.श्री. उद्धव ठाकरे ह्यांनी राजसाहेबांना फोनवरील संवादात केलं @CMOMaharashtra
— MNS Adhikrut – मनसे अधिकृत (@mnsadhikrut) April 4, 2021
विशेष म्हणजे, मुख्यमंत्र्यांनी विरोधी पक्ष म्हणून संवाद साध्यासाठी मनसेची निवड केली. राज ठाकरे यांच्यासोबत फोनवर संवाद साधून त्यांना सहकार्य करण्याचे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे uddhav thackeray यांनी केले आहे.
‘प्लेगच्या साथीचे उदाहरण देत मनसेचा ठाकरे सरकारवर निशाणा, केली ‘रँड’च्या राजवटीशी तुलना’
दरम्यान, राज्यात कोरोना व्हायरसचा उद्रेक पहायला मिळत आहे. कोरोनाचा वाढत्या संसर्गामुळे शासन आणि प्रशासनाची चिंता वाढली आहे. त्यामुळे कोरोना संसर्ग साखळी तोडण्यासाठी राज्यात पुन्हा एकदा कडक लॉकडाऊन करण्याचा विचार सुरु आहे. या पार्श्वभूमीवर राज्य मंत्रिमंडळाची आज (रविवार) दुपारी तीन वाजता महत्त्वाची हाय व्होल्टेज बैठक आयोजित करण्यात आली आहे.
राहुल गांधींनी ‘या’ 2 शब्दांत साधला निवडणूक आयोगावर निशाणा
छत्तीसगडमध्ये नक्षलवादी-जवानांमध्ये चकमक; 5 शहीद, 21 जण बेपत्ता
CM उद्धव ठाकरेंनी घेतला राज ठाकरेंचा समाचार, म्हणाले
Kirit Somaiya : ‘…म्हणून उद्धव ठाकरेंनी माझ्याकडून 100 कोटी वसूल करायला सांगितलंय’ (Video)
‘कोणाचीही गय करु नका, कोरोना निर्बंध आणखी कडक करा’ – सभापती रामराजे नाईक-निंबाळकर
‘माझं कुटुंब, माझी जबाबदारी’ म्हणणाऱ्या मुख्यमंत्र्यांच्याच घरात ‘कोरोना’ – नारायण राणे
Nana Patole : ‘महाराष्ट्राला लसीची नितांत गरज; केंद्र सरकार पाकिस्तानला मोफत लस देतंय’ !
अबू आझमींचा इशारा, म्हणाले -‘आम्ही सरकारसोबत,पण जनहितासाठी आंदोलन करु’
Lockdown बाबत प्रकाश आंबेडकरांनी केलं मोठं विधान, म्हणाले – ‘सरकारला आमची विनंती राहील की…’
Comments are closed.