IMPIMP

Pune Amenity Space | अ‍ॅमेनिटी स्पेस भाडेतत्वावर देण्याच्या प्रस्तावावरून भाजप नगरसेवकांमध्येच फूट पडली पडल्याची मनपा वर्तुळात चर्चा

by nagesh
Pune Amenity Space | BJP corporators split over proposal to lease amenity space

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन Pune Amenity Space | अ‍ॅमेनिटी स्पेस भाडेतत्वावर देण्याच्या प्रस्तावावरून भाजप नगरसेवकांमध्येच (bjp corporator) फूट पडली आहे. कंत्राटी सुरक्षा रक्षक नियुक्तीचे टेंडर आणि 11 गावातील ड्रेनेज लाईनच्या टेंडरवरून प्रमुख पदाधिकाऱ्यांमध्ये झालेल्या ‘ बेबनावाची संधी साधत सुमारे 15 नगरसेवकांच्या गटाने अमेनिटी स्पेस (Pune Amenity Space) भाड्याने देण्याच्या प्रस्तावाला ठाम विरोध दर्शवतानाच सभागृहात ऐनवेळी वेगळी भुमिका घेण्याची तयारी दर्शवल्याने बुधवारी अनेक दिवसांनी झालेली ऑफलाईन ‘सर्वसाधारण सभा’ (PMC General Body Meeting) तहकूब करण्याची वेळ सत्ताधाऱ्यांवर आल्याची चर्चा महापालिका वर्तुळात आहे.

 

महापालिकेच्या (Pune Corporation) 270 अमेनिटी स्पेस भाडेतत्वावर (Pune Amenity Space) देण्याचा प्रस्ताव काल सर्वसाधारण सभेपुढे होता. या प्रस्तावासोबतच स्वारगेट – कात्रज मेट्रो, स्वच्छ संस्थेसोबत करार, सिंहगड रस्त्यावरील उड्डाणपुलाच्या निविदेला 72 ब नुसार मान्यता देण्याचे मोठे ‘ विषय ‘ कार्यपत्रिकेवर होते. मागील महिन्यात ऐनवेळी प्रमुख विरोधीपक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने या प्रस्तावा विरोधात भुमिका घेतली. विशेष असे की राष्ट्रवादी मधील काही मोजक्या नगरसेवकांनी अमेनिटी भाडेतत्वावर देण्यास शहर सुधारणा समितीमध्ये पाठिंबा दिला होता. मात्र ऐनवेळी दिलेल्या नकारामुळे 8 सप्टेंबर पर्यंत सभा तहकूब करण्यात आली होती. त्याचवेळी राष्ट्रवादीचे सर्वोच्च नेते शरद पवार यांच्याशीही या विषयावर चर्चा करण्याची घोषणा भाजपच्या एका वरिष्ठ पदाधिकाऱ्या कडून करण्यात आली होती. तोपर्यंत भाजपचे सर्व नगरसेवक पक्षाच्या भूमिकेवर ठाम होते.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

 

दरम्यान, मागील आठवड्यात झालेल्या स्थायी समितीमध्ये 11 गावांमधील ड्रेनेज लाईन टाकण्याचे 323 कोटी रुपयांचे टेंडर तसेच भाजपच्या मुंबईतील एका आमदाराच्या कंपनीला 41 कोटी रुपयांचे सुरक्षा रक्षक पुरवण्याचे टेंडर मंजूर करण्यात आले. सुरक्षा रक्षक पुरवण्याचे टेंडर आपल्या जवळच्या आमदाराला मिळावे यावरून सत्ताधारी दोन पदाधिकाऱ्यांमध्ये जोरदार खडाजंगी झाली. यामुळे ती स्थायी समितीची बैठक तब्बल तीन तास उशिरा झाली. या दोन पदाधिकाऱ्यांच्या वादात तिसऱ्या पदाधिकाऱ्याची चांगलीच मुस्कटदाबी झाली. त्यानेही आपल्या कारभारात यापुढे हस्तक्षेप खपवून घेतला जाणार नाही अशी ताठर भुमिका घेतल्याने पदाधिकाऱ्यांमधील वाद ‘ अबोल्या ‘ पर्यंत गेले आहेत.

 

यासंधीचा फायदा घेत सुरवातीपासून डावलल्या गेलेल्या सुमारे 15 नगरसेवकांच्या गटाने उचल खाल्ली.
अमेनिटी स्पेस भाड्याने देण्याच्या विषयावर नागरिकांमध्ये नाराजी पसरली आहे.
ऐन निवडणुकीच्या तोंडावर हा निर्णय घेतल्यास आमच्या अडचणी वाढतील, अशी भुमिका मांडली.
यामुळे या प्रस्तावासाठी प्रयत्नशील असलेल्या पदाधिकाऱ्या पुढील अडचणी वाढल्या.
त्यामुळे सभेसाठी उपस्थितिचा व्हीप वाजवूनही ऐनवेळी सभा तहकूब करण्याची नामुष्की भाजपच्या पदाधिकाऱ्यांवर आली. या घटनाक्रमामुळे 22 सप्टेंबर रोजी पोलिसनामाने ‘ अमेनिटी स्पेस भाडेतत्वावर देण्याचा प्रस्ताव गुंडाळल्याच्या’ वृत्तावर शिक्कामोर्तब झाले आहे.

 

Web Title : Pune Amenity Space | BJP corporators split over proposal to lease amenity space

 

हे देखील वाचा :

Pune Crime | ‘लिव्ह इन रिलेशन’मध्ये राहणार्‍या तरुणीने प्रियकराचा घोटला ‘गळा’; पुण्याच्या फुरसुंगीमधील घटना

Gold Price Today | सोन्याच्या किंमतीत मोठी घसरण; जाणुन घ्या आजचे दर

WhatsApp मध्ये येणार ‘हे’ 6 धमाकेदार फीचर्स, बदलून जाईल वापरण्याची स्टाईल; जाणून घ्या

 

Related Posts