IMPIMP

Pune Corporation Amenity Space | पुण्यातील अ‍ॅमेनिटी स्पेस भाड्याने देण्याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बैठकीत राष्ट्रवादीने एकमताने घेतला ‘हा’ निर्णय

by nagesh
Pune Corporation Amenity Space | ncp is now opposed to renting out amenity space pune corporaiton area

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन  – Pune Corporation Amenity Space | पुणे महापालिकेच्या अ‍ॅमेनिटी स्पेसच्या (Pune Corporation Amenity Space) जागा दीर्घकाल मुदतीने भाड्याने देण्याचा प्रस्ताव सत्ताधारी भाजपने (BJP) स्थायी समितीच्या बैठकीत (Standing Committee Meeting) मंजूरी दिली आहे. मात्र, याला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने (NCP) विरोध करण्याची भूमिका घेतली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या बैठकीत एकमताने निर्णय घेतला आहे. आगामी महापालिका निवडणुकीच्या तोंडावर भाजपला मदत केल्याने पक्षाचे नुकसान होईल त्यामुळे निर्णय घेण्यात आला आहे.

पुणे महापालिकेच्या 85 आरक्षणाच्या आणि 185 अ‍ॅमेनिटी स्पेसच्या (Standing Committee Meeting) जागा खासगी व्यावसायिकांना दीर्घमुदतीने भाड्याने देण्याच्या विषयावर मुख्यसभेत प्रस्तावाला पाठिंबा द्यायचा की नाही यावर अजित पवार यांनी शासकीय विश्रामगृह (Government Rest House) येथे राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली.

यावेळी जागा भाड्याने देताना 33 टक्के जागा अर्बन फॉरेस्टसाठी राखीव (Reserved for Urban Forest) ठेवावी व जागांच्या वापरचा मास्टर प्लॅन तयार करावा या मागणीवरुन भाजपला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला पण त्यास अनेक पदाधिकाऱ्यांनी विरोध होता. यावरुन राष्ट्रवादीमध्ये मतभेद निर्माण झाल्याने गुरुवारच्या मुख्य सभेच्या काही तास आधी भूमिकेवरुन कोलांटउडी घेतली. पदाधिकाऱ्यांनी एकमताने निर्णय घ्यावा असे पवार सांगितले असताना उलट पक्षात गोंधळ निर्माण झाला. त्या पार्श्वभूमीवर आज पुन्हा बैठक झाली. यावेळी शहराध्यक्ष खासदार, आजी माजी आमदार, माजी महापौर, माजी स्थायी समिती अध्यक्ष उपस्थित होते.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

पदाधिकाऱ्यांच्या बैठकीमध्ये अजित पवार यांनी पक्षाच्या भूमिकेवरुन झालेल्या गोंधळाची चौकशी केली.
त्यावेळी प्रसार माध्यमांनी चुकीचा अर्थ काढला असे पवार यांना सांगण्यात आले.
त्यानंतर प्रत्येक पदाधिकाऱ्यांची भूमिका ऐकून घेतली.
यामध्ये अ‍ॅमेनिटी स्पेसच्या मुद्याला पूर्ण विरोध केला पाहिजे. भाजपसोबत जाणे योग्य नाही.
जर पाठिंबा दिल्यास त्याचा परिणाम पक्षाच्या प्रतिमवर होईल असे मत पदाधिकाऱ्यांनी मांडले.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार अ‍ॅड. वंदना चव्हाण (MP Adv. Vandana Chavan) यांनी सांगितले,
33 टक्के अर्बन फॉरेस्ट व मास्टर प्लान भाजपने तयार केला नाही आणि या बदलास पाठिंबा देण्याची भूमिका ती त्या दिवसा पुरतीच मर्यादित होती.
आता त्याचा काही संबंध नाही त्यामुळे या प्रस्तावास विरोध केला जाईल, असे बैठकीत ठरले असल्याचे चव्हाण यांनी सांगितले.

 

Web Title : Pune Corporation Amenity Space | ncp is now opposed to renting out amenity space pune corporaiton area

 

हे देखील वाचा :

Pune Crime | जुन्या वादातून तरुणावर जीवघेणा हल्ला, दोघांना अटक

Government Schemes | ‘या’ योजनेत तुम्हाला मिळतील 6 हजार रुपये, 1 सप्टेंबरपासून ‘इथं’ करा अर्ज, जाणून घ्या काय आहे प्रोसेस?

Aadhaar Card Updation | आधार कार्ड अपडेशन आणि ‘PAN-आधार’ लिंकिंगवर समोर आली महत्वाची माहिती, जाणून घ्या पूर्ण डिटेल

 

Related Posts