IMPIMP

पुण्याच्या उपमहापौर सरस्वती शेंडगे यांचा राजीनामा

by bali123
pune deputy mayor saraswati shendge resigns

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन – पुणे महापालिकेच्या उपमहापौर सरस्वती शेंडगे saraswati shendge यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा दिला आहे. विधानसभेच्या निवडणुकीनंतर म्हणजेच साधारण दीड वर्षांपूर्वी उपमहापौरपदी शेंडगे saraswati shendge यांना भाजपनं संधी दिली होती. आता त्यांनी आपला राजीनामा पक्षाच्या पदाधिकाऱ्यांकडे सुपूर्द केला आहे.

भाजपच्या तत्कालीन शहराध्यक्ष माधुरी मिसाळ यांनी त्यावेळी सांगितलं होतं की, हे पद सव्वा वर्षासाठी असेल. यानंतर हे पद रिपाइंला देण्याचं ठरलं होतं. त्यानुसार शेंडगे यांचा सव्वा वर्षांचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर रिपाइंकडून उपमहापौरपदाची मागणी केली गेली होती. रिपाइंनं यापदासाठी गटनेत्या सुनीता वाडेकर यांचं नावही निश्चित केलं. भाजपनं मात्र शेंडगे यांचा राजीनामा घेणं टाळलं होतं. फक्त शेंडगे यांचा राजीनामा का असा प्रश्न उपस्थित करत सर्वच पदाधिकारी बदला अशी मागणीही पक्षात केली जात होती. त्यामुळं शेंडगे यांना अभय मिळाल्याचं दिसत होतं.

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे यावर निर्णय घेतील असं सांगण्यात आलं होतं. सोमवारी पक्ष पदाधिकाऱ्यांकडून तडकाफडकीनं शेंडगे यांना राजीनामा देण्यास सांगण्यात आलं. यानुसार शेंडगे यांनी पदाचा राजीनामा दिला. दरम्यान आता शेंडगे यांचा राजीनामा स्विकारला जाणार का, स्विकारला तरी रिपाइंला या पदाची संधी मिळणार की, भाजप हे पद पुन्हा स्वत:कडे ठेवणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

ED ची मोठी कारवाई ! सुशिलकुमार शिंदेची मुलगी, जावयाची कोट्यावधीची मालमत्ता जप्त

सचिन वाझे प्रकरण : जयंत पाटलांचे भाजपला चोख प्रत्युत्तर, म्हणाले – ‘गृहमंत्री अनिल देशमुखांच्या राजीनाम्याची गरज नाही’

Related Posts