IMPIMP

Sanjay Raut: ‘आम्ही समोरुन वार करतो, आणि वार झेलतो’

by omkar
Shivsena पुण्यात 80 जागांवर लढणार 🏹 संजय राऊत

सरकारसत्ता ऑनलाइन – शिवसेना-काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे तिन्ही पक्ष ठरवून एकत्र आलेत, चोरून एकत्र आले नाहीत. राज्यात तीन पक्षांचा समनव्य चांगला आहे तो प्रदीर्घ काळ रहावा, अशी आमची इच्छा आहे. अजित पवारांनी देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत पहाटे शपथ घेतली तेव्हा संध्याकाळ पर्यंत ते आपल्या घरट्यात परत येतील, असं मी त्याच दिवशी सांगितलं होतं. आम्ही समोरुन वार करतो, आणि वार झेलतो, त्यामुळे आता शिवसेना पाठीत खंजीर खुपसते, या विधानावर कोणीही विश्वास ठेवणार नाही, पुण्यातील खेड येथे पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी संजय राऊत (Sanjay Raut) यांनी विरोधी पक्षातील नेत्यांवर टीकास्त्र सोडले तसेच सत्तेतील काँग्रेस नेत्यांनाही खडेबोल सुनावले.

Pravin Darekar : ‘… तर सरकार कधी कोसळेल हे देखील त्यांना कळणार नाही’

सत्तेत असणारी आघाडी स्थानिक स्वराज्य संस्थेत राहावी

पुणे महापालिका निवडणुकीबद्दल आम्ही दोन्ही पर्यायाचा विचार करत आहोत.
महाविकास आघाडी बरोबर किंवा स्वतंत्रपणे. एकत्र निवडणूक लढवल्यास शिवसेनेच्या किमान ८० जागा युतीत असतील.
सध्या सत्तेत असणारी ही आघाडी स्थानिक स्वराज्य संस्थेत राहावी अशी आमची भूमिका आहे, असे Sanjay Raut राऊत म्हणाले.

आघाडीत हे असं होतंच राहतं…

शिवसेनेचे असले तरीही उद्धव ठाकरे राज्याचे, महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री आहेत.
लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी कधीकधी मंत्र्यांचा
उत्साह असतो. वडेट्टीवारांच्या भूमिकेवरून थोडीफार गडबड झाली पण आघाडीत हे असं होतंच राहतं.
पण हे सरकार मजबूत आहे.

🢃

…तर काँग्रेसला शुभेच्छाच

काँग्रेस पक्ष स्वबळावर केंद्रात सत्तेवर येणार असेल तर आमच्या शुभेच्छाच आहेतच.
आम्ही त्यांच्या पाठीशी राहू बंगालमध्ये काँग्रेसनं स्वबळावर लढण्याचा प्रयत्न केला.
पण काय झालं? तुम्हाला माहितच आहे.
स्थानिक पातळीवर आघाडीने एकञ लढावं यासाठी आमचे प्रयत्न आहेत… नाना पटोले स्वबळावर लढणार असतील तो त्यांचा निर्णय पण मग केंद्रातही स्वबळावर निवडून यावं आम्ही पाठिंबा देऊ.

केंद्राने यात लक्ष घालावं…

नारायण राणे यांनी मराठा आरक्षणावरुन शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यावर टीकास्त्र सोडलं होतं. पुण्यात बोलताना संजय राऊत (Sanjay Raut) यांनी राणेंना प्रत्त्युत्तर दिलं. आमच्या मनात पाप नाही. मराठा आरक्षण प्रकरण न्याय प्रविष्ट आहे, सगळ्या गोष्टी आम्हाला काळजीपूर्वक करायच्या आहेत. भाजपच्या नेत्यांना असं वाटत आम्ही काही करत नाही, त्यामुळे केंद्राने यात लक्ष घालावं, आमचं योग्य सहकार्य असेल, असे राऊत म्हणाले.

चंद्रकांत दादा पाटील म्हणजे वसंतदादा पाटील नाहीत…

मागील काही दिवसांपासून भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील शरद पवार यांच्या टीका करण्याचा सपाटाच लावला आहे. त्यांच्या या टीकेला संजय राऊत यांनी आपल्या खास शैलीत उत्तर दिलं. ते म्हणाले की, ‘चंद्रकांत दादा पाटील म्हणजे वसंतदादा पाटील नाहीत. प्रमुख पदावर असताना व्यक्तीगतरित्या टीका होऊ नये, समोरच्या वर बोट दाखवताना बोटे आपल्याकडे पण असतात हे दादांनी लक्षात घ्यावे. शरद पवार यांच्यावर आरोप केल्याशिवाय यांच्या बातम्या होत नाहीत.

Also Read:- 

‘राज-उद्धव’ एकत्र येणार ?, खा. संजय राऊत म्हणाले…

Devendra Fadnavis : उत्तरप्रदेशातील गंगेतील मृतदेहांची महाराष्ट्रात चर्चा होते, पण…

Ajit Pawar : ‘प्री-वेडिंग’ शूटच्या माध्यमातून पर्यटन विकास साधा !

शिवराज्याभिषेक दिन सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर संभाजीराजेंचे नवं ट्वीट

Dark Mode : डार्क मोडमध्ये कधीही वापरू करू नका स्मार्टफोन, जाणून घ्या कारण

Maratha Reservation : मराठा आरक्षण रद्द होण्यामागे ‘हे’ 2 महत्वाचे कायदेशीर मुद्दे; जाणून घ्या

खुशखबर ! भारतात मुलांना याच महिन्यात मिळू शकते व्हॅक्सीन, जाणून घ्या कुठपर्यंत पोहचली तयारी

 

Related Posts