IMPIMP

Radhakrishna Vikhe Patil | ‘जाणत्या राजा’ला सहकार मंत्रालय सुरू करण्याचे का सुचले नाही? – भाजप

by nagesh
Sharad Pawar | NCP Chief sharad pawar to make the president of upa proposal in national executive meeting of ncp youth congress

अहमदनगर : सरकारसत्ता ऑनलाइन  Radhakrishna Vikhe Patil | अहमदनगर येथे पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखान्याच्या सभेत बोलताना भाजपचे (BJP) नेते आणि माजी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांनी केंद्र सरकारने (Central Government) सुरू केलेल्या नव्या सहकार मंत्रालयाचे स्वागत केले आहे. त्यावेळी त्यांनी विरोधकांवर जोरदार टिकास्र सोडलं आहे. ‘सहकार चळवळ ज्यांनी मोडीत काढण्याचा प्रयत्न केला, तेच आज सहकार चळवळीवर बोलतात याचे आश्चर्य वाटते. वास्तविक ज्यांच्यावर जबाबदारी होती, त्या जाणत्या राजांना केंद्रात सहकार मंत्रालय काढण्याचे का सुचले नाही? अशा शब्दात विखे पाटलांनी शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर निशाणा साधला.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

 

काय म्हणाले विखे पाटील?

‘सहकारी साखर कारखानदारीचे संरक्षण करण्यासाठी केंद्र सरकारच्या (Central Government) सहकार मंत्रालयाचा निश्चितच फायदा होईल.
असा विश्वास सभेदरम्यान बोलताना राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांनी व्यक्त केला. त्यावेळी ते म्हणाले की,
‘केंद्र सरकारने (Central Government) ऊस उत्पादकांच्या हिताचे निर्णय केले आहेत.
या देशात प्रथमच ऊसाबरोबरच साखरेच्या भावाचे दर निश्चित करून इथेनॉल निर्मितीलाही प्रोत्साहन देण्याचे 5 वर्षांचे धोरण केंद्र सरकारने स्वीकारले आहे.
सहकार मंत्रालयाची स्थापना हे सहकार क्षेत्राच्या समृद्धीचे पाऊल आहे. या मंत्रालयाची अनेकांना भीती वाटू लागली.

पुढे ते म्हणाले, सहकार हा राज्याचा विषय आहे असे सांगत या निर्णयावर टीका सुरू झाली.
परंतु सहकार चळवळ ज्यांनी मोडीत काढण्याचा प्रयत्न केला तेच आज सहकार चळवळीवर बोलतात याचे आश्चर्य वाटते.
वास्तविक ज्यांच्यावर जबाबदारी होती त्या जाणत्या राजांना सहकार मंत्रालय काढण्याचे सुचले नाही.
सहकारी साखर कारखान्यांना आर्थिक आणि धोरणात्मक पाठबळ दिले गेले नसल्याने हे कारखाने अडचणीत सापडले.
बंद पडलेले कारखाने कमी किमतीत खरेदी करण्याचे धोरण राज्यात सुरू केले.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

दरम्यान, सहकारावर कायद्याचा बडगा आणि खासगी कारखान्यांची मात्र बेबंदशाही अशी परिस्थिती निर्माण करणारे सहकारावर कोणत्या आधिकाराने हक्क सांगतात? सहकारी साखर कारखानदारी टिकविण्यासाठी ऊसाच्या उत्पादन वाढीवर भर द्यावा लागणार आहे.
यासाठी पाण्याची उपलब्धता करावी लागेल. असं देखील विखे पाटील यांनी म्हटलं आहे.

 

Web Title : Radhakrishna Vikhe Patil | ministry of co operation radhakrishna vikhe patil attacks ncp chief sharad pawar

 

हे देखील वाचा :

Sachin Ahir | महाआघाडी करण्याची इच्छा, मात्र नाही झाल्यास स्वबळावर लढण्याची तयारी – सचिन अहिर

Pune Court | अल्पवयीन विद्यार्थिनीचा लैंगिक छळ ! चिंचवडमधील शिक्षकाला तीन वर्षे सक्तमजुरी; 50 हजार रूपये दंडाची शिक्षा

Pune Corporation | लस आहे तर ती द्यायला सिरींजच नाहीत ! पुणे महापालिकेच्या लसीकरणात अडथळ्यांची शर्यत

 

Related Posts