IMPIMP

संजय राऊतांची टीका, म्हणाले- ‘आमचे राज्यपाल करुणेचा सागर, पण मांडीखाली दाबून ठेवलेले आमदार मोकळे करावेत’

by sikandershaikh
Sanjay Raut | shivsena mp sanjay raut criticize cm eknath shinde dcm devendra fadnavis over border issue

सरकारसत्ता ऑनलाइन (Sarkarsatta Online)आमचे राज्यपाल करुणेचा सागर आहेत. याच करुणा भावनेनं त्यांनी कायदा आणि घटनेवर करुणा दाखवावी आणि राज्यपालांनी त्यांच्या मांडीखाली दाबून ठेवलेले 12 राज्यपाल नियुक्त सदस्य मोकळे करावेत असं म्हणत शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी राज्यपाल भगत सिंग कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांच्यावर निशाणा साधला आहे. गेल्या 2 महिन्यांपासून राज्यपाल नियुक्त आमदारांचा मुद्दा प्रलंबित आहे. राज्यातील महाविकास आघाडी सरकारनं राज्यपाल नियुक्त 12 आमदारांची यादी राज्यपालांकडे पाठवली आहे. परंतु त्यावर अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही. यावरून राऊत यांनी राज्यपालांवर टीका केली आहे. मंगळवारी राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते.

‘राज्यपाल करुणेचा सागर, मांडीखाली दाबून ठेवलेले आमदार मोकळे करावेत’

संजय राऊत (Sanjay Raut) म्हणाले, महाराष्ट्र हा संतांचा प्रदेश आहे. करुणेचा उगम हा महाराष्ट्रातूनच झाला आहे. कदाचित म्हणून राज्यपालांना महाराष्ट्रात रमावं वाटत असेल. आमचे राज्यपाल करुणेचा सागर आहेत. याच करुणा भावनेनं त्यांनी कायदा आणि घटनेवर करुणा दाखवावी आणि 12 राज्यपाल नियुक्त सदस्य त्यांनी त्यांच्या मांडीखाली दाबून ठेवले आहेत ते मोकळे करावेत.

‘…तर राज्यपालांच्या मनात घटनेविषयी करूणा’

पुढं बोलताना राऊत म्हणाले, राज्यपाल नियुक्त आमदार मोकळे केले तर राज्यपालांच्या मनात घटनेविषयी करूणा आहे हे देशाला समजेल असा टोलाही त्यांनी यावेळी बोलताना लगावला आहे.

’12 सदस्यांच्या मुद्द्यावरून अधिवेशनातही राजकारण तापलं’

दरम्यान सोमवार दि 1 मार्च 2021 पासून राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात करण्यात आली.
उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांच्या अध्यक्षतेखाली विधीमंडळाचं कामकाज चालवलं जात आहे.
सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात पहिल्याच दिवसापासून वाद पेटल्याचं दिसून येत आहे.
विधीमंडळात वैधानिक विकास महामंडळाच्या पुनर्स्थापनेचा विषय गाजताना दिसत आहे.
दरम्यान विधान परिषदेवर नियुक्त करण्यात येणाऱ्या 12 सदस्यांच्या नावाला राज्यपाल भगत सिंह
कोश्यारी यांनी अद्याप मंजुरी न दिल्यानं अधिवेशनात पुन्हा या मुद्द्यावरून राजकारण तापल्याचं देखील दिसत आहे.

वैधानिक विकास महामंडळावरून भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि भाजप नेते सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी सरकारला धारेवर धरलं.
यावर बोलताना अजित पवार म्हणाले, आमचं सरकार विदर्भ मराठवाडा विकास मंडळ झालं पाहिजे या मताचं आहे.
8 तारखेला बजेटमध्ये विकास मंडळाबद्दल जे ठरलं आहे त्याचे आकडे पहायला मिळतील.
आमचं लवकरात लवकर करायचं ठरलं आहे.
ज्या दिवशी राज्यपाल 12 आमदारांची नावं जाहीर करतील त्या दिवशी किंवा त्याच्या दुसऱ्या दिवशी आम्ही
विदर्भ आणि मराठवाडा वैधानिक विकास महामंडळ घोषित करू.
बजेटमध्ये तसा निधीही ठेवला आहे असंही पवारांनी आवर्जून सांगितलं.

Related Posts