IMPIMP

Sharad Pawar | नारायण राणे प्रकरणावर शरद पवारांनी दिली मोजक्या शब्दात प्रतिक्रिया; म्हणाले…

by nagesh
Sharad Pawar | ncp chief sharad pawar criticizes bjp over amravati violence

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन –  Sharad Pawar | केंद्रीय मंत्री नारायण राणे (Union Minister Narayan Rane) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल वादग्रस्त विधान केल्यानंतर या विधानाचे पडसाद संपूर्ण राज्यभर उमटताना दिसत आहे. राणे यांच्या वक्तव्यानंतर राज्यातील अनेक जिल्ह्यातील शिवसैनिक आक्रमक झाले आहेत. काही ठिकाणी भाजप आणि शिवसेना कार्यकर्ते (BJP and Shiv Sena) आमने- सामने आल्याचे पाहायला मिळाले. अनेक ठिकाणी आंदोलने आणि दगडफेक देखील झाले आहे. काही वेळापूर्वी नारायण राणें यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. मात्र, याआधी या प्रकरणावरून राष्ट्रवादीचे (NCP) सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

मी त्याला फारसं महत्व देत नाही…

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांना नारायण राणे यांनी केलेल्या वक्तव्यावरून प्रश्न विचारला असता पवार यांनी किरकोळ शब्दात प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
शरद पवार म्हणाले की, ‘मी त्याला फारसं महत्व देत नाही असं म्हणत त्यांच्या पद्धतीने त्यांच्या संस्काराप्रमाणे बोलतात, असं शरद पवार (Sharad Pawar) यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, नारायण राणे (Union Minister Narayan Rane) यांच्या विधानावरून राज्यात राजकीय वातावरण ढवळून निघालं आहे.
या वक्तव्यावरून राणे यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला.
त्यानंतर आता पोलिसांनी त्यांना अटक केली आहे.
तर, त्यांच्या विरोधात नाशिकमध्ये गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांचं एक पथक कोकणाकडे रवाना झालं होतं.
तसेच, पुण्यात देखील त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाल्यानंतर तेही पथक रवाना झालं होतं.
तत्पूर्वी राणेंनी अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला होता.
परंतु, राणेंचा अटकपूर्व जामीन अर्ज रत्नागिरी सत्र कोर्टाने फेटाळला आहे.

 

Web Title : Sharad Pawar | first reaction given by ncp president sharad pawar on narayan rane offensive statement on cm uddhav thackeray

 

हे देखील वाचा :

Pune Crime | BMC मध्ये गर्व्हमेंट सप्लायर्सची ऑर्डर देण्याच्या बहाण्याने 22 लाखाची फसवणूक, परदेशातील व्यापाऱ्यासह तिघांवर FIR

Earn Money | घरबसल्या कमवा 1 लाख रुपये महिना, केवळ करावे लागेल ‘हे’ काम; जाणून घ्या सोपी पद्धत

Pune News | पुण्यातील R डेक्कन मॉलवर शिवसैनिकांनी केली दगडफेक

 

Related Posts