IMPIMP

शिवसेनेचा भाजपवर निशाणा, म्हणाले – ‘एम्स’ म्हणजे महाविकास आघाडीचा घटक पक्ष नाही, जबाबदारीचे भान राखा

by sikandershaikh
shiv sena saamna editorial criticize opposition over coronavirus patients numbers increased

सरकारसत्ता ऑनलाइन (Sarkarsatta Online)राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असतानाच सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्योरोपांच्या फैरी झडत आहेत. दरम्यान आता यावरून शिवसेनेने (shiv sena) विरोधकांवर टीकेचा बाण सोडला आहे. एम्ससारख्या सर्वोच्च वैद्यकीय संस्थांनी धोक्याची जाणीव करून दिली. एम्स’ म्हणजे महाविकास आघाडीचा घटक पक्ष नाही, हे राज्यातील विरोधकांनी समजून घ्यावे. एम्सचे संचालक डॉ. रणदीप गुलेरीया देशाला गुमराह करीत आहेत, असे महाराष्ट्रातील भाजप नेत्यांना वाटत असेल तर त्यांनी दिल्लीत जाऊन एम्सच्या दारात जोरदार आंदोलन करावे. देशाचे आरोग्यमंत्रीच काय, पंतप्रधान, राष्ट्रपतींचे उंबरठे झिजवून निषेधाची पत्रे द्यावीत. विरोधकांनो, निदान कोरोना संकटाबाबत तरी जरा जपून वागा, बोला. राजकारण करायला उभा जन्म पडला आहे. पुन्हा लॉकडाऊन टाळायचा असेल तर लोकांनी जबाबदारीने वागावे अन् विरोधी पक्षांनीही जबाबदारीचे भान राखावे, असे म्हणत शिवसेनेने (shiv sena) सामनाच्या संपादकीयमधून भाजपवर निशाणा साधला आहे.

काय म्हटलयं सामनाच्या अग्रलेखा ?

राज्यात कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. राज्यात गेल्या 24 तासांत सात हजारांवर नवे रुग्ण आढळले आहेत. नागपूर, अमरावती, अकोला, बुलढाणा, वाशीम, वर्धा जिह्यांत कोरोना वेगाने पसरतो आहे. शेवटी मुख्यमंत्र्यांना समोर येऊन सगळय़ांनाच कडू औषधाचा डोस पाजावा लागला. कोरोना रुग्णांची संख्या झपाटय़ाने वाढत असताना राजकारण न करता सरकार तसेच विरोधकांनी जनतेचे हित सांभाळावे, एकोप्याने काम करावे असे संकेत आहेत, पण मुख्यमंत्र्यांनी लॉकडाऊन’ बाबत इशारा देताच विरोधी पक्षनेते दरेकर यांनी वेगळेच टोकाचे विधान केले, राज्यात लोकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण करू नका. जुलमी राजवटीसारखी कृती करू नका. दरेकर यांच्या विधानाचा अर्थ चंद्रकांत पाटील, देवेंद्र फडणवीस, आशिष शेलार आदी तज्ञ मंडळींना तरी समजला काय ? कोरोना संसर्गाबाबत सत्यस्थिती समोर मांडणे याला काय दहशत पसरवणे म्हणायचे ? कोरोनावरील लस ही नव्या स्ट्रेनविरोधात कुचकामी आहे हे, डॉ. गुलेरिया तळमळीने सांगत आहेत, तो काय दहशत माजविण्याचा प्रकार आहे ?

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

जनता जेवढी सत्ताधारी पक्षाची असते तेवढी ती विरोधी पक्षांचीसुद्धा आहे.
लॉकडाऊनमुळे लहान व्यापारी, नोकरदार वर्ग, हातावर पोट आहे अशांचे कंबरडे मोडणार हे नक्की.
आर्थिक व्यवस्थाही कोसळणार आहेच. त्यासाठी मार्ग काढावा लागेल व केंद्राने त्याकामी मदत करणे गरजेचे आहे.
महाराष्ट्रासारख्या राज्याला या कामी केंद्राकडून एखादे विशेष आर्थिक पॅकेज मिळायला हवे.
राज्यातील विरोधी पक्ष हा काही पाकिस्तानी किंवा अफगाणी वंशाचा नाही. तो याच मातीतला आहे.
त्यामुळे राज्यातील भाजप नेत्यांनी दिल्लीतच ठाण मांडून बसावे व राज्याच्या वतीने एक-दोन हजार कोटींच्या पॅकेजसाठी लढत राहावे, असे सामनातून म्हटले आहे.

Related Posts